नमस्कार मायबोलीकर,
दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने मायबोली-संयुक्ता-सुपंथ परिवारातर्फे गरजू संस्थांसाठी मदत गोळा केली जाते. मायबोलीकरांच्या समृद्ध सामाजिक जाणिवांचे व जबाबदारीच्या भावनेचे या उपक्रमातून उत्कृष्ट दर्शन होत असते.
सामाजिक उपक्रमांत कोणकोणत्या संस्था मदतीसाठी निवडाव्यात ह्याबद्दल नेहमीच पेच असतो. ज्या संस्थेत आपण गोळा केलेली मदत वस्तूरूपात देणगी म्हणून देता येईल अशा संस्था शोधणे, त्यांची काय गरज आहे याचा आढावा घेणे, त्यानुसार आपण करावयाच्या मदतीचे स्वरूप ठरविणे इत्यादी काम संयुक्ताच्या सदस्या दर वर्षी आवडीने व उत्साहाने करतात.
गेले वर्षभर आपण मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे ह्या ना त्या रूपात पुण्यातील सावली सेवा संस्थेच्या गरजू मुलामुलींना शैक्षणिक मदत करत आहोत. परंतु या संस्थेच्या विश्वस्त मृणालिनीताई भाटवडेकर व संस्थेच्या देखभालीतील काही मुलांना भेटायचा माझा योग आला तो मायबोलीकरीण रुनी पॉटर हिच्या पुणे भेटीत! या भेटीचा हा वृत्तांत व अनुभव मांडण्याचा प्रयत्न केलाय!
नमस्कार मायबोलीकर.
पुण्यातील सावली सेवा ट्रस्ट या गरीब व गरजू तसेच बुधवारातील देहविक्रय करून उपजीविका कमावणार्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी काम करणार्या सेवाभावी संस्थेला गेल्या महिला दिन उपक्रमात मायबोलीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा मदत केली व त्या अंतर्गत चार मुलांच्या शिक्षणाचा वार्षिक खर्च उचलला.
नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.
मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.
'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).
३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या निवडलेल्या २ संस्था.
नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च. 'जागतिक महिला दिन'.
या निमित्त 'संयुक्ता' तर्फे गरजू संस्थांना देणगी देण्यात यावी अशी कल्पना मांडली गेली. हे काम 'सुपंथ' तर्फे करता येऊ शकेल का अशी विचारणा केल्यावर 'सुपंथ' चे काम पहाणार्या सदस्यांनी तशी तयारी दर्शवली. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).