ऑफिस

शोले (इन ऑफिस)

Submitted by जित on 29 January, 2018 - 00:26

शोले म्हटलं की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. जर चित्रपटांमध्ये राजा ठरवायचा झाला तर शोलेला पर्याय नाही. मध्यंतरी एका मित्राने हैदराबादमधल्या एका शोले थीम हॉटेल बद्दल सांगितले. तिथे म्हणे मॅनेजर गब्बरच्या वेषात असतो. गल्ल्यावर एक ठाकूर पण असतो. आणि वाढपी सगळे वेगवेगळ्या गावकऱ्याच्या वेषात. तेव्हापासून डोक्यात एक विचार होता, की जर एखाद्या ऑफिसमधले लोक, एकमेकांशी शोलेच्या आविर्भावात बोलू लागले तर कशी मजा येईल.
तेच शब्दरूप करायचा एक प्रयत्न.
——-
प्रसंग : प्रॉडक्शनमध्ये बग्स आलेत, क्लायंट उचकलाय, मॅनेजर त्याच्या QA लीडशी बोलतोय
——-

शब्दखुणा: 

ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 September, 2014 - 02:49

माझ्या "फ्रेंडस अ‍ॅण्ड कलीग्ज" या धाग्यावर `बेफिकीर' यांनी सुचवल्याप्रमाणे "ऑफिसमधील राजकारणाचे अनुभव" हा वेगळा धागा काढत आहे.

धाग्याचा फायदा सर्वांनाच, खास करून माझ्यासारख्या ४-५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि तुलनेत मॅनेजमेंटच्या लोअर लेव्हलला असलेल्यांसाठी येथील अनुभवी लोकांचे अनुभव, त्याचे विश्लेषण आणि एक्स्पर्ट टिप फार मोलाचे ठरतील.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 

ऑफिसमध्ये डब्बा पुरवणार्‍या सर्व्हीसेस

Submitted by मो on 27 June, 2014 - 09:06

मला हिंजवडी परिसरातील ऑफिसेसमध्ये डब्बा पुरवणार्‍या घरगुती खानावळी, कंपन्या, गृहोद्योग ह्यांच्याबद्दल माहिती हवी होती. ही कल्पना आहे की काही ऑफिसेस स्वतःच जेवण पुरवतात किंवा बाहेरील टिफिन सर्व्हीसेसना मज्जाव करतात. अश्या केसेसमध्ये हिंजवडी परिसरातील चांगल्या खानावळींबद्दल लिहिले तरी चालेल (जिथे जाऊन डब्बा आणता येईल).

तसेच ह्या धाग्यावर इतर शहरातील ऑफिसेसमध्ये चांगल्या प्रतीचा डब्बा पुरवणार्‍या कंपन्यांबद्दलही चर्चा करता येईल.

ड्रिमगर्ल !

Submitted by तुमचा अभिषेक on 21 January, 2014 - 12:11

गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी.

विषय: 

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

Submitted by तुमचा अभिषेक on 24 January, 2013 - 13:47

रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

विषय: 

प्रोजेक्ट

Submitted by मंदार-जोशी on 24 June, 2012 - 21:23

प्रोजेक्टचे काम
आनंद निधान
त्यावीण का दाम?
विचारो नये || २ ||

रोज येथे यावे
कष्ट ते करावे
सेकंदे का मरावे?
विचारो नये || ३ ||

पिता पिता चहा
मॉनिटरकडे पहा
होऊ का रिलॅक्स?
विचारो नये || ४ ||

परवाचे उद्या अन्
उद्याचे आजच करा
आजचे काल करू का?
(कर की मेल्या...)
विचारो नये || ५ ||

सरदार गोमटा
उगारी डेडलाईनचा सोटा
आव का तो मोठा?
विचारो नये || ६ ||

क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ ||

साम दाम दंड
आली फीडबॅकची झुंड
कामात कधी खंड?
विचारो नये || ८ ||

आज यांचे काम
उद्या यांचे काम

ऑफिस...

Submitted by लाजो on 2 August, 2011 - 00:37

ऑफिस...

ऑफिस म्हणजे काय असते?

ऑफिस एक थेटर असते
कामाचे नाटक जिथे रोज दिसते...
बढती मिळते तेव्हा कॉमेडी असते
बॉसशी वाजले तर ट्रॅजेडी होते...

ऑफिस ही एक शाळा असते
सदैव शिकण्याची जागा असते...
हर प्रोजेक्ट नवी परीक्षा असते
पास झालात तर प्रमोशन असते...

ऑफिस ही एक सर्कस असते
डेड्लाईन्स मिळण्यासाठी जगलींग असते...
रींगमास्टरच्या हातात चाबुक असते
पोटासाठी तारेवरची कसरत असते...

ऑफिस हे एक घर असते
आपली टीम जणु फॅमिली बनते...
आपल्या सुखदु:खात सहभागी होते
हाक मारताच मदतीला धावुन येते...

ऑफिस हे एक देऊळ असते
ऑफिसवर्क हिच पूजा असते...
ट्रेनिंगच्या रुपात शारदा भेटते

Subscribe to RSS - ऑफिस