ऑफिसमध्ये डब्बा पुरवणार्‍या सर्व्हीसेस

Submitted by मो on 27 June, 2014 - 09:06

मला हिंजवडी परिसरातील ऑफिसेसमध्ये डब्बा पुरवणार्‍या घरगुती खानावळी, कंपन्या, गृहोद्योग ह्यांच्याबद्दल माहिती हवी होती. ही कल्पना आहे की काही ऑफिसेस स्वतःच जेवण पुरवतात किंवा बाहेरील टिफिन सर्व्हीसेसना मज्जाव करतात. अश्या केसेसमध्ये हिंजवडी परिसरातील चांगल्या खानावळींबद्दल लिहिले तरी चालेल (जिथे जाऊन डब्बा आणता येईल).

तसेच ह्या धाग्यावर इतर शहरातील ऑफिसेसमध्ये चांगल्या प्रतीचा डब्बा पुरवणार्‍या कंपन्यांबद्दलही चर्चा करता येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई (परेल व आसपास) मध्ये टिफिन सेवा देण्यार्या विषयी कुणाला माहिती आहे काय?

नेट वर शोधले असता बरेच healthy (?) tiffin providers दिसतात. रेसिडंसी मध्ये होस्टेलाइट मित्र मैत्रिणीचे टिफिन पाहिले त्यामुळे टिफिन लावणे टालले. आत्ता गरज वाटू लागलीय.

मराठी किंवा गुजराती मेन्यू (शक्यतो कमी तेलकट व तिखट), स्वच्छ (hygiene is must) व खिशाला बरे असे टिफिन (घरगुती/ व्यावसायिक) चा अनुभव असल्यास कृपया सांगावा.