साहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . म्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..

Submitted by अभि१ on 26 January, 2017 - 09:20

डोंबिवलीत ‘निवडणूक’ संमेलन!
Maharashtra Times | Updated: Jan 24, 2017, 12:37 AM IST
साहित्य महामंडळाद्वारे तयार करण्यात आलेल्या महाकोषातून साहित्य संमेलनाचे आयोजन पूर्णपणे करणे अशक्य असल्याचे वक्तव्य साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषदेत केले. राजकीय यंत्रणांवर संमेलनासारख्या उपक्रमांसाठी अवलंबून असणे चुकीचे असले तरीही सद्यस्थितीमध्ये त्याला पर्याय नसून या परिस्थितीला मराठी लोकच जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ज्याप्रकारे इतर भाषेसाठी इतर भाषिकांमध्ये आत्मियता आहे, त्याप्रमाणे मराठी भाषिकांमध्ये भाषेसाठी मराठी भाषिक काही करत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जर महाकोषातून येणाऱ्या व्याजातून दरवर्षी संमेलनाचे आयोजन करायचे असेल तर ते संमेलन अत्यंत साधेपणाने असले पाहिजे त्याचबरोबर महाकोषामध्ये साधारणपणे प्रतिवर्षी ८०-९०कोटी रुपये असले पाहिजेत. मात्र जनसहभाग कमी असल्यामुळे हे शक्य नसल्याचे यावेळी जोशी यांनी बोलताना सांगितले.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/than...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अरे फुकटयानो , मराठी जनता हुशार आहे. ती योग्य तिथे पैसा देत असतेच. अभय बंग, बाबा आमटे, प्रकाश आमटे, स्नेहालय गिरीश कुलकर्णी, आता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे - नाम , हे सगळे लोक आपल्या परीने जनते करता काम करत आहेत आणि मराठी जनता त्यांना आपल्या परीने मदत करत असतेच.
तुम्हा साहित्यिक लोकांना २/४ दिवसाच्या संमेलन करता ६ कोटी कशाला पाहिजे ? फाईव्ह स्टार नाश्ता, जेवणावळी, संद्याकाळी परत उत्तम नाश्ता, रात्री परत भारी जेवणावळी हे पाहिजे. मागे पंजाब मध्ये काहीतरी संमेलन गाजवले तुम्ही लोकांनी. त्या ट्रेन मध्ये आणि संमेलन च्या ठिकाणी काय काय खायला प्यायला होते. किती गोड पदार्थ होते. कशी उत्तम व्यवस्था होती हीच वर्णने गाजली. नाष्टाला कांदेपोहे , उपमा. जेवणाला साधी पोळी भाजी भात असे पदार्थ ठेवले तर काय मराठी साहित्याचा कडेलोट होणार आहे कि काय ? हे पदार्थ ठेवा. स्वस्तात संमेलन घ्या. पण ते नाही. या पोटार्थी लोकांना जनतेच्या पैशावर पुख्खे झोडायचे आहेत. आणि जनता काय या भिकमाग्याना पैसे द्यायला तयार नाही. तर लगेच हे मराठी जनतेची लायकी काढून मोकळे. ८० / ८० कोटीच्या उड्या मारतात हे भिकारी. १ कोटी जमले आहेत त्यात भागवा नाहीतर राजकारणी लोकांकडे भीक मागा , पण जनतेचे किती प्रेम आहे मराठी भाषेवर हे ठरवायची तुमची लायकी नाही .

Group content visibility: 
Use group defaults

अनिल्चेम्बुर - खल्ले चम्चमित तर कहि बिघदत नहि परन्तु मग मरथि भशिक मरथि सथि कहि करत नहि असे अरोप कर्ने चुकिचे आहे...

लेख पतला... धन्यवाद अभि १

जनतेचे किती प्रेम आहे मराठी भाषेवर हे ठरवायची तुमची लायकी नाही .
<<

मित्रा,

त्यांची लायकी असेल नसेल. "ते" मराठीतले कागदावर "पब्लिश" झालेले "साहित्यिक" आहेत. आपण त्यांची लायकी काढताना आरसा पाहिलात का?

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

मुद्दा अगदीच पटला, गेल्या काही वर्षांपासून वाचत आलोय
साहित्य संमेलनात काही वेगळं होतच नाही, कुणी नवीन विचार मांडत नाहीत, वैचारिक खाद्य मिळत नाही.
जे काय येत ते साहितकांच्या लाथाल्या, बेताल वक्तव्ये, राजकारण्यांनी हायजॅक केला, खायला प्यायला काय होते आणि सोयी कशा होत्या.
सगळे एकजात फुकटे. इतकीच साहित्यसेवा करायची असेल तर स्वतःच्या पैसे खर्च करा नाही तर घरी बसा

साहित्य संमेलने बंदच व्हायला हवीत, ज्यांना वाचायचे ते असेही वाचतात आणि ज्यांना नाही त्यांच्या शेजारी संमेलन भरवले तरी वाचत.

त्या ट्रेन मध्ये आणि संमेलन च्या ठिकाणी काय काय खायला प्यायला होते. किती गोड पदार्थ होते. कशी उत्तम व्यवस्था होती हीच वर्णने गाजली. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंजाब च्या ट्रेन मध्ये लोकांकडून प्रत्येकी ३००० रु. गोळा केले होते त्यांचा खर्च त्यातूनच भागवला गेला . साहित्य संमेलनाच्या वर्गणी शी त्याचा काही संबंध नाही. उलट तीन हजार रुपये भरूनही लोकांचे ट्रेन मध्ये खाण्या पिण्याचे अतोनात हाल झाले होते .
या विषयी पेपर मध्ये सविस्तर बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या , माझे काही मित्र हौसेने गेले होते घुमानला पण अव्यव्स्थेने पस्तावले .
अन तुम्ही उलटे सांगताय .

गेल्या काही वर्षांपासून वाचत आलोय
साहित्य संमेलनात काही वेगळं होतच नाही, कुणी नवीन विचार मांडत नाहीत, वैचारिक खाद्य मिळत नाही.
जे काय येत ते साहितकांच्या लाथाल्या, बेताल वक्तव्ये, राजकारण्यांनी हायजॅक केला, खायला प्यायला काय होते आणि सोयी कशा होत्या.

>>> आशुभाऊ, पेपरातल्या बातम्यांवर ज्यादा भरोसा ठेवू नये, त्यांना चमचमित, मसालेदार, सेन्सेशनल छापायची मजबूरी असते. याचा अर्थ संमेलनात 'फक्त तेवढंच' असतं असं नाही. पेपराने छापले म्हणून ते तसेच नसते. संसदेत फक्त गोंधळच होत असतो हे जे सर्वमान्य होत चाललंय तेही याच फालतू विकाऊ पत्रकारितेचा करिष्मा....

मला वाटतं चार संमेलनं स्वतः बघून तो काय निर्णय घेणे योग्य ठरेल.

विषयाची फारशी माहिती नाही त्यामुळे नो कॉमेंटस
पण 80-90 कोटी .. हा आकडा काही चुकला आहे का? फारच मोठा वाटतोय..
यातले संमेलनाचे बजेट किती असते?
शाहरूख खान एंकर म्हणून असतो का संमेलनात Happy

८०-९० कोटी: दरवर्षी नेहमीच्या ठरलेल्या खर्चाला लागणारे पैसे उपलब्ध व्हायला कोणत्याही संस्थेकडे एक जमाठेव लागते, फिक्स्ड डिपॉझिट. त्यावर मिळणार्‍या व्याजातून हा नेहमीच्या खर्च भागवला जातो. त्या फिक्स रकमेला शास्त्रिय भाषेत काय म्हणतात ते आठवत नाही. तर जोशी जे म्हणत आहेत ते हे की असे ८०-९० कोटी जमले तर संमेलनाला भेडसावणारा निधीचा प्रश्न कायम निकालात निघेल...

माझ्या मते हा शुद्ध बावळटपणा आहे किंवा सरकारी पैसा-जनतेच्या देणगीचा पैसा लुटण्याचा डाव. साहित्यिकांनी असले तारे तोडू नयेत. साहित्यिकांना जर असं वाटत असेल की असा पैसा गोळा व्हावा तर त्यासाठी त्यांनी काहीतरी भरीव प्लान करावा, राबवावा, जनतेत जावे, उपक्रम राबवावे, जरा अंगमेहनत, मेंदूमेहनत करावी... बसल्या जागी सांस्कृतिक मंत्रालयाकडून ८०-९० कोटीचा सीड फंड (येस, बहुतेक सीड फंड म्हणतात) मिळवायला कोण लागून गेलेत हे...?

धाग्यात दिलेली लिंक अपूर्ण आहे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/than...

नानाकळा, ८०-९० कोटी सांस्कृतिक मंत्रालयाकडे मागितल्याचे कुठे दिसले?

साहित्य संमेलनासाठी सरकारी (राज्य शासन/ स्था. स्व.संस्थांच्या)मदतीवर अवलंबून राहावं लागू नये म्हणून महाकोशाची कल्पना पुढे आली. तो मराठी भाषकांकडून, साहित्यप्रेमींकडून उभा रहावा अशी कल्पना आहे.

यंदाच्या संमेलनाचं बजेट साडेपाच कोटींचं आहे म्हणे. आता यात जेवणावरचा खर्च सर्वाधिक असेल असे वाटत नाही. (ते साडेपाच कोटीच जमवता येत नाहीएत, असं बातमीत म्हटलंय) .प्रतिवर्षी साडेपाच कोटी खर्च करायला महाकोश ८०-९० कोटींचा का असायला हवा ते कळले नाही. महामंडळाला करसवलत नाही असं समजायचं का?

भरत, माय बॅड, मला वाटलं लोकांकडे म्हणजे परत सरकारकडेच की काय? सॉरी...

तरी ते ८०-९० कोटी कशाला हवेत ते कळलं नाही. जर लोकांकडूनच देणगीस्वरुपात पैसे गोळा करायचे आहे तर मग धागाकर्ते का चिडलेत एवढे.

भरत,
८०-९० कोटींवर ८ टक्क्यांनी ६.४ ते ७.२ कोटी रु. इतके व्याज मिळेल. त्यातून संमेलनाचा खर्च, महामंडळाचा वार्षिक खर्च निघून शिवाय भविष्यातल्या महागाईची तरतूद म्हणून शिल्लक पडून मुद्दलात भर पडली पाहिजे. वार्षिक खर्चात नियमित आणि नैमित्तिक होणारे चर्चा/परिसंवाद, व्याख्याने या गोष्टी तर येतातच, शिवाय स्थावर मालमत्तेची देखभाल, डागडुजी हा मोठा खर्च असतो. साहित्यिक संस्थांना करसवलत असेल तर तेव्हढाच दिलासा.

८ % हा किमान (सरकारी बचत योजनांतला व्याज दर झाला). त्यांना अन्यत्र जास्त व्याज /रिटर्न मिळू शकेल -१०% पर्यंत तरी.
महाकोश फक्त संमेलनासाठीच असेल अशी माझी समजूत आहे.

पण ठीक आहे .८०-९० तर ८०-९०. जमा होण्याची शक्यता नाहीच्याच जवळ.

शेवटी संमेलन ही एक साहित्य जत्रा आहे. त्यात हौशे गवशे नवशे सगळे आले. कुणीही आयोजक जास्तीत जास्त निधी गोळा करण्याचा प्रयत्न करणारच!

अन्य भारतीय भाषा-विशेषतः गुजराती-मध्ये चांगले दणकट प्रायोजक मिळतात. (गुजरातीतला साहित्यव्यवहार आश्चर्यकारक असा मोठा आहे, पण ते जाऊ दे.) मराठीला आतापर्यंत प्रामुख्याने राजकीय प्रायोजक मिळाले. खाजगी मदत पुरेशी नसते. राजकीय प्रायोजक संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांसकट पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतात. संमेलन यशस्वी आणि दिमाखदार होणे ही गोष्ट पूर्ण गाव/मतदारसंघासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आणि अभिमानाची असते. पण मग राजकारण्यांनी संमेलन हाय्जॅक केले अशी हाकाटी होते. व्यासपीठावर राजकारणी नकोत असे फतवे निघतात. मराठी लोकांची साहित्यव्यवहारासंबंधीची कडकी तर प्रसिद्धच.
मग पैसे आणायचे कुठून?
एका साहित्यसंमेलनामुळे साहित्यविश्वातली वर्षभराची मरगळ झटकली जाते. पुस्तकविक्रेते, प्रकाशक आपापल्या विकल्या न गेलेल्या पुस्तकसाठ्यावरची धूळ झटकून पुस्तकांचे गठ्ठे काखोटीला घेऊन संमेलनाच्या दिशेने निघतात. लोकप्रिय पुस्तकेही नव्याने निघतात, खपतात. महानगरांपासून दूर राहाणार्‍या साहित्यप्रेमी जनतेसाठीसुद्धा ही एक पर्वणी असते. साहित्यिकांना बोलताना वावरताना पाहता यावे, ऐकता यावे म्हणून ते आसुसलेले असतात. कविजन कविता सादर करण्यासाठी टपलेले असतात. साक्षेपी वाचक पुस्तकठेल्यांवर काही महत्त्वाचे सापडतेय का याच्या शोधात असतात.
कधी कधी मंडपात लेखकांपेक्षा कार्यकर्ते. प्रकाशक, त्यांचे मदतनीस हेच जास्त असतात. पण असू देत. तेही साहित्यविश्वातलेच असतात.
एकंदर ठीक असते.

५ ते ६ कोटी आत्ताच्या संमेलन करता हवे आहेत. त्यांचे बेत ७०/८० कोटींचा फंड निर्माण करण्याचे आहेत. शेखचिल्ली स्वप्न आहेत हि. आणि परत हे लोक काही धडगुणांचे नाहीत. मागे त्या कौतिक राव ठाले पाटलांनी विश्व मराठी संमेलन च्या नावाखाली फुकटात अमेरिका / मौरिशस , युरोप ट्रिप मारायचे प्लॅन आखले होते. कॅनडा ( का अमेरिका ) नक्की आठवत नाही, तिथे लाज गेली या फुकट्यांची. त्या मुळे यांना कोणी तितकं फंड दिला तरी तो सर्व फुंकून हे लोक परत कटोरा घेऊन राजकारणी / खाजगी प्रायोजक / जनता यांच्या समोर नक्की उभे राहणार .

बिनकामाचे ८० ते ९० कोटी अडकवून ठेवण्यापेक्षा त्यातून एखादी इमारत, सभागृह बांधावे. त्यातून येणा-या भाड्यातून खर्चही निघेल आणि दरवर्षी शिल्लकही पडेल. शिवाय ज्या कुठल्या शहरात सभागृह असेल तिथे हक्काने कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध होईल.

कठीण आहे हो मराठीचं.
मराठी लोकच फारसे मराठी शब्द वापरत नाहीत बोलण्यात.
इथे मायबोली चालू केली मराठी लिहिता वाचता यावे म्हणून - तर परवा इथे इंग्रजी नि हिंदी भाषेत लेख आला. मराठीत लिहा म्हंटल्यावर लेखकाला राग आला - भाषा बघू नका म्हणाले.
अहो इथे आम्ही परदेशी लोक आपली मराठी लिहीता वाचता यावी म्हणून येतो, इथेहि हिंदी नि इंग्रजी? नि वर शिरजोरी - भाषा बघू नका!
असले हे मराठी लोकं. कसले डोंबलाचे मराठी साहित्य? मासिकातल्या लेखांत कितपत मराठी असते?

मला वाटते खरी पोटदुखी कुणा दुसर्‍याला चमचमित जेवण मिळते नि मला नाही. भाषा, कोण पैसे देतात, हे सर्व गौण.

बिनकामाचे ८० ते ९० कोटी अडकवून ठेवण्यापेक्षा >> ते शेअर बाजारात गुंतवावेत. त्यासाठी निवडक साहीत्यिकांना शेअर बाजार तंत्र आणि मंत्र शिकवावे. शेअर बाजारावर पुस्तक लिहीणारास साहीत्यसंमेलनाचा अध्यक्ष बनवावे. उद्घाटक म्हणून शेअर बाहारातील बैल बोलवावेत. त्यांच्याकडून देणग्या आणि टिपा मिळतील. जो साहीत्यिक अचूक गुंतवणुकीतून जास्त पैसे मिळवून देईल त्यास मसापचा पदाधिकारी बनवावे. अशा रितीने साहीत्यिक बिझी राहतील. त्यांना अर्थव्यवस्थेचं भान येईल आणि इथून पुढे जास्त प्रॅक्टीकल लिहीले जाईल.

'८०-९० कोटी रुपयांतून सभागृह बांधावे..'
त्यापेक्षा ८०-९० कोटी आधी जमवावे आणि मग त्यातून कर्जत बिर्जतला परवडणारी घरे बांधावीत. मंदी कुठेच नाहीय. ही घरे भराभर विकली जातील .मग आलेल्या पैशातून पळसदरी वगैरेला पुन्हा घरे बांधावी. असे चालू ठेवावे. काँग्रेसच्या जमान्यातले जुनेपुराणे म्हाडा विसर्जित करून नवी 'दारिद्र्यनिर्मूलकअल्पमूल्यगृहरचनासाहित्यमंडल' ही शिखरसंस्था व्हावी. नावात साहित्य असले की झाले.

>>>>> तुम्हा साहित्यिक लोकांना २/४ दिवसाच्या संमेलन करता ६ कोटी कशाला पाहिजे ? <<<<
ज्या कुणी महाराष्ट्रात आपल्या एक (वा अनेक) कन्येचा विवाह स्वहिमतीवर केला असेल, त्याला सहसा असले प्रश्न पडणार नाहीत, असे मला वाटते. Happy
पण आयुष्यात, मी राजा, माझी पत्नी राणी अन माझी मुलेबाळे राजकन्याराजकुमारी अशा चौकोनी कुटुंबास आयुष्यभर पोसणार्‍यांस, पाहुणे आले तरी येऊन येऊन चार पाच, रहाणार दोन तिन दिवस, इतकाच अनुभव गाठीशी असलेल्यांना, तसेच ज्यांचे हातुन कधीच गावजेवण वगैरे राहूदे, देवधर्माचा भंडाराही आयोजित झाला नसेल, वा आयोजनात सहभाग नसेल, गेला बाजार बायांच्या भिशीच्या बैठकीच्या दहावीस जणींना खाऊपिऊ घालण्याची संधीही ज्यांनी अनुभवली नसेल, त्यांनाच "इतका खर्च" कसा येऊ शकतो असे प्रश्न पडू शकतात , असे माझे मत.

>>> लिंब्या !!! चक्क योगी लोकांचा पक्ष सोडून भोगी लोकांच्या पक्षात ? <<<<
कोण योगी? कोण भोगी? काय संबंध?

मी फक्त वास्तव मांडले. च्यामारि इथे साधे पानपट्टीवर गेले तरी पाचपंचवीस रुपड्या खर्च होतात. अन ते काहीहीऽऽ फुक्कट मिळत नाही.

ज्या कुणी महाराष्ट्रात आपल्या एक (वा अनेक) कन्येचा विवाह स्वहिमतीवर केला असेल, त्याला सहसा असले प्रश्न पडणार नाहीत, असे मला वाटते. Happy
पण आयुष्यात, मी राजा, माझी पत्नी राणी अन माझी मुलेबाळे राजकन्याराजकुमारी अशा चौकोनी कुटुंबास आयुष्यभर पोसणार्‍यांस, पाहुणे आले तरी येऊन येऊन चार पाच, रहाणार दोन तिन दिवस, इतकाच अनुभव गाठीशी असलेल्यांना, तसेच ज्यांचे हातुन कधीच गावजेवण वगैरे राहूदे, देवधर्माचा भंडाराही आयोजित झाला नसेल, वा आयोजनात सहभाग नसेल, गेला बाजार बायांच्या भिशीच्या बैठकीच्या दहावीस जणींना खाऊपिऊ घालण्याची संधीही ज्यांनी अनुभवली नसेल, त्यांनाच "इतका खर्च" कसा येऊ शकतो असे प्रश्न पडू शकतात , असे माझे मत.>>>>>>>>>>>> अनाकलनीय आहे हे.

लिंटि, ६ कोटीssssssssssss

बोंबलाचा रस्सा, सुकटीची चटणी, सोडे, झिंगे, चिकन, मटण .... जे पाहीजे ते ठेवा. ८ कोटी रु. त फिरते हॉटेल सुरू करता येईल साहीत्य संमेलनाच्या मालकीचे.

मी सध्या नॅशनल बिलयर्ड्स करतोय कव्हर. देशभरातून पंकज अडवाणी सारखे सगळे दिगग्ज खेळाडू आहेत. 22 दिवस आणि खेळाडू 1000 हुन जास्त. बरं हा सगळा श्रीमंती थाटाचा खेळ आहे त्यामुळे भागवणे प्रकार नाही. तरी त्यांचा खर्च सहा कोटीच्या वर जात नाही.
आणि इथे यांचे काय कौतुक आहे. लिबुभौ पाहुणे येणे ठीक आहे, पण पाहुण्यांना किती खायला घालायचे आणि मलिदा आपणच किती खायचा याचेही एकदा प्रमाण येऊ द्या कि

खर्चाची नेमकी गणितं नाही माहित....पण ज्या उद्देशाने ही संमेलंनं होतात / अध्यक्ष अती मोठ्ठं भाषण देतात....एका वर्षात मराठीच्या समस्या सोडवण्यासाठी भारी भारी योजना आखतात....तर या सगळ्याचं पुढे काय होतं ?

बरेच प्रॉब्लेम आहेत!

एकतर ज्यांच्या नावावर गर्दी खेचता येइल असे साहित्यिक फारच मोजके उरलेत..... जे खरे प्रतिभावंत आहेत ते या असल्या जत्रांपासून लांब रहाणेच पसंत करतात कारण या सम्मेलन आणि परिषदांभोवती प्रसिद्दीलोलूप पदाधिकाऱ्यांचा पडलेला गराडा!
सम्मेलनअध्यक्ष पदासाठी निवडणूका म्हणजे अजून एक चुकीचा पायंडा.... जिथे निवडणूका आल्या तिथे राजकारण आले आणि जिथे राजकारण आले तिथे चांगले काहीच उरत नाही!

खर म्हणजे कुठलाही राजाश्रय न घेता मिफ्टा वगैरेच्या धरतीवर व्यावसायिक प्रायोजक मिळवून दर्जेदार साहित्यसोहळा करता येईल पण तो दिवस येइल तो साहित्यप्रेमींसाठी सुदिन!

पूर्वी गावात येणाऱ्या साहित्यिकांचे यजमानपद भूषविण्यासाठी गावातल्या मान्यवरांच्यात चढाओढ असायची.... आता असे यजमानही नाही राहीले आणि अश्या साध्यासुध्या घरगुती अगत्याचा सन्मान करणारे साहित्यिक तरी कितीसे असतील?

वर्षातून एकदा सार्वजनिक गणपती बसवला जातो तसंच साहीत्य संमेलनाच्या अध्यक्षांचं असतं. खूप अपेक्षा ठेवता तुम्ही लोक !