Blr Litfest,2025 अर्थात बेंगळूरू साहित्य उत्सव, २०२५
Submitted by ब्लू कोलंबसे on 15 December, 2025 - 22:29
एका वर्षापूर्वी आम्ही साहित्य प्रांतात काही कार्यक्रम बेंगळूरू शहरात कुठे होतात, याचा online धांडोळा घेत असताना blr litfest बद्दल समजले. या वर्षी अशाच एका ग्रुपवरील blr litfest बद्दलच्या लिंकवरून पुन्हा एकदा आठवण झाली. रजिस्टर करून ठेवण्याचा पर्याय वेबसाईटवर होता म्हणून ती प्रोसेस पूर्ण केली व विसरून गेलो. पण आजच्या डिजिटल ऑटो पायलट जमान्यात आमचा रजिस्टर केलेला इमेल ते कसे विसरणार?