सेवा-सुविधा
पुण्यातला कचरा
पुण्यातल्या कच-याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. गेले काही महीने कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी साठलेले कच-याचे ओंगळवाणे ढीग पाहून आपण एका सांस्कृतिक राजधानीच्या शहरात राहतो हे खरे आहे का असे वाटू लागलेले आहे. ठिकठिकाणी रस्ते कच-याच्या ढिगाने अडले आहेत. पाश्चात्य देशातले नागरीक आश्चर्याने कचरा व्यवस्थापनाकडे पाहतात. काही ठिकाणी कच-याला रात्री आग लावून दिली जाते. नागरी वस्तीत कचरा जाळायला मनाई आहे, कारण त्यामुळे घातक वायूंची निर्मिती होते. पण असा साठवून ठेवण्याने आरोग्याला धोका होतोच आहे.
जुन्या कपड्यांचे काय करावे?
घरी खुप जुने कपडे जमा झाले आहेत. काय करावं कळत नाही. पुर्वी आई जुने कपडे बोहारणिला देऊन भांडी घेत असे. आता सोसायटीत बोहारणी येत नाहीत. कुठे येत असतील तर त्यांना गाठायला आम्ही दिवसभर नसतो. विनाकारण भांडी जमा करायची सुद्धा इच्छा नाही.
जुने कपडे डिस्पोज करण्यासाठी काय करता येईल? मला खालील पर्यांयांबद्दल माहिती/ मदत हवी आहे. मी मुंबईत राहते.
१. एखादी सेवाभावी संस्था जर कपडे स्विकारत असेल तर उत्तम. परंतु घरी येऊन न्यायला हवेत. तुमच्या ओळखी मध्ये अशी संस्था असल्यास सांगा.
२. रद्दी प्रमाणे जुने कपडे विकत घेणारी दुकाने असतात का? कृपया माहीत असल्यास सांगा.
Fancy Dress...
माहिती हवी होती…
ठाण्यात fancy ड्रेस rent वर हवे होते…
माहिती असल्यास please… share करावी
आपला कट्टा चर्चा निष्कर्ष संकलन
१ ले चर्चा सत्र :
विषयः मोदींना पर्याय काय, मोदींना पर्याय का नाही, मोदींना पर्याय निर्माण होणे आवश्यक आहे की नाही!
दिवसः ७ जानेवारी २०१५
१. मोदींसारख्या नेत्यांना पक्षांतर्गत व पक्षबाह्य असे दोन्ही ठिकाणी समर्थ पर्याय निर्माण होणे एका देशासाठी आवश्यक आहे.
२. काँग्रेसने तूर्त नवीन चेहर्यांचा विचार करावा व पक्षबांधणीवर फोकस ठेवावा. ज्योतिरादित्य शिंदे हे नांव दोन सदस्यांनी सुचवले.
पुण्यातील कॅटरर्स बद्दल माहिती हवी आहे - घरगुती कार्यक्रमासाठी
नमस्कार,
पुढील महिन्यात एक घरगुती कार्यक्रम (साधारण ५० उपस्थिती) करावयाचा आहे. तेव्हा (शाकाहारी)जेवण कॅटरर्स कडुन करुन घ्यायचा विचार आहे. काही चांगले कॅटरर्स माहित असल्यास संपर्क द्याल का?
बाणेर भागातले अस्ल्यास उत्तम पण दुसर्या भागात असतील पण बाणेर एरियात सर्विस देत असतील तरीही चालेल.
धन्यवाद.
पुण्यातील नोकरदार स्त्रियांसाठी असलेली खात्रीलायक व सुरक्षित वसतिगृहे (सार्वजनिक धागा)
पुण्यात बाहेरगावांहून नोकरीसाठी येणाऱ्या व नंतर येथेच स्थायिक होणाऱ्या स्त्रिया खूप आहेत. त्या दृष्टीने येथे अनेकांनी आपल्या जागेत पेईंग गेस्ट ठेवणे, कॉट शेअरिंग बेसिसवर सदनिकेत मुलींना जागा देणे असे व्यवसाय सुरू केले. तसेच अनेक छोटी-मोठी वर्किंग वूमन्स होस्टेल्स पुण्यात आहेत. नेटवर शोधले तर एक मोठी यादीच मिळेल. पण कोणत्याही संस्थेबद्दल, व्यावसायिक सोयी सुविधांबद्दल सर्वात जास्त प्रभावी ठरतो तो आपला किंवा आपल्या परिचितांचा अनुभव!
स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)
स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.
ऑफिसमध्ये डब्बा पुरवणार्या सर्व्हीसेस
मला हिंजवडी परिसरातील ऑफिसेसमध्ये डब्बा पुरवणार्या घरगुती खानावळी, कंपन्या, गृहोद्योग ह्यांच्याबद्दल माहिती हवी होती. ही कल्पना आहे की काही ऑफिसेस स्वतःच जेवण पुरवतात किंवा बाहेरील टिफिन सर्व्हीसेसना मज्जाव करतात. अश्या केसेसमध्ये हिंजवडी परिसरातील चांगल्या खानावळींबद्दल लिहिले तरी चालेल (जिथे जाऊन डब्बा आणता येईल).
तसेच ह्या धाग्यावर इतर शहरातील ऑफिसेसमध्ये चांगल्या प्रतीचा डब्बा पुरवणार्या कंपन्यांबद्दलही चर्चा करता येईल.
वृद्ध पालकांची काळजी व देखभाल
आपले वृद्ध पालक आपल्यासोबत राहत असोत किंवा वेगळे राहत असोत, त्यांची काळजी वाटणे हे साहजिक, स्वाभाविक आहे. आपल्या मात्या-पित्यांना त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध हा विनासायास, आनंदाने व निरामय आरोग्याने व्यतीत करता यावा असे बहुतेकांना नक्कीच वाटत असणार! परंतु प्रत्यक्षात ते साध्य होतेच असे नाही. नोकरी-व्यवसायातून सेवानिवृत्त होऊन आपला वेळ उत्तम प्रकारे घालवणारे जसे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच व्याधी अथवा अन्य काळजी - चिंतांमुळे ह्या काळाचा व्यवस्थित आनंद न घेऊ शकणारेही बरेच वृद्ध आहेत.