अजुनही मनामधे पोर एक नांदते
बंधमुक्त व्हायचे रोज स्वप्न पाहते
लग्न हा जुगार पण खेळतो हरेकजण
दान चांगले तुला .. बघ पडेल वाटते
कोंडले किती जरी दुःख वाट काढते
दाह जीवनातला भेग भेग सांगते
दैन्य झोपड्यांतले बघुन लाज वाटते
त्यामुळेच लांब मग शहर त्यांस ठेवते
प्राण फुंकलेस तू मर्त्य जीवनामधे
त्यामुळेच मी अशी अमृतात नाहते
आजकाल मूड तर सारखाच बदलतो
काव्यही सखे तुझे त्यानुसार वागते
कविता क्षीरसागर
प्रार्थना नाकारली जेव्हा घनांनी
भिजवले मग शेत त्यांनी .. आसवांनी
का असे झाकोळले आहे अचानक
छेडला मल्हार बहुधा आठवांनी
कोरडे नक्षत्र गेले .. चिंब डोळे
गर्जना नुसतीच केली ह्या ढगांनी
पावसाळी रात्र होती एक छत्री
जवळ आलो.. अर्धओलेत्या क्षणांनी
ही तुझ्या त्या पावसाची छेडखानी
पकडली चोरी पुन्हा ओल्या खुणांनी
वीज पडल्यासारखे झाले मनावर
तोडला जेव्हा भरोसा प्रियजनांनी
श्रावणाचा भासही देई तजेला
सोसले चटके उन्हाचे त्या घरांनी
कविता क्षीरसागर
शिंपल्या बागा मनाच्या तूच साऱ्या
लावल्या आशा क्षणाच्या तूच साऱ्या
**
आयुष्याला दान केले मैफिलीला
छेडल्या तारा सुखाच्या तूच साऱ्या
**
आदिमाया तू जगाची सर्वसाक्षी
पेटवीले या नभाला तूच साऱ्या
**
मी सुखाने पाहता हे शेत माझे
गारपीटे झोपवीले तूचसाऱ्या
**
चालताना आडवाटा आयुष्याच्या
सोड चींता तू मनाच्या तूच साऱ्या
**
जो मुलीचा बाप होतो भाग्यवाना
भ्रूणहत्या थांबवा रे तूच साऱ्या
**
शोभली ती माय राजा शिवबाची
शोभली ती मॉं जनाची तूच साऱ्या
**
प्रकाश साळवी
आता बोथट झालो आहे
पुरता मी नट झालो आहे !
फिरतो माझ्या मागे मागे
मी मी-लंपट झालो आहे.
मारुन डोळा खरे बोलतो
इतका चावट झालो आहे.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्
थोडा उद्धट झालो आहे
मार्ग तुझा अनुसरला, आता
मीही अनवट झालो आहे
प्रत्येकाच्या मनाजोगता
हसरा शेवट झालो आहे
~चैतन्य दीक्षित
जो ताठ मानेने जगाशी वागला होता
तो वृद्ध कमरेतून आता वाकला होता
मी नाईलाजाने उभ्या केल्यात या भिंती
तू एवढा मजबूत पाया बांधला होता
आत्ताच का केलीस तू सुटका तुरुंगातुन !
आत्ता कुठे कैदी रमाया लागला होता
मी ओढली चादर तरी तो हालला नाही
तो पांघरूनी सोंग तेव्हां झोपला होता
रस्ते तुझे, गल्ल्या तुझ्या, शहरे तुझी सारी
तू कोणत्या कारागृहातुन हरवला होता ?
-भालचंद्र
जखमांना आधार मिळाले आजन्म थोडे थोडे
कधी कधी साभार मिळाले आजन्म थोडे थोडे
सुखे आभासी गळुन गेली होती नव्हती सारी
अश्रुंना हळुवार मिळाले आजन्म थोडे थोडे
झरे आटले प्रेमांचे नाती फुलली व्यवहारी
विनंत्यांना नकार मिळाले आजन्म थोडे थोडे
सुर्यानेही नभांगणावर हूकुमती पांघरलेल्या
तार्यांना उपकार मिळाले आजन्म थोडे थोडे
हौसेने राखुन जरी मी नव्हतो छाती उघडी
पाठीवरती वार मिळाले आजन्म थोडे थोडे
ही दंगल सुखदु:खांची कुठे मरावे कोण कसे
गुन्हेकर्यां सरकार मिळाले आजन्म थोडे थोडे
(लेख पूर्वप्रकाशित आहे.जुन्याच बाटलीतली जुनीच दारु.)
गझलांची काही संकेतस्थळे जन्माला आली आणि त्यांवर होणाऱ्या गझला वाचून मला न्यूनगंड वाटू लागला. तशा काही कविता/एकाखाली एक ठराविक संख्येने शब्द रचलेली काही गद्ये मी लिहीली होती, पण "हात मर्दा! जिंदगीत एक गझल लिहीली नाहीस? थू तुझ्या जिनगानीवर!" वगैरे धमक्या मन सारखं देऊ लागलं आणि मी ठरवलं. "बास! आता एक तरी गझल लिहील्याशिवाय मी केस बांधणार नाही!"(ती द्रौपदी नाही का, दु:शासनाच्या रक्ताने केस बांधायला मिळेपर्यंत केस मोकळेच सोडते तसे.)
आंतरजालावर साहित्याला वाहिलेल्या एका समूहावर मी एक कविता टाकली. शीर्षक होतं “हल्ली”
*
तळे आसवांचे राखतो मी हल्ली
राखतो म्हणूनी चाखतो मी हल्ली
*
पाहिली जी स्वप्ने मिळूनी दोघांनी
राख ही त्यांचीच फासतो मी हल्ली
*
प्रेतयात्रा मीच काढली माझीच
फुले समाधीवर वाहतो मी हल्ली
*
संवय बैठकीची , फक्त आहे तरी
भेटण्या मैल्भर चालतो मी हल्ली
*
दु:ख असते सदा एकट्याचेच पण
गझलेतूनी ते वाटतो मी हल्ली
श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट.
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !

आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे

आणि हे
भावना काय बोलून गेली!
सावली काय सांगून गेली!
**
मी मनाच्या ग शोधीत वाटा
बाग फूलांचि शींपून गेली
**
श्रावणाला सणांची झळाली
रात खेळात जागून गेली
**
नाकळे आयुष्या काय मागू?
जीतही फार लागून गेली
**
हासुन काय बोले मला गे
रातराणी हि गंधून गेली
**
चोरली का कुणी प्रीत माझी?
ह्रीदयी का कडाडून गेली?
**
मी मनाशीच केली लबाडी
वासना साच सांगून गेली
**
भेटली ती कधी पावसाळी
जीवना अर्थ सांगून गेली
**
चालता जीवनी तू नभाला
बोलता का खिजवून गेली?
**