गझल

Submitted by प्रकाश साळवी on 1 August, 2017 - 03:13

भावना काय बोलून गेली!
सावली काय सांगून गेली!
**
मी मनाच्या ग शोधीत वाटा
बाग फूलांचि शींपून गेली
**
श्रावणाला सणांची झळाली
रात खेळात जागून गेली
**
नाकळे आयुष्या काय मागू?
जीतही फार लागून गेली
**
हासुन काय बोले मला गे
रातराणी हि गंधून गेली
**
चोरली का कुणी प्रीत माझी?
ह्रीदयी का कडाडून गेली?
**
मी मनाशीच केली लबाडी
वासना साच सांगून गेली
**
भेटली ती कधी पावसाळी
जीवना अर्थ सांगून गेली
**
चालता जीवनी तू नभाला
बोलता का खिजवून गेली?
**
पाहता मोकळे रान येथे
झाड हे येक लावून गेली
**
प्यायले काय रंगात पेले
प्रेम चीत्र चितारून गेली
**
मैफली गायिली गीत माझे
भैरवी नाद लावून गेली!
**
लाविले वेड माझ्या मनाला
झोप माझी उजाडून गेली
**
बासुरी वाजली गोकुळी ग
राधिका की थरारून गेली
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
३१-०७-२०१७
९१५८२५६०५४ मोब.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users