आजन्म

Submitted by कुणी दिवाणा on 23 September, 2017 - 14:31

जखमांना आधार मिळाले आजन्म थोडे थोडे
कधी कधी साभार मिळाले आजन्म थोडे थोडे

सुखे आभासी गळुन गेली होती नव्हती सारी
अश्रुंना हळुवार मिळाले आजन्म थोडे थोडे

झरे आटले प्रेमांचे नाती फुलली व्यवहारी
विनंत्यांना नकार मिळाले आजन्म थोडे थोडे

सुर्यानेही नभांगणावर हूकुमती पांघरलेल्या
तार्यांना उपकार मिळाले आजन्म थोडे थोडे

हौसेने राखुन जरी मी नव्हतो छाती उघडी
पाठीवरती वार मिळाले आजन्म थोडे थोडे

ही दंगल सुखदु:खांची कुठे मरावे कोण कसे
गुन्हेकर्यां सरकार मिळाले आजन्म थोडे थोडे

थकलेल्या कदमांनी ञागे झुगारुन टाकिले
बेड्यांना आकार मिळाले आजन्म थोडे थोडे

किती औषधे शोधु कुठवर आता दमलो आहे
लाडाचे आजार मिळाले आजन्म थोडे थोडे

हळुच डोकावुन पाहतो जेव्हा माझ्या भीतर दबलेले हुंकार मिळाले आजन्म थोडे थोडे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users