'संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 6 April, 2011 - 23:47

नमस्कार मायबोलीकर,

८ मार्च ला 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.

मागील वर्षी ह्याच निमित्ताने काही संस्थांना 'सुपंथ' च्या मदतीने आपण देणगी गोळा करुन दिली होती. ह्या वर्षी पुन्हा तोच कार्यक्रम करत आहोत.

'सुपंथ' च्या सदस्यांनी पुन्हा मदत करायची तयारी दर्शवली आहे. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).

३० एप्रिल २०११ पर्यंत देणगी गोळा करुन ती २ संस्थांना देण्याची योजना आहे. ही देणगी रोख रक्कम किंवा संस्थेला उपयुक्त अशा भेटवस्तुच्या स्वरुपात देण्याचा विचार आहे. संयुक्ताच्या काही सदस्यांनी काही संस्थांना भेटी दिल्या व त्यानुसार सध्या निवडलेल्या २ संस्था.

१) पुण्यातील कोथरुड येथील अंध मुलींची शाळा - ह्या मुलींना काही अतिआवश्यक गोष्टींची सतत गरज पडत असते त्यामुळे ह्याही वर्षी त्यांना मदत देण्याचे ठरवत आहोत.

अंधशाळेची थोडक्यात माहिती :

पूना स्कूल अ‍ॅन्ड होम फॉर ब्लाईन्ड गर्ल्स, कोथरूड, पुणे (पुणे येथील मुलींची अंधशाळा व वसतिगृह) ह्या संस्थेत सध्या ५ ते ३५ वयाच्या एकूण १६० मुली / स्त्रिया दाखल आहेत. ह्या दृष्टीहीन मुलींना अंधशाळेतून शिक्षणाबरोबरच स्वावलंबनाचे धडे मिळतात. त्यांना ब्रेल लिपीचे शिक्षण दिले जाते. १८ व त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींना बांबूकाम, मेणबत्त्या तयार करणे, विणकाम, शिवणकाम, पुस्तक बांधणी इत्यादी उपयुक्त व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते, जेणेकरून मुलींना उत्पन्नाचा मार्ग खुला होतो व समाजात त्या आत्मसन्मानाने जगू शकतात. या मुलींच्या शिक्षणाचा व अन्य खर्चाचा भार पेलण्यासाठी अंधशाळा कायमच लोकांकडून मिळालेल्या मदतीचे स्वागत करते.

२) सावली सेवा ट्रस्ट - ही पण संस्था पुण्यात आहे. त्यांची संस्था वेश्या वस्तीतील मुलांसाठी मुख्यत्वे काम करते. त्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत गोळा करणे, विशेष प्रयत्न घेणे इत्यादी.
ही सावली कडुन मिळाले माहिती थोडक्यात,

''तळागाळातील मुलामुलींच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणे व त्यांना शिक्षणाची सुसंधी उपलब्ध करून देणे ह्यासाठी सावली सेवा ट्रस्ट काम करतो. २०१० ते २०११ दरम्यान ट्रस्टने पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील १०० मुलांची शैक्षणिक जबाबदारी उचलली असून त्यात त्यांना वेगवेगळ्या शाळा व वसतिगृहांत दाखल करण्याचा अंतर्भाव आहे. लोकांकडून ह्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी मदतीची अपेक्षा आहे. त्यात या मुलांचे गणवेष, शालेय साहित्य, शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व खानावळ खर्च, वैद्यकीय खर्च अशा तर्‍हेच्या सर्व खर्चांचा समावेश आहे. अशा मुलांचे पालकत्व पत्करून आमची संस्था त्या मुलांना चांगले व जबाबदार नागरिक बनण्यासाठी मदत करते. जर त्यांना तसेच वार्‍यावर सोडले तर समाजातील कुप्रवृत्तींना बळी पडून ही मुलेही वाईट मार्गाला लागतात आणि परिणामी समाजालाही घातक ठरतात.

सध्या ट्रस्ट विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे व ह्या मुलांसाठी तूर्तास अशा प्रकारची मदत उभारत आहे. ट्रस्टची स्वतःची शाळा, वसतिगृह उभी राहिल्यावर अधिक चांगल्या प्रकारे ह्या मुलांना मदत करता येईल.

Ours is a regular registered Trust (No. E-5079 Pune) with permanent 80-G.

५००० रूपयांमध्ये एका मुलाचा शैक्षणिक साहित्य खर्च + स्कूल फीज असे वार्षिक खर्च भागवता येतात.''

त्यांच्याकडे सध्या इयत्ता १० वीला जाणारी १६ मुले आहेत, इयत्ता ८ वीला जाणारी १३ मुले आहेत.
आपल्या इच्छेप्रमाणे आपण या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करू शकतो.

'अरुंधती कुलकर्णी' ह्यांचे मनापासुन आभार. त्यांच्यामुळेच 'सावली' बद्दल माहिती मिळू शकली.

ही योजना सर्वांकरता खुली केली तर जास्त रक्कम जमा होईल या हेतूने सर्व मायबोलीकरांना मदतीचे आवाहन करत आहोत. ३० एप्रिल २०११ पर्यंत तुम्ही देणगीची रक्कम पाठवू शकता.

पैसे पाठवण्याबाबत माहिती-

रुपयांत रक्कम कृपया सुपंथ च्या बँक खात्याला पाठवा. त्यावर मेमो मधे 'महिला दिन' असे लिहावे. खाते क्रमांक वगैरे बद्दलची माहिती खाली आहे.

Account holder name : Kedar Joshi
Bank : ICICI
Branch : Shivajinagar, Pune
Account number : 003901032042

जर डॉलर्स मधे रक्कम पाठवणार असाल तर कृपया केदार जोशी (मायबोली नाव 'केदार') ह्यांना ईमेल करावे व त्यांच्याकडुन त्यांचा घरचा पत्ता घेऊन तिथे डॉलर्स मधे चेक पाठवावा. केदार ते पैसे सुपंथ च्या खात्यावर जमा करतील. त्यावर पण 'महिला दिन' असे लिहावे.

गेल्या वर्षी संयुक्ताने या उपक्रमांतर्गत जवळपास ५४००० रूपयांचा निधी जमा केला. याचा विनीयोग कोथरूडमधील मुलींची अंधशाळा व सुमती बालवन यांना रोख देणगी देण्यासाठी तसेच आवश्यक वस्तू देण्यासाठी करण्यात आला. गेल्यावर्षीच्या या उपक्रमाबद्दल इथे वाचायला मिळेल.

'सुपंथ' बद्दलची ही लिंक पहावी -

कृपया नोंद घ्या :

१. ज्यांना सुपंथच्या खात्यात पैसे जमा करून देणगी द्यायची आहे ते तशी देऊ शकतात. मात्र सुपंथ अद्याप नोंदणीकृत नसल्याने त्यांना टॅक्स सवलतीसाठी पावतीचा लाभ घेता येणार नाही.

२. देणगीदार थेट त्या संस्थेला चेक पाठवू शकतात व त्या चेकची पोच मायबोली सुपंथ २०११ च्या धाग्यावर देऊ शकतात. पावतीची जबाबदारी ही अशा परिस्थितीत पूर्णत्वे त्या संस्थेची असेल. संयुक्ता/ मायबोली किंवा सुपंथ त्यासाठी जबाबदार राहणार नाही.

३. टॅक्समध्ये सवलत ही भारतातील लोकांना रूपये ५००० व त्यावरील देणगीसाठी मिळते.

दोन्ही संस्थांचे पत्ते :

पूना स्कूल अ‍ॅन्ड होम फॉर ब्लाईन्ड गर्ल्स
गांधी भवन शेजारी, कमिन्स इंडिया लिमिटेडची पिछाडी,
कोथरूड, पुणे ४११०३८.
फोन : ०२० २५३८४५८९.
अंधशाळा रजिस्ट्रेशन क्रमांक : F18695.

सावली सेवा ट्रस्ट
रजिस्ट्रेशन क्रमांक : E-5079 (पुणे)
मृणालिनी भाटवडेकर.
पत्ता : ई १००४, ट्रेझर पार्क, संतनगर, पर्वती, पुणे - ४११००९.
संपर्क क्रमांक : ९८२३२७०३१०

अधिक माहितीसाठी इथे प्रश्न विचारले तरी चालतील. सर्वांना ह्या उपक्रमात सहभागी होण्याचे पुन्हा एकवार आवाहन!

धन्यवाद!!!
-संयुक्ता.
(अधिक माहितीसाठी - सुनिधी किंवा अरुंधती कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा किंवा इथे आपले प्रश्न लिहावे.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा तर आहेतच! Happy

मी फक्त जी माहिती होती ती देण्याचे काम केले आहे. सुनिधी व इतर अनेक संयुक्ता मैत्रिणी यांचा ह्या कामातला पुढाकार यांमुळे उपक्रमाच्या बाकीच्या बाजूही छान सांभाळल्या जात आहेत. एकमेकां साह्य करू अगदी सार्थ ठरत आहे.

अंधशाळेची वेबसाईट आहे : http://puneblindschool.org/
(ही त्यांच्या मुख्य शाखेची वेबसाईट आहे.)

सावली सेवा ट्रस्ट विषयी वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले लेख :

महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेला लेख : http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6738961.cms

टाईम्स ऑफ इंडियात छापून आलेला लेख :
http://articles.timesofindia.indiatimes.com/2009-09-06/pune/28109416_1_c...

केदारच्या वरील अकाऊंटला NEFT ट्रान्स्फर होत नाहिये माझ्याकडून. हा अकाऊंट RTGS ट्रान्स्फर्स रु.१००००० च्यावर अ‍ॅक्सेप्ट करतोय असा मेसेज येतो आहे. गेल्यावर्षीपर्यंत मी NEFT ट्रान्स्फर केली होती.

कृपया कुणी सांगेल का काय प्रॉब्लेम आहे ते?

ते आहेच गं ब्रँचला स्वतः जाऊन भरणं. पण हे ऑनलाईन झालं असतं ना?

हा धागा उघडल्यानंतर कुणी केले आहेत का फंड्स ट्रान्स्फर?

केश्वि, आधी मी NEFT ने केले आहेत पण आता हा धागा उघडल्यावर केलेले नाहीत. बघायला हवं करुन, थांब, करुन पाहते आणि सांगते -होत नाहीयेत आत्ता ट्रान्सफर, पण बॅंकेच्या साईटचा प्रॉब्लेम असावासा वाटते.

असं व्हायला नको. NEFT किंवा इ ट्रान्सफरसाठी अशी कुठलिही मर्यादा नसते. (अर्थात ICICI ला एका दिवशी एक लाखापर्यंतच दुसर्‍या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करता येतात पण ती केस नाही. )परत एकदा करशील का?

केदार, मी म्हटल्याप्रमाणे सिटीचाच काही इश्श्यू असावा. आज ट्रान्स्फर करु शकले आणि व्यवस्थितपणे करु शकले.

अगं पण मी स्टेट बँकेतून ट्रान्स्फर करत होते तरी नव्हतं होत. म्हणजे काहीतरी दुसरा प्रॉब्लेम झाला असावा.

केश्वि,
थोड्या वेळापूर्वी बैतुल मैडम ला फोन केला होता
त्या out ऑफ मुंबई आहेत.
त्या गुरवारी येणार आहेत
त्यामुळे त्यांनी शुक्रवारी संद्याकाळी यायला सांगितले आहे.
तरी आपण शुक्रवारी संद्याकाळी जाऊया.
ओके

चांगला उपक्रम आहे. अशा खुप गरजू संस्था आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. आपण त्यातील खारीचा वाटा उचलतोय ही खुप मोलाची गोष्ट आहे.
मदत करण्यासाठी पैसे ट्रान्स्फर करु शकते का अकाउंटमधुन ?

अमेरिकेतून पैसे पाठवायचे असल्यास आणि Tax-Free पाठवायचे असल्यास 'घेणार्‍या संस्थेचा' FCRA + 80-G महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या संस्थेकडे रजिस्टर करावा लागतो, आणि मग त्यांच्या तर्फे पैसे पाठवता येतात.

http://www.indiancharity.org/

FCNR असलेल्या भारतीय संस्थांची यादीही तिथे सापडेल. कुणाकडे/कुणातर्फे पैसे पाठवल्यास तुम्हाला Tax-Benefit मिळणार नाही. हे फक्त कंजूषी करण्यासाठी नाही. $१०० Tax-Free पाठवले तर तुम्ही जवळपास $७२ देता ($२८ परत मिळतात). त्याऐवजी तुम्ही $१३० पाठवू शकाल.

भारतात Register झालेले FCRA

http://mha.nic.in/fcra.htm

इथे शोधता येतात.

अळुवडी, कल्पना तर खुपच चांगली फक्त १-२ गोष्टी मनात आल्या.
तुम्ही हा दुवाच फे.बु. वर देणार आहात का ही ह्यातील माहिती कापुन देणार? दुवा देणार असाल तर केदार च्या खात्याची माहिती उघड झालेली केदार ला चालेल का हे केदार ला विचारावे लागेल. केदार, प्लिज जरा पहाणार का?

त्याचप्रमाणे संस्थांच्या चालकांचे फोन नंबर पण आहे ते त्यांना चालेल का? अरुंधती, काय वाटते ह्याबद्दल?

जर वैयक्तीक माहिती कापुन देणार असाल तर चालायला काही हरकत नाही. संयुक्ता अ‍ॅडमीन ला काय वाटते ते पण इथे लिहाल प्लिज.

सुनिधी, ही माहिती आता जालावर प्रकाशित झाल्यामुळे सार्वजनिक झाली आहे.
अळूवडी ह्या धाग्याची लिंक फेसबुकवर देऊ शकतात.

अरूंधती आणि सुनिधी,

धन्यवाद!!! हि माहिती मी माझ्या FB च्या account वर अश्या पद्धतीप्रमाणे टाकायचा विचार करत आहे

Heading ::('संयुक्ता' आणि 'सुपंथ' तर्फे मदतीचे आवाहन (महिला दिन २०११))
Please follow this लिंक: http://www.maayboli.com/node/24887

माझा शाळेचा GOOGLE Group आहे तिथे हि असेच टाकलेतर चालेल का?

लवकरच केदारशी संपर्क साधून चेक पाठवणार आहे!

गुड, अरुंधती ने सांगितल्यानुसार अळुवडी तुम्ही देउ शकता दुवा तुमच्या फे.बु. वगैरेवर.

Pages