पुण्यातील नोकरदार स्त्रियांसाठी असलेली खात्रीलायक व सुरक्षित वसतिगृहे (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 December, 2014 - 00:51

पुण्यात बाहेरगावांहून नोकरीसाठी येणाऱ्या व नंतर येथेच स्थायिक होणाऱ्या स्त्रिया खूप आहेत. त्या दृष्टीने येथे अनेकांनी आपल्या जागेत पेईंग गेस्ट ठेवणे, कॉट शेअरिंग बेसिसवर सदनिकेत मुलींना जागा देणे असे व्यवसाय सुरू केले. तसेच अनेक छोटी-मोठी वर्किंग वूमन्स होस्टेल्स पुण्यात आहेत. नेटवर शोधले तर एक मोठी यादीच मिळेल. पण कोणत्याही संस्थेबद्दल, व्यावसायिक सोयी सुविधांबद्दल सर्वात जास्त प्रभावी ठरतो तो आपला किंवा आपल्या परिचितांचा अनुभव!

नोकरदार स्त्रियांसाठी असलेल्या पुण्यातील खात्रीलायक व सुरक्षित वसतिगृहांबद्दल आपणांस काही माहिती व अनुभव असतील तर ते येथे कृपया शेअर करावेत ही विनंती. या संकलनाचा अनेक स्त्रियांना नक्कीच उपयोग होऊ शकतो.

अपेक्षित माहिती -

* संस्थेचे नाव / माहिती
* पत्ता व संपर्क (असल्यास)
* काही विशेष सोयी / उल्लेखनीय गोष्टी
* आपला अनुभव किंवा अतिरिक्त माहिती
* साधारण मासिक शुल्क आकारणी (कल्पना असल्यास)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला डिटेलमध्ये माहिती नाही .मात्र सपेत लेले संकुल नावाची एक इमारत आहे तिथे एक मुलींसाठीच चांगल वसतिगृह आहे अशी माहिती आहे

अतिशय उपयुक्त धागा अकु. ह्या संकलनाची अनेकींना खुप मदत होईल.

साधना वसतीगृह - सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूलाजवळ अनुबंध सोसायटीशेजारी तीन मजली इमारत आहे. नोकरदार स्त्रिया आणि विद्यार्थिनी दोन्हींसाठी उपलब्ध आहे. रहाणे व जेवणे दोन्हीच्या सोयी आहेत. एक पूर्णवेळच्या निवासी व्यवस्थापिका तिथे असतात. एक सुरक्षारक्षकही असतो. नक्की आठवत नाही, पण ३ वर्षांपूर्वी रहाण्या-जेवण्याचे शुल्क एकत्र साधारण रु. ३०००/- दरमहा होते, सध्याचे विचारून घ्यावे लागेल. मी जाता-येता संपर्क, शुल्क ही माहिती विचारून लवकरच इथे अपडेट करेन.

मला आवश्यक वाटत असणा-या स्वच्छता, वेळापत्रक, शिस्त, सुरक्षितता, परवडणारे शुल्क, मुख्य रस्त्याला असल्यामुळे घरच्या लोकांना पोचण्यासाठी सोयीचे, अशा अनेक बाबी तिथे एकत्र बघायला मिळाल्या होत्या.

डेक्कन जिमखान्यावरचे महिला निवास, पर्वती पायथ्याचे महिला वसतीगृहेही माहिती आहेत. ओळखीतल्या काहीजणी रहायच्या पूर्वी, पण एकंदरीत अनुभव/आठवणी सुखावह नाही.

विजयनगर कॉलनीमधे
१. कलाप्रसाद कार्यालयाच्या शेजारी एक मोठे खाजगी होस्टेल आहे.
२. तसेच मेनका प्रकाशनाच्या शेजारी पूर्वी भिडे बंगला होता तिथेही पिजी म्हणून मुली रहात. आता तिथे बहुतेक नवीन बिल्डींग होते आहे.

शुक्रवारात
बाफना पेट्रोल पंपाजवळ हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे होस्टेल आहे. तिथे कमी खर्चात सोय होते.

यातल्या कुणाचाही वैयक्तिक अनुभव नाही.

येस नी, कलाप्रसाद कार्यालयाशेजारचे श्री. पाटील यांचे हॉस्टेल. आता ते स्वतः आहेत की नाही माहिती नाही. मी २० वर्षांपूर्वी दोन वर्षे राहिलेली आहे तिथे. तेव्हा फक्त रहाण्याची सोय होती. जेवायची व्यवस्था आपापली करावी लागायची. आता काय सोयी आहेत बघितले पाहिजे.

धन्यवाद सई, जाई व नीधप.
सई, जास्तीची माहिती मिळाली तर खूप बरे होईल.

महिला निवाससारखे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेने बाजीराव रोडलगत पी एम सी चे वर्किंग वूमेन्स होस्टेल चालवायला घेतले आहे तेच बाफना पेट्रोल पंपाजवळचे होस्टेल का?
त्याचा कोणास काही अनुभव / माहिती?

सेवासदन संस्थेचेही वर्किंग वूमेन्स होस्टेल आहे का?

शारदा निकेतन??

मी एक सुचवू का? जर पुण्यातील काहीजण इथली माहिती घेऊन प्रत्यक्षात त्या त्या वसतीगृहात जाऊन खात्री करुन घेता आली तर आणखी जास्त चांगले होईल. तिथल्याच काही मुलींना भेटून एक प्रश्नावली विचारता येईल.

महिला निवाससारखे हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेने बाजीराव रोडलगत पी एम सी चे वर्किंग वूमेन्स होस्टेल चालवायला घेतले आहे तेच बाफना पेट्रोल पंपाजवळचे होस्टेल का? <<<
हे पण बाजीराव रोडला जवळ आहे. हॉटेल गणराजला लागून असलेल्या गल्लीतून आत गेले की उजव्या बाजूला नातूबाग येते. नंतर एक गल्ली. आणि लगेच हे होस्टेल.
तिथे पूर्वी आमची शिशुविहार शाळा होती. नंतर काही काळ शाळा आणि होस्टेल असे एकत्र होते. आता फक्त होस्टेल आहे.

सेवासदन संस्थेचेही वर्किंग वूमेन्स होस्टेल आहे का? <<
माझी मैत्रिण तिथे रहायची काही काळ. कॉलेजात असताना. ती पण माबोकर आहे. बोलावते तिला इथे.

काशी, नाव आठवत असेल तर बघ ना त्या होस्टेलचे. सेनापती बापट रोड भागात अनेक खासगी वसतिगृहे, पीजी, फ्लॅट शेअरिंग प्लेसेस आहेत. त्यामुळे नाव कळाले तर बरे पडेल.

नीधप, प्लीज मैत्रिणीला इथे लिहायला सांगशील का? माझी आई काही महिने राहात होती सेवासदन वर्किंग वुमेन्स होस्टेलला, पण ते खूप खूप वर्षांपूर्वी. तेव्हा तेथील व्यवस्था अतिशय चोख, शिस्तबद्ध व माफक शुल्कात होती. मेसचे अन्न साहजिकच फार ग्रेट नसायचे, पण त्या शुल्कात अपेक्षा तरी किती ठेवणार?!!

Kothrud depot jawal rajasniketan hostel aahe,,
3 warshapurvi 3000/- rent hote pan sarv facilities aahet wifi net wagerhi hote tya weli .... aata mahit nahi pan choukashi karu shakta ...depot chya jawal aslymule agadi kuthehi jayche asel tari sope padte...

वरील सर्व वसतिगृहे स्त्रियांसाठी खात्रीलायक व सुरक्षित आहेत का??

पुणे महानगरपालिकेचे व हिंगणे कर्वे स्त्री शिक्षण संस्था चालवत असलेले वर्किंग वूमेन्स होस्टेल हे सदाशिव पेठेत बाजीराव रोडलगत (लोणीविके दामले आळीत) आहे अशी माहिती गूगलपंत दाखवत आहेत.
फोन क्रमांक ०२० २४४३२६६४.

कविता, सई व नीधपने लिहिलेली वसतिगृहे ही पुणे शहरात व पेठ भागात येतात. बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. खात्रीची आहेत.
शारदा निकेतनही सेफ आहे, परंतु सर्वांनाच परवडेल असे नसावे. मला त्यांचे मासिक शुल्क वगैरे काय याची कल्पना नाही.
श्राव्याने लिहिलेले वसतिगृहही कोथरूड भागातील बऱ्यापैकी सुरक्षित असे ऐकले आहे.