नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.
'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).
३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या निवडलेल्या २ संस्था.
रोजच्या व्यवहारातील इंग्रजी साक्षरता या दृष्टीने आपण काही सल्ला देऊ शकाल?
काय हवे आहे.
कल्पना करा की भारतातील प्रौढ आणि प्राथमिक शिक्षण झालेल्या व्यक्तिला इंग्रजी शिकवायचे आहे. ते पुस्तकी नको. रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द हवे. अगदी बेसिक चालेल. मग अॅडव्हान्स्डबाबत विचार करु.
इंग्रजी मराठीतून शिकवायचे आहे.
काय शिकवावे आणि कसे (मेथड) या दोन्ही बाबत कृपया लिहा.
सध्या एवढेच जमले आहे.
शब्दसंपदा : - २ अक्षरी शब्द, ३ अक्षरी शब्द, ४ अक्षरी शब्द शिकवून उच्चाराप्रमाणे त्याचे स्पेलिंग कसे येते हे शिकवणे. (Phonetics)
नुकताच मामाचा मृत्यु झाला त्यावेळेस, व त्या आधीही कित्येक वेळेस असा अनुभव आला की मृतकाचा दाह सन्स्कार झाल्यादिवशीच्या लगेचच्या रात्री जर मृतकाचे घरी (किन्वा ज्या घरी दिवा लावला जातो तिथे) राहिले तर पुढील दहा दिवस तिथेच रहावे लागते अशा काहीशा गैरसमजुतीतून (किन्वा त्या गैरसमजुतीचा अजुनच गैरफायदा घेत), सर्वजण तेथून पळ काढतात. याबाबतीत काही जळजळीत अनुभव आल्याने, त्यावरील मते जाणून घेण्यासाठी, व अशा अनेक वेळी, मी काय कृती केली हे सान्गण्यासाठी हा धागा उघडला आहे.
जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नविन वर्षाचे संकल्प सोडत २००९ साल सुरु झालं आणि बघता बघता संपलं देखिल. त्यावेळी म्हणजे जानेवारी २००९ च्या पहिल्या आठवड्यात समविचारी समाजशील मायबोलीकरांनी एकत्र येऊन ’सुपंथ’ ह्या मदत गटाची स्थापना केली (मायबोलीवरचा हा बीबी - ), गेल्या वर्षभरात सुपंथला काय करायचं होतं, काय केलं, कुठपर्यंत मजल मारली ह्याचा थोडक्यात आढावा पुढे ठेवताना आम्हाला कोण आनंद होत आहे.
ह्या गप्पा इंग्रजीत झाल्या. त्यातले विचार समिताचे आहेत, पण मराठीतले भाषांतर माझे आहे.
हा धागा २० ऑगस्टला प्रकाशीत केला आहे. वर दिसणारी तारीख मसुदा तयार केल्याची तारीख आहे..
समिता शहा
२००९मधे दहार्वीत ८० पेक्षा जास्त पर्सेट मिळवलेल्या आणि पुढे शिकण्यास आर्थिक अडचण असणार्या विद्यर्थ्याना पुद्यिल शिक्षणासाठी आर्थिक मदत न्.जी.ओ. प्रेरणा( इन्फोसिसद्वारा प्रेरित )कडुन मिळु शकेल.