ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच!
यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.
पुण्यात एक जागा कमर्शियल वापरासाठी आणि एक जागा रेसिडेन्शियल वापरासाठी भाड्याने द्यायची आहे. भाडेतत्वावर जागा देताना त्यात कायदेशीर बाबींची तरतूद कशी करावी, ह्यावर मार्गदर्शन हवे आहे.
इस्टेट एजंट rental agreement तयार करून देणार आहेच.
पण त्याच बरोबर कोणा वकीलाची अथवा कायदा सल्लागाराची मदत घ्यावी असेही वाटत आहे.
पुण्यामधे अशी मदत कुठे मिळु शकेल? (मायबोलीकरांमधे असे कोणी सल्लागार असतील तर त्यांची मदत घेण्याची इच्छा आहे.)
अश्या agreement चा सर्वसाधारण मसुदा काय असतो? आणि कुठले मुद्दे त्यामधे असणे गरजेचे आहे?
एक विनंती आहे इथे वाशीमधील रहण्यार्यांपैकी कोणाला माहीती असल्यास, माझ्या ओळखीतल्या जवळच्या काकांची अपघातामूळे जेवण करू शकत नाहीत. हॉटेलमधील तिखट,तेलकट खाणे पचत नाही.
खूपच वाईट अवस्था आहे त्यांची जेवण्याची. कोणी सांगू शकेल का कुठे साधे शुद्ध शाकाहरी जेवण/डबा मिळेल वाशीत? नाहीतर कोणाला अशी काही कंपनी माहीती आहे का जी जेवण करणारी बाई उपलब्ध करून देतात?
कुठे लिहायचे नक्की कळले नाही व हे खास वाशी मधील साठी होते म्हणून इथे लिहिले. मला ई-मेल केले तर चालेल. धन्यवाद.
मला व माझ्या कुटींबीयाना वाशीतली काहीच माहीती नाही व आता आम्ही मुंबईतच रहात नाही तेव्हा कसे कळणार.
डेनवर कोलोरॅडो येथे कोणी आहेत का मायबोलीकर ?
कोणी डेनवर वासिय असतील तर त्यांनी माझ्याशी कृपया संपर्क साधावा. मी पण येत आहे डेनवर ला.
धन्यवाद.