शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
माझ्या आईचा लॅपटॉप आजकाल अधून मधून अचानक कर्र असा काहीतरी आवाज करुन बंद होतो. थोड्या वेळाने पुन्हा सुरु केला तर व्यवस्थित चालतो. पण असे वारंवार होत आहे. लॅपटॉपचा वापर स्काइपसाठी होतो. माझ्याशी स्काईप करताना गेल्या आठवड्यात दोनदा असे झाले. तर या वारंवार आजारी पडणार्या लॅपटॉपला काय झाले आहे त्याचे निदान/दुरुस्तीसाठी खात्रीशीर दुकान /सेवा देणारे सुचवाल का? आई वसंतविहार परीसरात रहाते. त्यामुळे त्या भागातील असल्यास जास्त सोईचे होईल मात्र तसा आग्रह नाही.
छोटे दुकानदार, शो- रुम, सर्विस स्टेशन, डॉक्टर, वकील, बॅन्क, पतसंस्था, समाजसेवी संस्था, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, वाचनालय इत्यादी साठी उपयुक्त!
महोदय,
आपण सुरु करणार असणार्या / सुरु असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्या सर्व सहकार्यांिना व ग्राहकांना सामावुन घेण्यासाठी त्यांचेशी जलद व तत्पर सम्पर्कात असणे गरजेचे आहे.
काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसमधून निघाले. थोडा वेळ होता म्हणून नरिमन पॉईंट ते व्हीटी चालत आले. कुर्ला स्टेशनवर उतरून भाजी घेण्यासाठी बॅगमध्ये वॉलेट शोधू लागले तर वॉलेट गायब. मी ट्रेनमध्ये दरवाज्याजवळ उभी राहते आणि बॅगवर कायम लक्ष ठेवून असते त्यामुळे बॅग मधून काढणेही कठीण होते. ऑफिसमध्येच राहून गेले असावे म्हणुन ऑफिसमध्ये फोन केला तर त्यांनी डेस्क वर काहीच नाहीये असे सांगितले. म्हणजे ते ड्रॉवर मध्ये राहिले असावे असा विचार मनात आला. पण कदाचित तिथे नसेल तर , मी बँकेत गेले होते तिथे तर राहिले नसेल ना, त्यानंतर ऑफिस समोरच्या फूड जॉइंटवर इडली खाल्ली होती तिथे विसरले असेन तर...
सध्या एलएच्या संबंधित धागे चक्क पळतायत. क्यालिफॉर्निया ग्रुपात बेएरियातील खादाडी आहे पण एलए- खादाडी असा धागा दिसला नाही. म्हणून हा ही धागा काढला.
माझं मत एलएतील देसी फुडबद्दल इतकं काही बरं नाहीये. माझ्या मते बे एरियातले फुड सुपर्ब असते. पण ते असो. कदाचित ह्या धाग्यातून एखादी नवी जागा कळेल..
आश्चिगने दिलेली लिंक : https://www.google.com/maps/d/edit?mid=zqwbl4XtsLTY.kZZuytXx9nv8
कोंडल्याचे गाणे...
----
विशेष सुचना १:
एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू---- या परंपरागत गायल्या जाणार्या भोंडल्याच्या गाण्यावरून प्रेरणा मिळाली...
चाल अर्थात त्याच गाण्याची 
माहित नसेल तर ऐकण्यासाठी मला वि पु करा... माझ्या मंजुळ आवाजात रेकॉर्ड करून पाठवेल 
----
एक तडका मारू बाई दोन तडके मारू
दोन तडके मारू बाई तीन तडके मारू
तीन तडके मारू बाई चार तडके मारू
चार तडके मारू बाई पाच तडके मारू
पाचा तडक्यांचा पुरवठाsss
माळ घाली कवीराजाला
कवीराजाची सुस्साट गाडी
येता जाता कविता पाडी...
कवितांच्या भाराने पिचली जनता
अरे अरे राजा बस तुझी सजा....
खरेदीचा फंडा
ग्राहक या शब्दाची सोपी सुटसुटीत व्याख्या "खरेदी करणारा तो ग्राहक" अशी करता येईल. ग्राहक म्हणून आपण वस्तूंप्रमाणेच वीज, टेलिफोन, बँक, विमा, वैद्यकीय अशा अनेक सेवाही खरेदी करत असतो. या पैकी प्रत्येक खरेदी हा एक लिखित किंवा अलिखित करार असतो.
सन्मान,...
चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात
त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३