गझल

लय आणि लयबद्धता: एक नवीनच प्रकरण

Submitted by डॉ अशोक on 11 September, 2017 - 02:17

आंतरजालावर साहित्याला वाहिलेल्या एका समूहावर मी एक कविता टाकली. शीर्षक होतं “हल्ली”
*
तळे आसवांचे राखतो मी हल्ली
राखतो म्हणूनी चाखतो मी हल्ली
*
पाहिली जी स्वप्ने मिळूनी दोघांनी
राख ही त्यांचीच फासतो मी हल्ली
*
प्रेतयात्रा मीच काढली माझीच
फुले समाधीवर वाहतो मी हल्ली
*
संवय बैठकीची , फक्त आहे तरी
भेटण्या मैल्भर चालतो मी हल्ली
*
दु:ख असते सदा एकट्याचेच पण
गझलेतूनी ते वाटतो मी हल्ली

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - जाई.

Submitted by जाई. on 26 August, 2017 - 15:37

श्री गणरायाला वंदन करुन सादर करत आहोत खास सोशल मिडीया सॅव्ही मंडळीसाठी आमचे एक खास प्रॉडक्ट. ​
स दा पडीक ऑन सोशल मीडिया सर्व्हिस एजेंसी चे "द ग्रेट वॉल ऑफ पोस्ट्स "फेसबुक स्टेट्स पॅकेज!! एकदा अनुभव घ्या आणि कायमचे गिर्हाईक व्हा !

FB screen -1.jpg

आमची खास पॅकेजेस पुढीलप्रमाणे

FB SCREEN 2.jpg

आणि हे

विषय: 

गझल

Submitted by प्रकाश साळवी on 1 August, 2017 - 03:13

भावना काय बोलून गेली!
सावली काय सांगून गेली!
**
मी मनाच्या ग शोधीत वाटा
बाग फूलांचि शींपून गेली
**
श्रावणाला सणांची झळाली
रात खेळात जागून गेली
**
नाकळे आयुष्या काय मागू?
जीतही फार लागून गेली
**
हासुन काय बोले मला गे
रातराणी हि गंधून गेली
**
चोरली का कुणी प्रीत माझी?
ह्रीदयी का कडाडून गेली?
**
मी मनाशीच केली लबाडी
वासना साच सांगून गेली
**
भेटली ती कधी पावसाळी
जीवना अर्थ सांगून गेली
**
चालता जीवनी तू नभाला
बोलता का खिजवून गेली?
**

शब्दखुणा: 

काय माझे भावनांचे (गझल)

Submitted by प्रकाश साळवी on 1 August, 2017 - 03:11

काय माझे भावनांचे गुंफलेले गीत देऊ
का फुलांचे प्रेमवेडे स्वप्न माझे मीच देऊ
**
मी उन्हाचे सोसलेना घाव काही सोसणारे
मी कुणाला श्वास देऊ की कुणाला चंद्र देऊ
**
काय माझी स्वप्ने उद्याचीच ही सांगू कुणाला
कापणा-या वेदनांचे काय सर्व घाव देऊ
**
मी जगाला काय सांगू चंद्र माझा झोपलेला
तेज माझे फाकलेले चांद्ण्यांचे गीत देऊ
**
संपले आयुष्य देवा नांव नाही घेतले मी
काय वाहू ओंजळी की नासलेला देह देऊ
**
मी तुझ्या प्रेमात काही नाहि केली चूक काही
प्रेम माझे भाबडे हे सांग माझे प्राण देऊ
**

शब्दखुणा: 

गझल

Submitted by प्रकाश साळवी on 1 August, 2017 - 02:59

भावना काय बोलून गेली!
सावली काय सांगून गेली!
**
मी मनाच्या ग शोधीत वाटा
बाग फूलांचि शींपून गेली
**
श्रावणाला सणांची झळाली
रात खेळात जागून गेली
**
नाकळे आयुष्या काय मागू?
जीतही फार लागून गेली
**
हासुन काय बोले मला गे
रातराणी हि गंधून गेली
**
चोरली का कुणी प्रीत माझी?
ह्रीदयी का कडाडून गेली?
**
मी मनाशीच केली लबाडी
वासना साच सांगून गेली
**
भेटली ती कधी पावसाळी
जीवना अर्थ सांगून गेली
**
चालता जीवनी तू नभाला
बोलता का खिजवून गेली?
**

शब्दखुणा: 

काय माझे भावनांचे (गझल)

Submitted by प्रकाश साळवी on 1 August, 2017 - 02:56

काय माझे भावनांचे गुंफलेले गीत देऊ
का फुलांचे प्रेमवेडे स्वप्न माझे मीच देऊ
**
मी उन्हाचे सोसलेना घाव काही सोसणारे
मी कुणाला श्वास देऊ की कुणाला चंद्र देऊ
**
काय माझी स्वप्ने उद्याचीच ही सांगू कुणाला
कापणा-या वेदनांचे काय सर्व घाव देऊ
**
मी जगाला काय सांगू चंद्र माझा झोपलेला
तेज माझे फाकलेले चांद्ण्यांचे गीत देऊ
**
संपले आयुष्य देवा नांव नाही घेतले मी
काय वाहू ओंजळी की नासलेला देह देऊ
**
मी तुझ्या प्रेमात काही नाहि केली चूक काही
प्रेम माझे भाबडे हे सांग माझे प्राण देऊ
**

शब्दखुणा: 

का स्वतःशी बोलताना

Submitted by कायानीव on 28 July, 2017 - 07:05

का स्वतःशी बोलताना लोचने पाणावली
अन मनीचे सत्य कळता वेदना झंकारली

मी तुझा होणार नाही माहिती आहे तुला
का मनी गं तू उगाचच मूर्त मम साकारली

सागराची लाट वेगे कातळाला भेटली
मोडल्यावर ती परत का सागरी सामावली

आसमंती ही गिधाडे, आज का घोंघावती
जीव माझा जात असता, का मनी आल्हादली

वास्तवाच्या या जगी मी, भासमानी राहिलो
भौतिकाला पारखा पण, मी कला जोपासली

©मनीष पटवर्धन
+919822325581

शब्दखुणा: 

गुलाम तुझ्या आठवांचा !!

Submitted by प्रकाश साळवी on 18 July, 2017 - 05:20

गुलाम तुझ्या आठवांचा !!
=============
**
तुझ्या आठवणींचा मी गुलाम झालो
भरल्या घरात मी खुले आम झालो
**१**
शोध घेतला तुझा पाताळ - अंतराळी
प्रितीच्या या खेळात मी बदनाम झालो
**२**
थांग ना लागे तुझा, तुझ्या सावलीला
तुला शोधता शोधता मी गुमनाम झालो
**३**
बाजारी मी ठेवले तुझ्या आठवांना
भरल्या बाजारीच मी निलाम झालो
**४**
सोडू पहाता साथ तुझ्या आठवांची
कैफात माझ्या मी धुंद बेफाम झालो
**५**
रास रंगात आला तुझ्या आठवणींचा
रास रंगताना मी कृष्ण घनशाम झालो
**६**

विषय: 
शब्दखुणा: 

प्रीत अंतरीची

Submitted by प्रकाश साळवी on 12 July, 2017 - 03:12

गझल :
वृत्त : मंजुघोषा
मात्रा : २१
गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा

प्रीत अंतरीची

प्रेम माझे हृदयान्तिचेच आहे
गाईले गाणे तुझे ते मीच आहे

गंध जो कस्तुरीचा नाहीच आला
सांग त्यांना प्रीत ही माझीच आहे

प्रेम बोले हृदयी प्रीतीत जागा
प्रीत माझी अंतरी जागीच आहे

आणले तोडून तारे तूज साठी
गोफ त्यांचा तू गा माळीलाच आहे

शिम्पता बागा प्रितीच्या प्रेम लाभे
प्रितीच्या रंगात रंगीलाच आहे

प्रकाश साळवी दि. २७ मे २०१४.

शब्दखुणा: 

ठेव गुंडाळून आता शायरी

Submitted by कविता क्षीरसागर on 29 June, 2017 - 08:59

ठेव गुंडाळून आता शायरी ..

सर्व काही ठीक आहे सासरी
फक्त खुपते कोरडेपण अंतरी

फार त्याचा भार नाही घ्यायचा
शिकवती सगळ्या चुका काहीतरी

पावसाळी होत जाते ती पुन्हा
यायला जेव्हा उशिर होतो घरी

शक्य तर दुःखातुनी बाहेर पड
हासणारे बाळ बघ मांडीवरी

संयमाचे तू मला सांगू नको
त्याविना का करत आहे चाकरी ?

झोप आहे वेदनेला लागली
ठेव गुंडाळून आता शायरी

पाहिजे तेव्हा मला मी विसरते
देणगी लाभे अशी ही ईश्वरी

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गझल