‘अर्थार्जन करणार्‍या महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण' : माहिती, प्रतिबंध व उपाय

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 August, 2010 - 05:38

जगाच्या पाठीवर सर्वच स्त्रियांना कधी ना कधी लैंगिक शोषणाचा / उपद्रवाचा सामना करावा लागतो. अश्लील शेरे, स्पर्श, शीळ, कटाक्ष वगैरे गोष्टी तर नेहमीच्याच असतात. कदाचित त्यांना सामान्य असेही म्हणता येईल. आणि अर्थार्जन करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांनाही अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. अनेकदा पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात पदार्पण करताना स्त्रियांना त्याचा जास्तच उपद्रव होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण हे एकाप्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे. त्यात भेदभाव करण्याची, गैरफायदा घेण्याची वृत्ती ठासून भरलेली असून भीती, दहशत, धोका यांच्या बळावर ही प्रवृत्ती अजूनच फोफावताना दिसते.

भारतासारख्या देशातही पुरुषांनी स्त्रियांवरचे आपले वर्चस्व, हुकुमत वेगवेगळ्या प्रकारे सिद्ध करणे ही काही नवी गोष्ट नाही. लैंगिक शोषण हे त्याचाच एक भाग म्हणता येईल. त्याचा उद्देश स्त्रियांना त्यांची कमजोरी, दुर्बलता आणि दुय्यम दर्जा दाखवून देणे हा आहे. ज्या समाजात स्त्रियांसंदर्भात थेट व अप्रत्यक्ष स्वरूपातील हिंसा ही पुरुषप्रधान संस्कृतीचाच एक हिस्सा मानली जाते तिथे स्त्रियांनी त्यांच्या भूमिकेला साजेसे वर्तन करणे अपेक्षित असते व तसेच करवूनही घेतले जाते. ह्या पुरुषप्रधान नीतीमूल्यांची आणि स्त्री-पुरुषांच्या दृष्टीकोनाचीच लैंगिक शोषण थांबवण्यास मुख्य अडचण होते.

लैंगिक शोषण हे अनेकदा अंतर्गत, छुपे आणि सर्व प्रकारच्या संघटनात अस्तित्वात असते हे ह्याअगोदर झालेल्या अभ्यास सर्वेक्षणांवरून सिद्ध झाले आहे. तरीही त्याकडे एक समस्या म्हणून पाहिले जात नाही. त्याचे पायरी-पायरीने उच्चाटन करण्याकडे कल दिसत नाही. जवळपास काम करणाऱ्या ४० ते ६० टक्के स्त्रियांना भेडसावणारी ही समस्या आहे. आणि स्त्रिया व नोकरदाते दोघांसाठीही तेवढीच काळजी करायला लावणारी बाब आहे.

तेव्हा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाविरुध्द लढा द्यायचा तर प्रथम लैंगिक शोषण म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायला हवे. तसेच सहकारी, कर्मचारी, मित्रमंडळी, प्रशासक, एम्प्लॉयर्स आणि कायदा निर्माण करणारे.... सर्वांच्याच दृष्टीकोनात बदल घडवून आणणे कसे जरुरीचे आहे हेही जाणायला हवे.

प्रस्तुत लेखात ह्याविषयाच्या विविध पैलूंना एकत्र संकलित करून त्यांसंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

लैंगिक शोषण : कायदा काय सांगतो?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार

According to The Supreme Court definition, sexual harassment is any unwelcome sexually determined behaviour, such as:-

Physical contact
A demand or request for sexual favours
Sexually coloured remarks
Showing pornography
Any other physical, verbal or non-verbal conduct of a sexual nature.

Sexual Harassment takes place if a person:

subjects another person to an unwelcome act of physical intimacy, like grabbing, brushing, touching, pinching etc.

makes an unwelcome demand or request (whether directly or by implication) for sexual favours from another person, and further makes it a condition for employment/payment of wages/increment/promotion etc.

makes an unwelcome remark with sexual connotations, like sexually explicit compliments/cracking loud jokes with sexual connotations/ making sexist remarks etc.

shows a person any sexually explicit visual material, in the form of pictures/cartoons/pin-ups/calendars/screen savers on computers/any offensive written material/pornographic e-mails, etc.

engages in any other unwelcome conduct of a sexual nature, which could be verbal, or even non-verbal, like staring to make the other person uncomfortable, making offensive gestures, kissing sounds, etc.

It is sexual harassment if a supervisor requests sexual favours from a junior in return for promotion or other benefits or threatens to sack for non-cooperation.

It is also sexual harassment for a boss to make intrusive inquiries into the private lives of employees, or persistently ask them out.

It is sexual harassment for a group of workers to joke and snigger amongst themselves about sexual conduct in an attempt to humiliate or embarrass another person.

Quid pro quo and hostile work environment are the two broad types of sexual harassment.

Sexual harassment at workplace is generally classified into two distinct types. 'Quid pro quo', means seeking sexual favours or advances in exchange for work benefits and it occurs when consent to sexually explicit behaviour or speech is made a condition for employment or refusal to comply with a 'request' is met with retaliatory action such as dismissal, demotion, difficult work conditions. 'Hostile working environment' is more pervasive form of sexual harassment involving work conditions or behaviour that make the work environment 'hostile' for the woman to be in. Certain sexist remarks, display of pornography or sexist/obscene graffiti, physical contact/brushing against female employees are some examples of hostile work environment, which are not made conditions for employment.

UNWELCOME

UNWELCOME is the key in defining sexual harassment. It is the impact and effect the behaviour has on the recipient that will define the behaviour as sexual harassment.

What is a workplace? A workplace is any place where working relationships exist, where employer - employee relations exist.

कोणत्या कायद्याच्या अंतर्गत लैंगिक शोषणाच्या केसेसमध्ये दावा ठोकता येतो?

Laws Under Which A Case Can Be Filed
Section 209, IPC deals with obscene acts and songs and lays down:

Whoever, to the annoyance of others:

does any obscene act in any public place or
sings, recites or utters any obscene song, ballad or words in or near any public place, shall be punished with imprisonment of either description for a term, which may extend to 3 months or with fine or both. (Cognizable, bailable and triable offense).
Section 354, IPC deals with assault or criminal force to a woman with the intent to outrage her modesty and lays down that:

Whoever assaults or uses criminal force to any woman, intending to outrage or knowing it to be likely that he will thereby outrage her modesty, shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years, or with fine or both.

Section 509, IPC deals with word, gesture or act intended to insult the modesty of a woman and lays down that:

Whoever intending to insult the modesty of any woman utters any word, makes any sound or gesture, or exhibits any object intending that such word or sound shall be heard, or that such gesture or object shall be seen by such woman, or intrudes upon the privacy of such woman, shall be punished with simple imprisonment for a term which may extend to one year, or with fine, or both. (Cognizable and bailable offense).

Civil suit can be filed for damages under tort laws. That is, the basis for filing the case would be mental anguish, physical harassment, loss of income and employment caused by the sexual harassment.

Under the Indecent Representation of Women (Prohibition) Act (1987) if an individual harasses another with books, photographs, paintings, films, pamphlets, packages, etc. containing "indecent representation of women"; they are liable for a minimum sentence of 2 years. Further section 7 (Offenses by Companies) holds companies where there has been "indecent representation of women" (such as the display of pornography) on the premises guilty of offenses under this act, with a minimum sentence of 2 years.

(संदर्भ : http://www.tax4india.com/indian-laws/labour-law/sexual-harrasment-at-wor...)

जरा हीच माहिती मराठीत पाहूयात.

(रागिणी चंद्रात्रे ह्यांच्या लोकसत्तामध्ये छापून आलेल्या लेखातून साभार)

अर्थार्जन करणार्‍या स्त्रियांना नोकरीचे ठिकाणी सहन कराव्या लागणार्‍या लैंगिक छळास Women Sexual Harrassment at Work Place (WSHWP) ‘महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारेलैंगिक शोषण‘ अशी संज्ञा आहे.

स्त्रीच्या मनाविरुद्ध केलेला कोणताही शारीरिक जवळिकीचा प्रयत्न ‘लैंगिक शोषण‘ या सदरात मोडतो. अगदी बॉसपासून, सहकारी, कनिष्ठ कर्मचारी, ऑफिसमध्ये कामाला असलेली कोणीही व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे अशी मनाविरुध्द शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करत असेल तर ते ह्याच प्रकारात मोडते. स्त्रियांसमोर अश्लील विनोद करणे, त्यांच्या दिसण्यावरून, पोषाखावरून भाष्य करणे, ऑफिसचे काम करताना द्वयर्थी (वरवर सहज, पण ज्यातून अश्लील अर्थ सूचित होऊ शकतो अशी) भाषा वापरणे, स्त्री-कर्मचार्‍यांच्या मनावर विचित्र ताण येईल असे वागणे... हे सर्वच प्रकार लैंगिक शोषणामध्ये मोडतात. याशिवाय काम करताना उगाचच स्पर्श करणे, रोखून पाहत राहणे, अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करणे, लिफ्टमध्ये मुद्दाम स्त्री-सहकार्‍यांना चिकटून उभे राहणे, स्वच्छतागृहात अश्लील मजकूर लिहिणे, कधी कधी पारदर्शक केबिनमधून मुद्दाम एखादीकडे एकटक रोखून पाहत राहणे, इ. प्रकारे स्त्रियांचे शोषण होऊ शकते.

या सर्वच प्रकारांमुळे महिलांना कार्यालयात निरोगी वातावरण मिळू शकत नाही. त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होतो. एखादा अश्लील टोमणा त्यांचा अख्खा दिवस बरबाद करू शकतो. या सगळ्याची तक्रार कुठे करावी? घरच्यांना सांगावे का? ते ही अडचण समजून घेतील का? अशा अनेक प्रश्नांनी कर्मचारी महिला त्रस्त होत असतात.

कोणत्याही वयोगटातील स्त्रियांचे कार्यालयांत अशा प्रकारे लैंगिकशोषण होऊ शकते. बॉस, बरोबरचे सहकारी, चतुर्थश्रेणी कामगार अशा कोणाकडूनही हे शोषण होऊ शकते. अशा संबंधांना संमती न दिल्यास वा त्याबद्दल तक्रार केल्यास बढती नाकारणे, अन्य तर्‍हेने त्रास देणे असे प्रकारही अनेक कार्यालयांतून घडताना दिसतात.

घटनेच्या ‘१९-अ‘ या कलमानुसार, प्रत्येक व्यक्तीला कोणताही व्यवसाय वा नोकरी आत्मसन्मानपूर्वक करण्याचा अधिकार आहे. स्त्रियांच्या या हक्कावर वर उल्लेखिलेले प्रकार गदा आणतात आणि म्हणून ते दंडनीय आहेत. तरीही १९९७ पर्यंत अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी किंवा त्यांची तक्रार करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. ९७ साली राजस्थानातील भँवरीदेवी या ग्रामसेविकेने एका अल्पवयीन मुलीचा होणारा विवाह थांबविण्याचा प्रयत्न केला. हे सहन न होऊन विवाहात सहभागी असणार्‍या उच्चवर्णीय व्यक्तींनी भँवरीदेवीवर सामूहिक बलात्कार केला. भँवरीदेवी आपले सरकारी कर्तव्य बजावत असताना हा प्रसंग तिच्यावर उद्‌भवला. एक प्रकारे हे तिचे कामकाजाच्या ठिकाणी झालेले लैंगिक शोषणच होते. मात्र, त्यावेळी कायदा तिला कोणतीही मदत करू शकला नाही. कारण या गुन्ह्यासंबंधी कोणतीच कायदेशीर तरतूद तेव्हा नव्हती. या घटनेसंबंधात राजस्थानातील स्वयंसेवी महिला संघटनांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात राजस्थान सरकारविरुद्ध खटला दाखल केला. ही केस ''VISHAKHA AND OTHERS VS RAJASTHAN STATE'' या नावाने ओळखली जाते.

या केसच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने WHWP साठी काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. त्या-नुसार सर्व सरकारी, निमसरकारी, खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांत महिलांच्या होणार्‍या लैंगिक शोषणाची तक्रार ऐकून निवाडा देण्यासाठी एक ''Women Complaints Committee'' असावी व त्यात ५० टक्के सदस्य महिला असाव्यात, स्वयंसेवी महिला संघटना, महिला आयोग यांचे प्रतिनिधी असावेत, तसेच कायदेतज्ज्ञ, तक्रार करणारी स्त्री व ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे तो पुरुष या दोघांच्याही खात्याचे प्रमुख त्या कमिटीत असावेत व स्त्रियांनी या कमिटीकडे आपली तक्रार मांडावी, असे म्हटले. त्यानंतर अशी कमिटी प्रत्येक कार्यालयात, विद्यापीठांत, महाविद्यालये, हॉस्पिटल सर्वच ठिकाणी अनिवार्य केली आहे.

या कमिटीपुढे जेव्हा एखादी महिला आपल्या शोषणाबद्दल लेखी तक्रार करते, तेव्हा कमिटीचे सदस्य तिची तक्रार व दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतात. सर्व रेकॉर्डस्‌ तपासतात. याद्वारे सत्यशोधनाचा प्रयत्न करतात व दोषी ठरलेल्या कर्मचार्‍याची पगारवाढ थांबवणे किंवा त्याची शिक्षा तत्त्वावर बदली करणे, अशा प्रकारच्या शिक्षा देऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. येथेही महिलेला न्याय न मिळाल्यास ती राज्य महिला आयोग किंवा न्यायालयात दाद मागू शकते.

महिला आयोग व महिला संघटनांच्या प्रयत्नांमुळे स्त्रियांच्या कार्यालयीन ठिकाणी होणार्‍या शोषणाला पायबंद घालण्यासाठी प्रतिबंधक कायदा बनविण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्यातील काही तपशिलाच्या मुद्द्यांवरून हा कायदा तयार होण्याच्या प्रक्रियेत अडकला आहे. लवकरच तो तयार होईल, अशी आशा आहे.

जोवर आपल्या समाजात स्त्री-पुरुष समानतेची कल्पना पूर्णपणे रुजत नाही व स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून तीही व्यक्ती आहे, याचे भान समाजाला येत नाही, तोवर अशा समस्या निर्माण होतच राहणार. यासाठी योग्य त्या कायदेशीर तरतुदी, वर उल्लेखिलेल्या समित्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण सर्वात महत्त्वाची जबाबदारी समंजस व आधुनिक युगात एकत्र काम करणार्‍या स्त्री-पुरुषांची आहे. आपल्या कार्यालयातील वातावरण निरोगी असावे, लिंगभेदापलीकडे एक निखळ मैत्रीचे नाते स्त्री-पुरुष कर्मचार्‍यांमध्ये असावे, असा प्रयत्न उभयपक्षी नक्कीच करता येईल. स्त्री-कर्मचार्‍यांसमोर अश्लील बोलणारा पुरुष एखादाच असतो. उरलेल्यांनी त्याला दाद देणे बंद केले व असले बोलणे इथे चालणार नाही, असे सुनावले, तर तो नक्कीच ताळ्यावर येऊ शकेल.

''Women Complaint Committee'' कडे स्त्रीची तक्रार गेल्यावर त्याची दखल घेऊन चौकशी प्रक्रिया पूर्ण व्हायला सहा महिने ते एक वर्षही लागू शकते. या काळात त्या स्त्रीला आपले मनोबल टिकवणे, ही तारेवरची कसरत असते. आरोप-प्रत्यारोप, चर्चा होत असतात. प्रसंगी पुरुष कर्मचार्‍यांकडून या स्त्रीचेच चारित्र्य चांगले नाही, असा अपप्रचारदेखील केला जाऊ शकतो.

एका केसमध्ये हे चौकशीचे काम सुरू असताना (२३ वर्षे नोकरी झालेल्या स्त्री-अधिकार्‍याने ही तक्रार केलेली होती.), या स्त्रीबरोबर आम्ही कामच करणार नाही, असा पवित्रा पुरुष कर्मचार्‍यांनी घेतला होता. अशा परिस्थितीत अन्यायग्रस्त स्त्रीला सर्वतोपरी मदत करणे, तिचे मनोबल वाढण्यासाठी तिला धीर देणे, हे काम तिच्या ऑफिसमधील मैत्रिणींनीच करायला हवे.

कार्यालयीन कामाच्या वेळात आपल्या कर्तव्याबाबत कठोर राहणे, कार्यसंस्कृती जोपासणे, कार्यालयात काम करताना वापरायला योग्य अशाच कपड्यांचा (Office Wears) वापर करणे, आपले वागणे सतत तपासत राहणे, काम करताना वावरताना पुरुष कर्मचार्‍यांना आपल्या वागण्यातून योग्य तेच संदेश मिळतील, अशा प्रकारची देहबोली ठेवणे- हे सर्व स्त्री-कर्मचार्‍यांनी जाणीवपूर्वक करायला हवे.

कार्यालयात शोषणाचे असे प्रकार होत असतील तर त्या स्त्रीला याविषयी कोणाशी बोलावे, कोणाजवळ तक्रार करावी, असा संभ्रम असू शकतो. तिच्या सहकारी मैत्रिणी चुकीचे वागणार्‍या पुरुष कर्मचार्‍याला योग्य शब्दांत समज द्यायला त्या महिलेला मदत करू शकतात. पण यासाठी महिला कर्मचार्‍यांनी आपसात भगिनीभाव जोपासायला हवा. अशा प्रसंगात ‘मला काय त्याचे? मला तर असा अनुभव येत नाही ना?‘ असा त्रयस्थ विचार न करता मैत्रिणीला मदत करण्याची वृत्ती ठेवायला हवी. आपल्या परिसरात सक्रीय महिला संघटनेची माहिती घेऊन तीमार्फतही हा प्रश्न सोडवू शकतो. डोंबिवलीची ‘परिवर्तन‘ ही संस्था याबाबतीत उल्लेखनीय कार्य करत आहे.

काही खबरदारीचे उपायही आहेत.

प्रत्येक कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी आपल्या कार्यालयात ‘महिला तक्रार निवारण समिती‘ आहे का, याची माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कार्यालयीन लैंगिक शोषणाची तक्रार महिलेला आधी आपल्या कार्यालयाच्या ‘महिला तक्रार समिती‘कडेच करणे बंधनकारक आहे. जर ही समिती योग्य कारवाई करत नसेल किंवा त्यास विनाकारण विलंब होत असेल तर महिला आयोग त्यात हस्तक्षेप करू शकतो. पण सर्वात आधी लेखी तक्रार कार्यालयातील महिला समितीकडेच करणे आवश्यक असते. १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशी समिती प्रत्येक कार्यालयात अनिवार्य केली गेली आहे. पण आजही अशी समिती अनेक कार्यालयांत स्थापन केली गेलेली नाही असे आढळून येते. याला सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. एखाद्या महिलेची तक्रार आल्यानंतर ‘महिला तक्रार समिती‘ नेमली जाते. यामुळे त्या प्रकरणाची तड लागायला वेळ लागतो. महिलेला होणारा मनःस्ताप वाढतो. यासाठी असे प्रकार कार्यालयात घडत असोत अगर नसोत, अशी समिती योग्य सदस्यांच्या निवडीसह नेमलेली असलीच पाहिजे, असा आग्रह प्रत्येकीने आपल्या व्यवस्थापनाकडे धरला पाहिजे. वारंवार लक्ष वेधूनही अशी समिती स्थापन करण्यात वेळकाढूपणा होत असेल, तर त्याची तक्रार महिला आयोगाकडे करता येते. महिला आयोग संबंधित कार्यालयातील व्यवस्थापनाला याचा जाब विचारून समिती गठन करणे भाग पाडतो. कार्यालयीन तक्रार समितीतर्फे आरोपी पुरुष कर्मचार्‍याची पगारवाढ थांबवणे किंवा शिक्षा तत्त्वावर बदली करणे अशी पावले उचलता येतात. प्रकरण अधिक गंभीर असल्यास ते न्यायालयाकडे सुपूर्द केले जाते व त्या कर्मचार्‍यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याला दोन ते तीन वर्षांपर्यंत कारावासही होऊ शकतो. नवीन होऊ घातलेल्या कायद्यान्वये अशा प्रकरणांत स्त्रियांना अधिक संरक्षण व कायदेशीर तरतुदींचा लाभ होऊ शकेल.

मात्र, त्यासाठी कार्यालयीन लैंगिक शोषणाकडे कानाडोळा न करता त्याची तक्रार करणे, दाद मागणे, मुळात अशी तक्रार समिती आपापल्या कार्यालयात आहे ना- याची खातरजमा करणे, कार्यालयातील सहकार्‍यांनी अन्यायाविरोधात एकमेकांना साह्य करणे, यासाठीची धिटाई प्रत्येक कर्मचारी महिलेकडे असायला हवी.

------------------------------------------------------------------------------------------------

एम्प्लॉयर ना उपयुक्त माहिती :

१. सर्वप्रथम तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करणार्‍या स्त्रियांना सुरक्षित, लैंगिक शोषणापासून मुक्त वातावरण देणे ही तुमची कायदेशीर जबाबदारी आहे हे जाणा. तुम्हाला तुमच्या नोकरीत असणारे नोकरदार कर्मचारी लैंगिक शोषणासाठी कायद्याने जबाबदार धरु शकतात.

२. लैंगिक शोषणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे माहीत असू देत. आरोग्य, आत्मविश्वास, उत्साह आणि कामाच्या परफॉर्मन्सवर त्याचा वाईट परिणाम होतो. लैंगिक शोषणातून निर्माण होणारी चिंता व तणाव यांमुळे असे त्रस्त कर्मचारी कामावर रजा रहाणे, कामात कमी पडणे किंवा आहे ही नोकरी सोडून अन्यत्र नोकरी धरणे असे प्रकार करताना दिसतात.

३. बायका लैंगिक शोषणाबद्दल चूप का रहातात ते जाणून घ्या. लैंगिक शोषणाबद्दल तक्रार नसणे ह्याचा अर्थ तसला काही प्रकार घडतच नाही हा नव्हे. कदाचित अशा प्रकारचा त्रास होणारी व्यक्ती गप्प रहाते कारण तिला तक्रार करणे निरुपयोगी वाटते. तिला वाटतं....

-- त्याबद्दल काहीही कारवाई होणार नाही.
-- त्याला किरकोळ, सामान्य असे स्वरूप देण्यात येईल.
-- तक्रार करणारीची थट्टा, टिंगलटवाळी करण्यात येईल.
-- त्याचे (तक्रार करण्याचे) अनुचित परिणाम होतील.

४. ह्या प्रकारांमुळे तुमच्या संस्थेचा होणारा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष खर्च व तोटा कसा होतो ते जाणून घ्या :

-- तुमच्या संस्थेस तपास, चौकशी व कायदेशीर कारवाईच्या दरम्यान येणारा खर्च
-- नकारात्मक प्रसिध्दी, नाव खराब होणे.
-- मान खाली घालायला लावणार्‍या जबान्या.
-- कर्मचार्‍यांची वाढती अनुपस्थिती
-- कर्मचार्‍यांचा वाढता निरुत्साह, मनोबळाचे खच्चीकरण
-- उत्पादनक्षमतेत घट
-- कार्यक्षमतेत घट
-- कर्मचार्‍यांनी नोकर्‍या सोडून जाण्यात वाढ.
-- संस्थेचे नाव, ब्रँड, जनमानसातील प्रतिमा यांवर अनुचित परिणाम

लैंगिक शोषण थांबविण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे सर्वसमावेशक लैंगिक शोषणविषयक पॉलिसी अंगिकारणे. तिचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे लैंगिक शोषण घडूच नये म्हणून खबरदारी घेणे आणि जर तसे घडत असेल तर ते थांबविण्यासाठी पुरेशा प्रोसिजर्स उपलब्ध असणे, ज्या त्या प्रश्नाचा तोडगा काढतील व असे प्रसंग / वर्तन पुन्हा होणार नाही ह्याची संस्थेतर्फे खातरजमा केली जाईल.

एम्प्लॉयरने राबवायची अ‍ॅन्टी-सेक्शुअल हॅरॅसमेन्ट(लैंगिक शोषण विरोधी) पॉलिसी

१. लैंगिक शोषणविषयक पॉलिसी

ह्या पॉलिसीत काय असावे? त्यात खालील मुद्द्यांचा समावेश हवा :

 • लैंगिक शोषणाचे समूळ उच्चाटन, प्रतिबंध आणि लैंगिक शोषणास मज्जाव यांसाठी कटिबध्द असणे.
 • लैंगिक शोषणाची व्याख्या (क्विड प्रो क्वो व होस्टाईल वर्किंग एन्व्हायरमेन्ट आणि उदाहरणांसह)
 • लैंगिक शोषणाबद्दल एम्प्लॉयरने ठरवलेली शिक्षा (कामावरून कमी करण्यासहित) स्पष्टीकरणाबरोबर.
 • कर्मचार्‍यांनी वापरायची grievance procedure, त्याची रूपरेषा.
 • कोणी कर्मचारी चौकशीपश्चात् दोषी आढळल्यास त्याचेवर त्वरित आणि योग्य शिस्तभंग कारवाई केली जाईल हे स्पष्ट करणे.
 • थर्ड पार्टी, जसे क्लाएन्ट्स, ग्राहक इत्यादींबाबत (त्यांचे किंवा त्यांच्याकडून) लैंगिक शोषणाबद्दलचे कडक नियम आणि स्पष्ट माहिती.
 • माहिती, सल्ला आणि आधारासाठी उपलब्ध असलेले अतिरिक्त स्रोत, व्यक्ती, संस्था इत्यादी.
 • सर्व लैंगिक शोषणविषयक तक्रारी व प्रोसिजर्स गुप्त व कालबध्द ठेवण्याविषयीची वचनबध्दता.
 • सर्व स्तरातील कर्मचार्‍यांच्या ट्रेनिंगची व्यवस्था
 • तक्रारकर्ता, साक्षीदार, तक्रारनिवारण समिती सदस्य आणि लैंगिक शोषण थांबविण्यासाठी सक्रिय असणार्‍या कर्मचार्‍यांना बदला/ सूड घेणार्‍यांपासून सुरक्षा देणारी बदला-विरोधी पॉलिसी.

कर्मचार्‍यांचे नेतृत्व करणार्‍यांशी ह्या पॉलिसीज व प्रोसिजर्सबद्दल सल्लामसलत करून मगच त्या लागू कराव्यात. कर्मचार्‍यांचा सन्मान अभंग राहील व त्यांना कामासाठी निरोगी वातावरण राहील अशा पॉलिसीज जर यशस्वीपणे राबवायच्या असतील तर त्यांसाठी त्यांना संयुक्त मान्यता ही हवीच!

२. सुसंवाद पॉलिसी

सर्वोच्च अधिकार्‍यांकडून मान्य केली गेलेली ''कोणत्याही प्रकारचे लैंगिक शोषण अजिबात सहन केले जाणार नाही'' अशा प्रकारची पॉलिसी लागू करा. सर्व कर्मचार्‍यांपर्यंत हा संदेश पोचण्याची काळजी घ्या. त्यांच्याकडून तसा लिखित संदेश मिळाल्याची व त्यांनी तो वाचल्याची स्वाक्षरी घ्या. कामाच्या ठिकाणी ही पॉलिसी दर्शनी भागातही लावता येऊ शकते. कर्मचार्‍यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यास त्यांच्या भाषेत ही पॉलिसी लिहा. त्यांच्याबरोबर ह्या पॉलिसीविषयी चर्चा करा. तिसर्‍या पार्टीज (कस्टमर्स, सप्लायर्स इ.) यांनाही तुमच्या ह्या पॉलिसीची माहिती असू देत. ह्या पॉलिसीबद्दल कर्मच

ह्या पॉलिसीबद्दल कर्मचार्‍यांशी नियमित रूपात चर्चा करा व आढावा घेत रहा.

३. सुव्यवस्था पॉलिसी

लैंगिक शोषणाबद्दलच्या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्याबद्दल त्वरित सांगोपांग तपास करणे. ह्या सर्व तपासकामाचे व निष्कर्षाचे प्रोफेशनल रेकॉर्डस ठेवणे. जे कर्मचारी तक्रार करतात त्यांना सुरक्षित ठेवणे. तक्रारींबद्दल कालबध्दता व गुप्तता बाळगणे. जेव्हा लैंगिक शोषणाची शक्यता आढळेल किंवा तसे वर्तन दिसून आल्यास त्वरित कारवाई करणे. ज्या कर्मचार्‍याने लैंगिक शोषणाचे गैरकृत्य केले असेल त्याचेवर योग्य कारवाई करणे. तुमच्या कर्मचार्‍यांना कामाचे संदर्भात थर्ड पार्टी लैंगिक शोषणापासून रक्षण देणे.

लैंगिक शोषण विषयक जागरुकता प्रशिक्षण

स्टाफमधील कर्मचार्‍यांसाठी असे प्रशिक्षण शिबिर घेणे हे लैंगिक शोषण थांबवण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल. स्त्री, पुरुष कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण सक्तीचे असावे. त्यातून त्यांना लैंगिक शोषण होत असल्यास ते ओळखण्यासाठी, ते थांबवण्यासाठी आणि ते पुन्हा घडू नये म्हणून पावले उचलण्यासाठी मदत मिळेल. लैंगिक शोषण विरोधी पॉलिसी राबविण्यासाठी आणि ती समजून घेण्यासाठी असे प्रशिक्षण देणे हा एक उत्तम उपाय आहे. त्यातून कर्मचार्‍यांचे कोणत्या प्रकारचे वर्तन अस्वीकारार्ह वा स्वीकारार्ह आहे ते निश्चिंत वातावरणात चर्चिले जाऊ शकते.
ह्या प्रशिक्षणात लैंगिक शोषणाविषयीचे लोकांचे आकलन, त्याविषयीची योग्य जाणीव, समज, शोषणाचा कार्यालयीन कामकाजावर व व्यक्तींवर होणारा परिणाम, लैंगिक शोषण विरोधी पॉलिसीला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणे आणि तक्रार-व्यवस्थेची माहिती देणे इत्यादी विषय हाताळता येतात.

--------------------------------------------------------------------------------------------------------

लैंगिक शोषण थांबवण्यासाठी कर्मचार्‍यांनी उचलायची पावले :

१. सर्वप्रथम लैंगिक शोषण खरोखरीच होत आहे का हे तपासून बघा.
स्वतःला हे प्रश्न विचारा :
- ह्या अशा प्रकारच्या वागण्याला माझे अनुमोदन आहे का?
- ते वागणे मला अन्कम्फर्टेबल करते का?
- त्या वागण्यामुळे माझ्या व्यक्तिगत सन्मानाला ठेच पोचते का?
- त्यामुळे सुरक्षित वातावरण असलेल्या ठिकाणी काम करण्याच्या माझ्या हक्कावर गदा येते का?

२. स्वतःला दोष देणे टाळा. लैंगिक शोषणाकडे लक्ष दिले नाही तर ते आपोआप नाहीसे होईल हा भ्रम अगोदर मनातून नष्ट करा.

३. बहुतांशी बायकांना आपले लैंगिक शोषण होत आहे हेच कळत नाही. त्याच्याकडे त्या सर्वसामान्य, किरकोळ बाब म्हणून बघतात. कारण तसे केल्याशिवाय त्यांना ह्या वातावरणात टिकून रहाताच येणार नाही असे त्यांना वाटते. कोणाचे अश्लील/ अश्लाघ्य वर्तन दुर्लक्षित करणे किंवा अशा प्रकारच्या वर्तनाचे अस्तित्त्वच नाकारणे अशा प्रकारांनी बहुतेक बायका लैंगिक शोषणाचा सामना करतात.

''Back Off! How To Confront and Stop Sexual Harassment and Harassers'' ह्या पुस्तकाच्या लेखिका लैंगिक शोषणाचा सामना करण्याविषयीच्या काही उत्तम टिप्स देतात :

त्यांच्या ह्या टिप्स त्यांच्याच शब्दांमध्ये :

Dealing with the Harasser upfront:

 • Do the unexpected: Name the behaviour. Whatever he's just done, say it, and be specific.
 • Hold the harasser accountable for his actions. Don't make excuses for him; don't pretend it didn't really happen.
 • Take charge of the encounter and let people know what he did. Privacy protects harassers, but visibility undermines them.
 • Make honest, direct statements. Speak the truth (no threats, no insults, no obscenities, no appeasing verbal fluff and padding).
 • Be serious, straightforward, and blunt.
 • Demand that the harassment stop.
 • Make it clear that all women have the right to be free from sexual harassment. Objecting to harassment is a matter of principle.
 • Stick to your own agenda. Don't respond to the harasser's excuses or diversionary tactics.
 • His behaviour is the issue. Say what you have to say, and repeat it if he persists.
 • Reinforce your statements with strong, self-respecting body language: eye contact, head up, shoulders back, a strong, serious stance. Don't smile. Timid, submissive body language will undermine your message.
 • Respond at the appropriate level. Use a combined verbal and physical response to physical harassment.
 • End the interaction on your own terms, with a strong closing statement: 'You heard me. Stop harassing women'.

एखाद्या संस्थेत/ कंपनीत जर लैंगिक शोषणाच्या घटना घडत असतील तर त्यामुळे त्रस्त होणार्‍या कर्मचार्‍यांना खालील पावले उचलता येतात :

लैंगिक शोषणाने त्रस्त/ पीडित कर्मचारी काय करु शकतात?

इतरांशी बोला : लैंगिक शोषण थांबविण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे त्याबद्दल इतरांशी बोला. तसे केल्यावर ती समस्या नक्की काय आहे हे तुम्हाला व इतरांनाही कळेल, त्या समस्येचे अस्तित्व मान्य होईल आणि त्यावर उपाय शोधायला सुरुवात होईल. तसे बोलल्याने लोकांचाही अशा समस्येकडे बघायचा दृष्टीकोन बदलू लागतो. त्यामुळे त्रस्त व्यक्तीलाही आपली व्यथा व्यक्त करण्यासाठी एक आश्वासक वातावरण मिळू लागते. त्याविषयी लोकांचे मत तयार करता येऊ शकते. त्यांचा अशा वर्तनाला असलेला विरोध त्या निमित्ताने अधोरेखित करता येतो. आणि ह्यामुळे संभाव्य शोषणकर्त्याला पुन्हा असे वागणे अवघड होऊन बसते. लोकांना माहितीचा आधार मिळाला की अशा प्रकारच्या केसेसमध्ये नक्की काय पावले उचलायची हेही कळू शकते.

त्या त्या वेळी बोला : शोषणकर्त्याला तुमचा नकार स्पष्ट, स्वच्छ शब्दांमध्ये कळू देत. त्याचे वर्तन अश्लाघ्य आणि अस्वीकारार्ह आहे हे त्याला तुमच्या शब्द, हावभाव आणि कृतीतून कळू देत. त्या त्या वेळी असा विरोध केला असल्यास पुढे त्या व्यक्तीवर आरोप दाखल करताना त्या विरोधाचा फायदा होतो.

नोंद ठेवा : जे काय घडत आहे त्याची डायरी/ जर्नल वगैरेत नोंद ठेवा. तुम्हाला अशा चिठ्ठ्या/ पत्रे किंवा इतर कागद/ चित्रे कोणी पाठवत असेल तर तीही जतन करा. त्यासंदर्भातील तारीख, वेळ, स्थळ आणि काय काय घडले ह्याचे सर्व तपशील लिहून ठेवा. कोणी साक्षीदार असतील तर त्यांची नावे लिहून ठेवा. अनेक लोकांनी पत्र लिहून व त्या पत्रात त्यांना कोणते व कशाप्रकारचे वर्तन अश्लील/ अश्लाघ्य/ गैर वाटत आहे ते त्या व्यक्तीला पत्राद्वारे कळवून तसेच असे वर्तन त्वरित थांबवायला सांगून शोषण थांबविले आहे. असे पत्र औपचारिक, सभ्य भाषेत, तपशीलवार आणि मुद्देसूद असावे. भावनारहित असावे. अनेकदा तोंडी सांगण्यापेक्षा असे लिखित पत्र जास्त प्रभावी ठरते. ते पत्र ज्याला लिहिले जाते ती व्यक्ती फारच क्वचित अशा पत्राला उत्तर देते. बर्‍याचदा आपले अश्लाघ्य वर्तन थांबविते. ह्या पत्राची एक प्रत जरूर आपल्यापाशी ठेवावी.

आपल्या स्वतःच्या सीमारेषा आखणे : तुम्हाला ह्या संदर्भात मनाविरुध्द कोठे एखाद्या स्थळी जावे लागत असेल, कृती करावी लागत असेल, प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत असतील किंवा ज्या वातावरणात तुम्हाला असुरक्षित/ अन्कम्फर्टेबल वाटत असेल अशा ठिकाणी तुम्हाला जावे लागत असेल तर अशा वेळी ठामपणे व स्पष्टपणे नकार द्या. ''नाही'' म्हणा! त्या वेळी समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला ठेच पोचते आहे का, त्याला आवडेल का, वगैरे विचार करत बसू नका. पहिल्यांदा तुमची स्वतःची काळजी घ्या.

गाफील राहू नका : कोणत्या प्रकारच्या परिस्थिती/ वातावरणापासून व लोकांपासून तुम्हाला धोका संभवतो त्यांविषयी सतर्क रहा. गाफील राहू नका. जर कोणी तुम्हाला काही व्यक्तींविषयी किंवा सामाजिक स्थितीविषयी सावधान करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना तुमच्याविषयी व स्वतःविषयी असलेल्या काळजीपोटीच ते असे सांगत आहेत हे जाणा.

अंतर्मनाची सूचना : संभाव्य धोक्याबाबत आपल्या अंतर्मनाचे ऐका. असुरक्षित परिस्थितीमध्ये मुळात तिथे थांबूच नका आणि स्वतःशी प्रामाणिक राहून बिनतोड जवाब द्या. आधी तुम्ही काय कसे वागलात, कोणत्या प्रकारचे संकेत दिलेत हे महत्त्वाचे नसून जर कोणी तुमच्यावर कसलीही जबरदस्ती करत असेल तर ती कोणत्याही वेळी थांबवायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुमचा हा हक्क/ अधिकार ओळखा आणि त्याबरहुकूम वागा.

कोणाला तरी सांगा : जर तुम्ही तुमच्या होणार्‍या शोषणाबाबत सहनशील आणि गप्प राहिलात तर त्यामुळे तसे वागणार्‍याचेच फावते व ते तसेच चालू रहाते. आपल्या सहकार्‍यांशी बोला. कदाचित तुमच्याखेरीज इतरांनाही असाच अनुभव आला असेल! स्वतःला दोष देऊ नका आणि विलंब करत बसू नका.

साक्षीदार निर्माण करा : लैंगिक शोषण होत असल्यास त्या वर्तनाचे साक्षीदार निर्माण करा : तुमच्या विश्वासातील सहकार्‍याला ह्याविषयी सांगून तुम्हाला जेव्हा असा त्रास दिला जात असेल तेव्हा तुमचा विश्वासू सहकारी त्या घटनेचा दृश्य/ ऐकण्याचे बाबतीत साक्षीदार होईल असे पहा. तुम्ही पुढे जेव्हा तक्रार कराल तेव्हा त्यासाठी ह्याचा उपयोग होईल. तुम्हाला त्रास देणार्‍या व्यक्तीला लैंगिक शोषणाविरुध्दच्या ऑफिस पॉलिसीचे कागद/ नियम पाठवा. त्यातील लागू होणार्‍या कलमांना अधोरेखित करून ते धाडा.

संघटनेशी बोला : तुम्ही जर कामगार/ कर्मचारी संघटनेचे सदस्य असाल तर तुमच्या संघटना प्रतिनिधीशी बोला.

वैद्यकीय तपासणी : जर तुम्हाला शारीरिक अतिप्रसंग सहन करावा लागला असेल किंवा तुमच्यावर हल्ला झाला असेल तर वैद्यकीय तपासणी करून घ्या. त्याचा अहवाल मिळवा. हे फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कायदेशीर केस करायची ठरवली तर हा एक उत्तम पुरावा होऊ शकतो.

संस्थेतील योग्य व्यक्तीकडे अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवा : तुम्हाला काय काय पर्याय उपलब्ध आहेत हे तपासून बघा आणि गरज वाटल्यास पध्दतशीर लिखित स्वरूपात तक्रार नोंदवा. तुमच्या संस्थेत लैंगिक शोषण विरोधी पॉलिसी नसेल तर तुमचे संस्थाचालक तशी पॉलिसी लागू करतील व त्यासंदर्भात संबंधित कारवाया करतील ह्यासाठी प्रयत्न करा.

-----------------------------------------------------------------------------------------------------

एक सहकारी म्हणून तुम्ही त्रस्त/ पीडित व्यक्तीबाबत काय करू शकता?

१. तुम्हाला ज्या स्त्री सहकार्‍याने आपला अनुभव सांगितला आहे तिच्यावर सर्वप्रथम विश्वास दाखवा. असा अनुभव सर्वसामान्य/ फालतू म्हणून बाजूला सारू नका. लैंगिक शोषण हे मनाविरुध्द असलेले वर्तन आहे हे लक्षात असू द्या.

२. अशा वर्तनाबद्दल बोलणेही तेवढेच अवघड असते ह्याची जाणीव ठेवा. आणि म्हणूनच जेव्हा तुमची सहकारी त्याबद्दल सांगत असते तेव्हा तिला तुम्ही तुमचे सहकार्य, आधार, विश्वास दाखवलात तर तिलाही धीर येईल.

३. आपले ह्यासंदर्भातील हक्क, अधिकार जाणून घ्या.

४. विशाखा केसचा आधार घेऊन त्याबद्दल इतर सहकार्‍यांना एक कर्मचारी म्हणून आपले हक्क, अधिकार व न्यायालयाच्या निर्णयाची माहिती द्या.

५. आपल्या त्रस्त सहकारी स्त्रीला सहानुभूती व आधाराचा हात पुढे करा.

६. शोषण थांबविण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यास त्रस्त व्यक्तीला धीर द्या.

७. शोषणकर्त्यास ताकीद देण्यास त्रस्त सहकारी जेव्हा जाईल तेव्हा तिच्याबरोबर जाता आले तर बघा. तक्रार समितीकडे तक्रार करण्यासाठी जातानाही तिची साथ देता आली तर बघा.

८. आपल्या संस्थेत लैंगिक शोषण विरोधी पॉलिसी राबविण्यासाठी प्रयत्न करा. जर तशी पॉलिसी आधीपासून असेल तर तिची योग्य अंमलबजावणी होते ना, हेही बघायला हवे. आवश्यक वाटल्यास ह्या संदर्भात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांशी बोलून ऑफिसमधील कर्मचार्‍यांसाठी ह्या संदर्भात जागरूकता प्रशिक्षण शिबिर/ सेशन आयोजित करण्यासाठी संस्थेला प्रवृत्त करा.

----------------------------------------------------------------------------------------

ह्या संदर्भात वेगवेगळ्या आय. टी. सेक्टर, अन्य कंपन्यांनी व सरकारांनी राबविलेल्या लैंगिक शोषण विरोधी पॉलिसीज विषयी:

अमेरिकेतील कंपनी जगतातील लैंगिक शोषणाविषयी

जपान सरकारचा पुढाकार

इन्फोसिस कंपनीने राबविलेली पॉलिसी

-----------------------------------------------------------------------------------------------------

ट्रेड युनियन्स लैंगिक शोषण थांबवण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.

आपल्या युनियनच्या सदस्यांना सर्वप्रथम ह्या समस्येची जाणीव करून देणे तसेच आश्वासक, लैंगिक शोषणास प्रतिबंधक वातावरण निर्माण करणे हे पहिले पाऊल म्हणता येईल. जर लैंगिक शोषण झाले/ होत असले तर त्या पीडित व्यक्तीला ट्रेड युनियनकडे विनासंकोच सहाय्य मागण्यास कसलाही अडथळा येणार नाही असे वातावरण निर्माण करण्यात ट्रेड युनियन यशस्वी होऊ शकते. तसेच असंघटित क्षेत्रातील ट्रेड युनियन्स ह्याबाबतीत तक्रारनिवारण प्रक्रिया प्रस्थापित करणे, असंघटित क्षेत्रातील लैंगिक शोषणाने त्रस्त व्यक्तींना मदत करणारी यंत्रणा निर्माण करणे अशा बाबतीत फार मोलाची भूमिका पार पाडू शकतात.

तुम्ही जर ट्रेड युनियनचे सदस्य असाल तर :-

 • जर लैंगिक शोषणग्रस्त व्यक्ती तुमच्याकडे मदत मागायला आली तर तुम्ही अनौपचारिक रीतीने शोषण करणार्‍या व्यक्तीशी बोलून ती तक्रार सोडवू शकता. जर त्यात अपयश आले तर पीडित व्यक्तीला योग्य अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करण्यास मदत करू शकता.
 • आपल्या युनियनच्या सदस्यांना ह्या प्रश्नाबाबत जागरूक करू शकता.
 • कार्यालयातील समस्येचा आढावा सदस्यांच्या सर्वेक्षणासारख्या माध्यमातून घेऊ शकता.
 • एम्प्लॉयर्सबरोबर संयुक्त विद्यमाने ह्या समस्येचे निवारण करण्यासाठी पावले उचलू शकता. प्रशिक्षण शिबिरे आयोजित करू शकता.
 • लैंगिक शोषणाने ग्रस्त व्यक्तीला मदत पुरवू शकता.
 • जरी तक्रार आली नसली परंतु लैंगिक शोषण होत आहे असे तुमच्या दृष्टोत्पत्तीस आले तर ते थांबविण्यात हातभार लावू शकता.
 • अशा केसेसमध्ये संबंधित सर्व व्यक्तींच्या बाबतीतील मिळालेली माहिती गुप्त राखा. त्यात गुंतलेल्या सर्वांबद्दलची माहिती गोपनीय ठेवा. गरजेपुरतीच माहिती बाहेर येऊ देत.
 • व्यवस्थापनाच्या निदर्शनास त्या गोष्टी आणून द्या. जरी अन्य कोणी व्यक्ती शोषणास जबाबदार असेल तरीही कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भात व संबंधाने शोषणमुक्त वातावरण पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे.
 • एम्प्लॉयरने लैंगिक शोषण विरोधी पॉलिसी लागू केली आहे ना, त्या पॉलिसीविषयी सर्व कर्मचार्‍यांना व्यवस्थित माहिती आहे ना, हेही पहाता येऊ शकते.

संस्थेतील उच्चपदस्थांनी मनावर घेतले तर ते आपल्या कार्यालयातील लैंगिक शोषणास प्रभावीपणे खीळ घालून कार्यालयातील वातावरण निरोगी, उत्साही, भेदमुक्त आणि कामकाजास पूरक ठेवून ह्या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढू शकतात. अर्थात त्यासाठी कार्यालयातही सर्वच स्तरांमधून सहकार्य तेवढेच गरजेचे आहे. कोणाही व्यक्तीस भयमुक्त होऊन, शोषणविरहित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे. त्यासंबंधीची संवेदनशीलता व समजच कार्यस्थळी निकोप वातावरण राखण्यास सहाय्यीभूत ठरतात.

(वरील लेखात जास्तीत जास्त मुद्दे एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यासंदर्भात आपल्याकडे काही महत्त्वाची माहिती असल्यास ती जरूर द्या, जेणेकरून अधिकाधिक लोक ह्या समस्येबाबत जागरूक होतील. धन्यवाद! :-))

तळटीप : अनेकदा समाजात लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या महिलांनाच त्या गुन्ह्याविषयी अंशतः किंवा पूर्णतः जबाबदार/ दोषी ठरविण्याची मनोवृत्ती दिसते, जी अत्यंत घातक आणि हानिकारक आहे. त्यातून पीडित महिलांचे मनोबल तर खच्ची होतेच, शिवाय त्यांचे पुनर्वसन होऊन त्यांना पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगण्यास बाधा येते. शिवाय ह्या सर्व प्रकारातून होणारी मानसिक हानी ही देखील त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक आयुष्यावर सर्वदूर परिणाम करते. त्या स्त्रियांना फक्त गुन्ह्यामुळे होणारे नुकसानच नव्हे, तर त्यांनाच दोषी ठरविणार्‍यांच्या दूषित नजरांचेही नुकसान झेलावे लागते. ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तसेच समाजातील शोषित व्यक्तीला अशा प्रकारे स्वतःच्या बाबतीत घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात जबाबदार ठरविण्याच्या मानसिकतेला सुरुंग लावायची जबाबदारी कायद्याइतकीच प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे.

*****************************************

शोषित स्त्रीच्या किंवा समाजात वावरणार्‍या स्त्रियांच्या बाह्य वेषभूषेवरून आक्षेप घेऊन शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यात त्या स्त्रीलाही जबाबदार मानणार्‍यांसाठी मैत्रेयीची ही पोस्ट :

तोकडे कपडे म्हणजे काय ? नक्की कोणते कपडे 'साध्या सरळ गृहस्थाला ' दिसेल त्या स्त्री वर 'व्यक्त' होण्यास भाग पाडतात ? कुणाचा 'ताबा सुटण्यासारखे ' काय याचे काही स्टॅन्डर्ड आहे का ?? एखाद्याच्या मते आकर्षक स्त्री, त्याच्या मते उद्दिपित करणारे कपडे घालून दिसली तर फार तर मनात आकर्षण निर्माण होणे इथवर एक्सप्लेनेशन समजू शकेल. पण तेवढ्याने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर किंवा अजून विकृत म्हणजे दुसर्‍या असहाय्य स्त्रीवर शारिरीक जबरदस्ती करणे याचे कसले समर्थन करता तुम्ही? या न्यायाने रस्त्यावरची मस्त गाडी , बँकेतले पैसे, हॉटेल अथवा दुकानातले खाद्य पदार्थ लुटणे याचेही समर्थन करणार का तुम्ही ??? एखाद्याला बटाटेवड्याच्या वासाने तोडाला पाणी सुटणे अन तेवढ्या कारणाने हॉटेल फोडून वडे चोरणे यात फरक आहे की नाही ?? शोषित स्त्रीला एक अब्जांश देखिल दोष देताना हे लक्षात येतंय का तुम्हाला ? बर तेही सोडा. एखादी बार डान्सर अथवा शरीरविक्रय करणारी स्त्री यांनादेखिल छेड छाड , विनयभंग, बलात्कार याविरुद्ध तक्रार करण्याचा हक्क यांच्याबद्दल काय मत आहे?

**********************************************************************************************************************
तुम्ही लैंगिक शोषणासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रारही करू शकता :

http://ncw.nic.in/OnlineComplaints/frmHome.aspx

http://ncw.nic.in/OnlineComplaints/frmComplaintEntry.aspx

लैंगिक शोषण विरोधी कायद्याचे स्वागत करतानाच त्याची अंमलबजावणी जास्तीत जास्त कडक प्रकारे होणे व समाजात लैंगिक शोषणासारखे प्रकार होऊ न देण्यासाठी आवश्यक निरोगी वातावरण तयार करण्याबरोबरच शोषित व्यक्तींना समर्थ आधार देऊन त्यांना पुन्हा सन्मानाने जगण्यास मदत करणे हे प्रत्येक दक्ष, जागरूक नागरिकाचे कर्तव्य ठरते.

--- अरुंधती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार, हा लेख संयुक्ता ग्रुपच्या माध्यमातून प्रकाशित केलाय म्हणून तसं दिसतंय! धन्यवाद! Happy

बर्‍याचदा संकोचापोटी किंवा समाज विचित्र नजरेने पाहील या भीतीने स्त्रिया पुढे येउन तक्रार करायला मागे पडतात. कारण आपला समाजच असा आहे की चूक नेहमी स्त्री चीच आहे तिने एवढे मोकळे कशाला वागायचे वगैरे कॉमेंट करून तिलाच दोषी ठरवतात. भिक नको पण कुत्रा आवर अशी तिची अवस्था होते. त्यापेक्षा दुर्लक्ष करु असा त्यांचा द्रुष्टीकोन असतो. अती झालेच तरच त्या तक्रार करतात. पण माहिती सविस्तर आणि उपयोगी आहे.

>>अती झालेच तरच त्या तक्रार करतात

बरोबर आहे सुनिल.
पण खरं तर हीच समस्या आहे. वेळेवर, आणि सुरुवातीलाच, तक्रार केल्यास 'अती' होण्याचा प्रसंग टाळता येईल.

माझा एक अनुभव लिहितो.
ओमान हा एक मुस्लीम देश आहे, पण तिथे स्त्रियांवर धार्मिक बंधने अजिबात नाहीत. त्या बुरखा वगैरे घेत नाहीत, आणि कुठल्याही पुरुषांशी संवाद साधायला त्यांना अजिबात अडचण येत नाही. (हे मी तिथल्या ५ वर्षांच्या वास्तव्यानंतर आणि खेडोपाडी केलेल्या भटकंतीनंतर लिहितोय.) पण पारंपारिक रित्या, त्या फक्त "चूल आणि मूल" च संभाळत असत. तिथले सुलतान काबूस यांनी, प्रथम त्यांना शिक्षण घ्यायला उद्युक्त केले. मग त्यांनी घराबाहेर पडून अर्थार्जन करावे यासाठी पण प्रयत्न केले, काही जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवल्या.
बँक, सुपरमार्केट, दुकाने अश्या अनेक ठिकाणी, त्या आता नोकरी करतात. त्या अत्यंत मोकळेपणी वावरतात आणि कुठलीही भिती वा दडपण, त्यांच्यावर नसते. आणि कुठलाही स्थानिक वा परदेशी पुरुष त्यांच्याशी वावगा वागताना दिसत नाही. याबाबत मला समजलेली माहिती अशी (असा कायदा तिथे खरेच अस्तित्वात आहे का, याबद्दल मला खात्री नाही, पण असा सार्वत्रिक समज मात्र आहे.) कि कुठलीही स्त्री, कुठल्याही पुरुषाविरुद्ध तक्रार घेऊन गेली, तर त्या तक्रारीची चौकशी करत नाहीत..... तिची तक्रार पूर्ण सत्य मानून (अर्थात ती शपथेवर करावी लागते ) पुढील कार्यवाही करण्यात येते.
या अश्या कायद्याचा गैरफायदाही घेताना कुणी दिसत नाही, पण वचक मात्र आहे.

मयुरेश, सुनिल, दिनेशदा, धन्यवाद प्रतिसादाबद्दल! Happy

दिनेशदा, तुम्ही म्हणताय ते खरंच असेल तर चांगलंच आहे. पण मीडियातील रिपोर्ट्स काही वेगळेच सांगतात. इथे बघा.

दिनेशदा- पटले नाही. माझ्या मैत्रिणीला ओमान मध्ये साधा जॉब मिळायला अनेक अडचणी आल्या. Sad
ओमानमध्ये स्वतःला Equal Opportunity Employer कोणी म्हणुन घेईल हे शक्य वाटत नाही. आणि निव्वळ सुपरमार्केटात वगैरे काम देऊन समान संधी म्हणता येणार नाही. इतर आखाती देशांच्या मुकाबल्यात थोडे बरे एवढेच म्हणता येईल फारतर.

अरुंधती- अतिशय उत्तम लेख. नुसत्या लेखावरुन एखादी कंपनी आपले धोरण आखु शकते. HR Practitioners ना सुद्धा याहून समावेशक मजकूर लिहीता आला नसता.

वाचणार्‍यांच्या कार्यालयात जर लैंगिक शोषण पॉलिसी नसेल तर या लेखाची एक प्रत देऊन त्याबाबत पाठपुरावा करणे इष्ट ठरेल.

धन्स गं रैना! Happy ही सर्व माहिती इंग्रजीत वेगवेगळ्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे! पण ती एकत्र संकलित स्वरूपात व मराठीत देण्याचा माझा हा प्रयत्न आहे. त्याचा जेवढ्या लोकांना व संस्थांना फायदा होईल तेवढे चांगलेच!

मायबोलीवर मागे प्रकाशित झालेल्या महिला दिनाच्या सर्वेक्षणातील निरीक्षणेही सर्व वाचकांनी ह्या संदर्भात अवश्य वाचण्यासारखी आहेत. http://www.maayboli.com/node/15858

छान माहिति अरुंधति. सध्याच्या कंपनिमधे माझ्यावर काहि प्रसंग आले आहेत. काय करावे कळत नाहिये. एक गोरा आहे जो पुर्वि माझ्या टिम मधे होता. मी एकटि भारतिय होते त्या टिम मधे. हा मला नेहेमि विचित्र प्रश्न विचारत असतो. कॉर्पोरेट जेट ने प्रवास करताना हा जोरात सगळ्या लोकांसमोर मला विचारणार कि भारतात लोक विमानावर बसुन प्रवास करतात का? एकदोनदा तर मला इललिगल इमिग्रंट सुद्धा म्हणुन झाले आहे सगळ्यांच्या समोर. काल तर कहरच केला. काल त्याला माझ्या प्रेग्नंसि चि बातमि कळालि तर माझ्याइथे येवुन मला विचारतो सगळ्यांच्या समोर कि भारतात तुम्हि लोक अंडे घालतात का? मी माझ्यापरिने त्याला सडेतोड उत्तरे देते त्याला. पण आता याला काहि उपाय आहे का हे कळत नाहिये. HR कडे गेले तर काय पुरावा देणार? कोणाला असा इथे अनुभव आहे का?

जादू- हो मला अनुभव आहे.
१) HR कडे तक्रार करणे. ऑफिसमधील इतर लोकांसमोर संभाषण झाले असेल तर आधी त्यांच्याशी बोलून ठेवणे. मला अशाच एका व्यक्तिने मदत केली होती.
२) Diversity & Inclusion महत्त्वाचे आहे. ही व्यक्ति अशा प्रकारचे वक्तव्य करते हे उदाहरणांसकट HR ला सांगणे, पहिल्यांदा तोंडी बोलून पाहणे, त्याला योग्य ती समज देणे असे सुचवणे आणि गरज पडली तर लेखी तक्रार करणे.
३) लेखी तक्रार कधीही परदेशातील HR वाल्यांना नको असते. (त्यात लिटीगेशनचे पोटेन्शियल असते म्हणुन).
४) तयारी असेल तर भर मिटींग मध्ये (मुद्दाम ४ लोकांच्या देखत) ' I would like you to understand that I object to being spoken to in this manner. These type of statements are offensive to me and my country, and I don't appreciate your 'alleged' sense of humour. If you persist, I will have to go the official route.' असे शांत स्वरात पण स्पष्ट म्हणणे. कानफटात काय बसेल, असा परिणाम होतो. फक्त स्वतःच्या जिकीरीवर करुन पहाणे. Proud

बेस्ट ऑफ लक.
* वर आपण जे उदाहरण दिले आहे, त्याला लैंगिक शोषण म्हणता येणार नाही. Politically Incorrect Behavior, Lack of respect for Diversity (सूक्ष्म रेसिसम) असे म्हणता येईल.

रैनाला अनुमोदन! जादू, लिखित स्वरूपातील तक्रार गरज भासल्यासच कर. सुरुवातीला रैना म्हणते तशी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष समज देऊन पहा. शिवाय इतर कलीग्जना त्या व्यक्तीचे तसेच विचित्र अनुभव आले आहेत का हे विचारून पहा. जर त्याचे वर्तन इतर काही सहकार्‍यांशीही असेच असेल तर तुम्हाला जॉईन्टली अ‍ॅक्शन घेता येईल. तुला शुभेच्छा!

रैनाला अनुमोदन. जमल्यास त्या माणसाशी प्रत्यक्श बोल. नाहीतर तुझ्या मॅनेजरकडुन समज देता येते का बघ.
तुझ्या मॅनेजरला आणि एखाददुसर्‍या सहकर्मचार्‍याला सगळी कल्पना देऊन ठेव.
मलाही अश्या प्रकारचा अनुभव आला आहे. मी माझ्या मॅनेजरतर्फे त्याला समज दिली. मॅनेजरला स्पष्ट सगळे सांगितले आणि हेही सांगितले की असेच सुरू राहिले तर मी HR through वरपर्यंत तक्रार नेईन. घाबरुन का होईना, आता जरा बरा वागतो तो माणुस.

जादू, खुपच आक्षेपार्ह आणि संतापजनक वागणं आहे हे!!! तुम्हाला समोरासमोर बोलायला अडचण वाटत असेल तर ताबडतोब एच आर कडे जा!! अशा बाबतीत पुरावा सापडणे कठिण असते हे डोक्यात ठेवूनच कायदे लिहीलेले आहेत. अमेरिकेत सहसा असल्या गोष्टींची फार गंभीरपणे दखल घेतली जाते. माझ्या नोकरीत मी एक एम डी ला माफी मागून मग बदली करण्यात आलेली पाहिलं आहे.
नोकरीचं काय म्हणुन आपण गप्प बसतो आणि मग असले लोकं शेफारतात!!!

जादू, खरंच संताप झाला वाचूनही. ऐकताना काय वाटत असेल ह्याची नुसती कल्पना केलेलीच बरी.
वर जे तक्रार करायला सांगतायत त्यांच्याशी सहमत. अजिबात चालढकल करु नका.

मंदार, म्हणूनच अनेक संस्थांची आपापली ड्रेस कोड पॉलिसी असते. ज्या कंपनी/ संस्थेत अशा तर्‍हेची पॉलिसी नसते तिथे तू म्हणतोस त्या प्रमाणे वेषभूषा असणे शक्य आहे. जर लोकांना अशा पेहरावाचा फारच ''त्रास'' होत असेल तर ते नक्कीच एच आर मार्फत ऑफिसवेअर काय, कोणत्या प्रकारचे असावे यावर एम्प्लॉयीजना मार्गदर्शन होईल असे बघू शकतात.

ज्यांना ह्या संदर्भात भारतात होऊ घातलेल्या कायद्याचा कच्चा मसुदा पहावयाचा असेल त्यांनी खालील लिंक पहा.
बर्‍याच विस्तृत स्वरूपात माहिती आहे.

http://ncw.nic.in/PDFFiles/sexualharassmentatworkplacebill2005_Revised.pdf

बेफिकीर किंवा इतर कोणालाही जी काही स्त्रियांच्या आक्षेपार्ह वेषभूषेबाबत 'उद्बोधक चर्चा' करायची आहे ती त्यांनी नॅशनल वुमेन्स कमिशनबरोबर अवश्य करावी. किमानपक्षी कायद्याच्या कच्च्या मसुद्यात त्याचा विचार केला जाईल! तिथे ऑनलाईन तुमच्या कमेन्ट्स/ दृष्टीकोन इत्यादी पाठवण्याची सोय आहे : http://ncw.nic.in/frmYourViewAdd.aspx

जादु, वर इतरांनी सांगितलेल्या गोष्टी कराच. तसेच,
सर्वसाधारणपणे इथल्या कंपनींमध्ये हॅरॅसमेंट अव्हॉइड करण्याविषयीचे ट्रेनिंग असते. तुमच्या कंपनीमध्ये तसे कंपल्सरी नसेल तर HR ला रिक्वेस्ट करुन पहा . या मध्ये कोणते शब्द वापरणे अयोग्य आहे इथपासुन सर्व माहिती असते. तसेच अशा परिस्थिती मध्ये कंपनी कशा प्रकारे अ‍ॅक्शन घेवू शकते , अशावेळी तक्रार कशी कुठे करावी , कंपनीच्या पॉलीसींविषयी वगैरे पण माहिती असते.

कामाच्या जागचा माझा अनुभव.
दिवसाढवळ्या चाललेलं शूट. मी डिझायनर असल्याने शूटवर सतत उभं रहाणं ओघानेच आलं. धावपळ करायला सोयीचे म्हणून ढगळ मापाचे अंगभर कपडे, खांद्याला दुनियेभरच्या पर्सेस आणि शक्य तितका गबाळा वेष असा अवतार असूनही दोन वेळा घडलेला स्पर्श. जेवण घेऊन येणार्‍या लेबर पोरांपैकी एक जण दोन्ही वेळेला कल्प्रिट. पहिल्या वेळेला चुकून म्हणून दुर्लक्ष केलं कारण शूटवर असलेल्या अडचणींच्या जागेत चुकून असं काही घडणं शक्य असतं. दुसर्‍या वेळेला हे चुकून नाही हे नीटच लक्षात आलं. सुदैवाने या ठिकाणी दिग्दर्शक, सहायक दिग्दर्शक हे सगळेच मित्र असल्याने पाचव्या मिनिटाला एका स. दि ला सांगितलं. त्याने आणि प्रॉडक्शनच्या एका माणसाने त्या मुलाला दोन दणके घालून हाकलून दिलं.
यातली पुढची सुदैवाची गोष्ट अशी की तो माणूस जेवणवाल्यांच्या युनियनचा मेंबर नव्हता नाहीतर दिग्दर्शकावर आणि निर्मात्यावर युनियनच्या मेंबरला मारहाण केल्याबद्दल कारवाई केली गेली असती.
पण तो माणूस युनियन मेंबर असता तर कॉश्च्युम डिझायनर्सना कुठल्याही युनियनचं संरक्षण नसल्याने माझ्या म्हणण्याला कुठलीही व्हॅलिडिटी रहाण्याची शक्यता नव्हती.

स्त्रियांसाठी कामाच्या जागी वेगळ्या स्वच्छतागृहाची सोय नसणं आणि मागितल्यास त्याबद्दल फिस्कन हसणं, मस्करी केली जाणं, सोय मागितल्यावर पायापासून डोक्यापर्यंत घाणेरडेपणाने न्याहाळणं, सोय मागितल्याबद्दल काय निर्लज्ज बाई आहे असं वाटून ही बाई आपल्याला कधीही उपलब्ध होईल असा समज करून घेणं....
हे सगळेही लैंगिक शोषणाखाली येऊ शकते का?

या बा.फ चा विषय
"‘अर्थार्जन करणार्‍या महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण' : माहिती, प्रतिबंध व उपाय"
असा आहे. रस्त्यावर होणारे लैंगिक शोषण हा एक वेगळाच आणि फार भयानक विषय आहे जो अगदि १० आणी १२ वर्षाच्या मुलींना सुद्धा सहन करावा लागतो. जर या विषयावर चर्चा करायची असेल तर वेगळा बा.फ. उघडुन करणे योग्य.
कृपया या ठिकाणि फक्त "व्यावसायिक कामाच्या ठिकाणी" याच विषयावर बोला.
व्यावसायिक कामाच्या ठिकाणी नोकरीची आत्यंतिक गरज असलेल्या स्त्रिया असतात. त्या कधिच उघड्पणे या विषयी तक्रार करत नाहीत कारण हि नोकरी गेली तर उपजिविकेच दुसर साधन नाही.
अगदि पैशाची गरज नसेल तरी सुद्धा सहसा स्त्रिया तक्रार करायला जायच टाळतात कारण एकदा अशी तक्रार केली की लोक त्या स्त्रि विषयीच वाईट बोलतील अशी हि तिला भिती वाटते. कित्येक जणी घरीही सांगु शकत नाहीत कारण घरातुनही समजुन घेणारे लोक नाहीतच.
अशापैकी काही टक्के स्त्रिया ज्या मायबोलीवर येतील त्यांच्यासाठी हि माहिती उपयोगी आहे.
हा बा.फ पब्लिक आहे ते एक दृष्टीने चांगलच आहे. ज्या पुरूषांनाही या बद्दल माहीत नाही त्यांना ही माहिती कळेल. आपला स्त्री सहकर्मचारी कुठल्या त्रासातुन जात असतील ते कळेल. आणि गरज पडल्यास ते मदत करायलाही पुढे येतील.
जे कुणि असल्या गोष्टी स्वतः करत असतील त्यांनाही एक प्रकारचा इशारा मिळेल. स्वतःच वागण किती चुकीच आहे ते कदाचित कळेल.

तुझ्या प्रयत्नाबद्दल धन्यवाद अरुंधती.

असो, या बाफच्या मूळ उद्देशाला धरूनच पोस्ट्स टाकू या.
ज्या सहन करत असतील त्यांनी सहन करायची गरज नाही. इथल्या मायर्स ह्या डिपार्टमेंटल स्टोअर्सचा सीईओ आणि आत्त्ताच एचपीचा सीईओ यांची असल्याच कारणाने हकालपट्टी झालीय.

माझी वकील मैत्रिण खासगी कंपनीमधे ५० वर्षांच्या बाईला ३५ वयाच्या विक्रुत माणसाकडुन झालेल्या लैंगिक शोषणाच्या केसमधे न्यायाधीशांनी नेमलेल्या चौकशी पॅनेलवर काम करत होती.तीच्या घरी धमकीचे फोन यायचे चौकशीचा रीपोर्ट त्याच्या बाजुने असला पाहिजे म्हणुन. तीच्या घरी त्या काळात प्रचंड तणावाचे वातावरण होते.
ही माणसे एव्हडी मुजोर असतात की केस होउनही धमक्या देण्याची हिम्मत असते त्यांच्यात. कारण त्यांना माहीत असते बायकांनाचा समाज नावे ठेवतो आणि बायका त्याला घाबरतात.
कठोर कायद्याबरोबरच शाळेत असल्यापासुन मुलांना सक्तीचे लैंगिक शिक्षण असले पाहिजे.लैगिक ह्या शब्दाची लाज वाटत असेल तर त्याला शारीरीक शिक्षण म्हणा पण ते अभ्यासक्रमात नक्की असु दे.पुरुषांमधे बायकांना त्रास देण्याचे विक्रुती अशास्त्रीय माहीतीमुळे निर्माण होतात.

एका अतिशय गंभीर विषयाबद्दल कळकळीने खूप सारी माहिती संकलीत करून हा विषय सर्वांपुढे मांडल्याबद्दल अरुंधतीचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.

नीधप, तू कोणत्या युनियनची सदस्य असशील तर त्याखाली तुला अशा सोयी हक्काने मागून घेता येतात. असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी ट्रेड युनियन्स सहाय्य करू शकतात. पण नक्की काय, कोणत्या स्वरूपात ह्याची मलाही नीट माहिती घ्यावी लागेल. बाकी तुझ्या अनुभवातील त्या मुलावर वेळीच अ‍ॅक्शन घेतली गेली हे चांगलेच झाले! पुन्हा असे काही गैरकृत्य करायला तो धजावणार नाही अशी आशा करुयात!

सावली, भाग्यश्री, आर्च, नी, वैजयन्ती, उदय..... धन्यवाद!

आशा करुयात की ह्या लेखातून मिळालेली माहिती अर्थार्जनासाठी बाहेर पडणार्‍या व मायबोलीवर येणार्‍या स्त्रियांना उपयोगी पडेल. तसेच पुरुषांनाही ह्या प्रश्नाचे स्वरूप, गांभीर्य आणि त्यावरची उपाययोजना लक्षात येईल.

आर्च, तुझ्या वकील मैत्रिणीचे काही अनुभव/ तिच्याजवळ असलेली माहिती इथे जर तिच्या अनुमतीने शेअर करता आली तर बघशील का? शाळेत लैंगिक शिक्षण अत्यावश्यक आहे ह्याबद्दल अनुमोदन! गैरसमजुती, अर्धवट माहिती, अज्ञान यांचेपायी विकृती जन्म घेतात व वाढीसही लागतात.

स्त्रीला घटनेने समानाधिकार व समान स्टेटस दिलेले असताना तिला आपल्या स्त्रीत्वापायी व्यावसायिक कामाच्या ठिकाणी शोषण, खास करून लैंगिक शोषण सहन करावे लागणे दुर्दैवी आहे. त्याबद्दल जितक्या व्यापक प्रमाणात जागृती होईल तितके चांगले! (म्हणूनच हा मराठीतून लेख लिहिण्याचा प्रपंच! कारण अनेकदा केवळ इंग्रजीत आहे म्हणून अनेक लोक लेख वाचण्याचा कंटाळा करतात!)

उद्योगाचे मालक/ सीईओ/ चेअरमन/ सीनीअर मॅनेजमेन्ट या लोकांसाठी वागण्याच्या गाइड्लाइन्स.

01. Do not get involved with the personal problems and issues of colleagues/ junior staff.
Direct them to counsellors / doctors/ lawyers as and when necessary.
02. Do not touch or enter personal space of employees, colleagues, subordinates
03. Do not pay excessive or otherwise compliments to e/c/s on their clothings and looks
04. Do not crack any double meaning dialogues, jokes during office situations and with
office people

05. Absolutely do not divulge any personal weaknesses or situations to office staff/ secretaries colleagues. It is seen as a sign of weakness and the people try to build
personal bridges which can lead to unsavory closeness among such people. It can divert you from your organizational objectives.

06. Always but always remember that any office affair is not worth risking the professional reputation you have built over the years, the family you have nurtured and the status and success you have achieved.

07. Office affairs destroy the best of careers and business leaders. stay away at all costs.
True love is not to be found in the conference room.And do not for heaven's sake put the expenses under some other headings. Auditors know all the tricks - esp if you are answerable to shareholders.

08. Do not put yourself in a situation where you will be shot through a mobile camera or a webcam by your office staff. driver maid etc.

09. Beware of Chatting and social networking because it may seem anonymous but
it isn't. Mobile conversations are also recorded and SMS records are always available and are produced as evidence in court in s. harassment suits.

10. As the saying goes do not ever mix business with pleasure. It always backfires.

एच पी चे सीईओ व डेविड दावेदार ( मला याचा उच्चार माहित नाही) यांना नोकरीला मुकावे लागले आहे
वरील कारणांमुळे ते नेट वर आहे. जरूर वाचावे.

Pages