Deep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान

Submitted by मार्गी on 28 April, 2021 - 11:01

सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो.

योगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीर रिलॅक्स होतं व मन शांत होतं. शरीराचे ताण व मानसिक स्ट्रेससाठीही उपयोगी आहे. शक्यतो डोक्याखाली उशी न घेता झोपलेल्या स्थितीमध्ये ३५ मिनिट दिलेल्या सूचना ऐकून सहजपणे करता येणारा हा ध्यान प्रकार आहे. आपल्या सोयीने चटई, सतरंजी किंवा गादीवर झोपून सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा झोपतानाही आपण हे करू शकता. शवासनात आडवे होऊन फक्त सूचनांनुसार स्वतःला रिलॅक्स करत जायचं आहे. इथून आपल्याला सूचना डाउनलोड करून ऐकता येतील. हे एक music असलेलं guided meditation आहे. https://drive.google.com/file/d/12Ll2_N0IQgXACOMMduHP59VSJQOUQ8ja/view?u...

त्याशिवाय कोणत्याही प्रकारे कंफर्टेबल स्थितीमध्ये बसून करता येणारा ध्यानाचा- deep relaxation चा एक सोपा प्रकारसुद्धा मी घेतला आहे. हे अर्धा तासाचं खोलवरचं रिलॅक्सेशन आहे. इथून म्युझिकसह असलेल्या सूचना डाउनलोड करून ऐकता येतील:
https://drive.google.com/file/d/1VIdQ2AtUMbdkJVdnPyGgg58YyIx0EnX8/view?u...

अनेक जणांनी ह्या दोन्ही प्रकारांबद्दल फीडबॅक दिला आहे. तणाव, शारीरिक वेदना व अस्वस्थता असतानासुद्धा हे ऐकून बरं वाटलेलं आहे. आणि रिलॅक्स होण्यासाठी मदत झाली आहे. हे ऐकताना आपण शांत होणार असल्यामुळे हे ऐकताना आपला मोबाईलही शांत ठेवावा लागेल. सध्याच्या कठीण काळात खूप उपयोगी राहील. आपल्या जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावं. धन्यवाद.

(योगनिद्रा व ध्यान निवेदक- निरंजन वेलणकर niranjanwelankar@gmail.com, 09422108376 सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांच्या दु:खावर फुंकर घालणारा आणि मृत्युबद्दल विचारमंथन करणारा माझा लेख- http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_28.html)

Group content visibility: 
Use group defaults

माझ्या योगगुरूंनी एकदा क्लासमध्ये योगनिद्रा घ्यायला लावलेली. खूप छान वाटले होते. ड्राइव्हच्या लिंकबद्दल धन्यवाद.

ड्राइव्हच्या लिंकबद्दल धन्यवाद. . अगदीच बाळबोध शन्का आहे .
हे करत असताना झोप नाही का येत?
माझा स्वताचा अनुभव असा आहे की बराच्वेळ असं काही तर रिलॅक्स वगैरे करायचा प्रयत्न केला तर सरळ झोप लागते .
किन्वा , अशी झोप लागणं हे मान्सिक आणि शारिरिक थकव्याच लक्षण म्हणता येईल का?

सर्वांना धन्यवाद!

शक्य असल्यास ऐकल्यानंतर अनुभवाबद्दल फीडबॅकसुद्धा द्यावा.

@ स्वस्ति, हो, झोप लागू शकते. आणि ते हानिकारक नाहीय. कारण अशा झोपेची खोली जास्त असते. जास्त पॉवरफुल झोप लागते. आणि ते मानसिक/ शारीरिक थकव्याचं लक्षण नाही म्हणता येणार. झोप जर जास्तच सहज लागत असेल तर त्यासाठी बसून करण्याचं दुसरं रिलॅक्सेशन- ध्यान आहेच. Happy धन्यवाद.

<<<हे करत असताना झोप नाही का येत?
माझा स्वताचा अनुभव असा आहे की बराच्वेळ असं काही तर रिलॅक्स वगैरे करायचा प्रयत्न केला तर सरळ झोप लागते .
किन्वा , अशी झोप लागणं हे मान्सिक आणि शारिरिक थकव्याच लक्षण म्हणता येईल का?>>>

योगनिद्रेची सवय नसेल तर सुरुवाती सुरुवातीला झोप येऊ शकते. पण त्यात चुकीचं असं काही नाही.
जर झोप लागलीच महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे :
झोप लागल्याबद्दल अजिबात अपराधी भावना वाटून घ्यायची नाही.
आणि झोपेतून जाग येईल त्यावेळेस चटकन उठून बसायचं अथवा उभं रहायचं नाही.

सुंदर आणि अगदी हवा आहे त्या वेळी आलेला धागा. पहिली लिंक जस्ट ओपन करून पहिली, निवांत वेळ काढून सूचना फॉलो करत ऐकेन. खूप धन्यवाद. माझ्या निवडक मध्ये ठेवते हा लेख.

धन्यवाद निरुदा .
एकदा ऑफिसमध्ये असं एक सेशन झालेलं .
सुरुवातील लेक्चर , मग बैठे व्यायाम मग असं रिलॅक्शेशन .
मी गाढ झोपलेले , ५-१० मिनिटच पण झोपून गेले . Happy .

आमच्या ऑफिसमध्ये एक मेडिटेशनचे सेशन झाले होते. मला खूप छान अनुभव आला.आपण एखाद्या जलाशयात संपूर्ण बुडालेलो आहोत. संथ लाटा आपल्या मस्तकावरती तरंग उमटवत आहेत. जलाशयाच्या वरती ढग वहात आहेत जे की विविध मूडस आहेत. अशा प्रकारचे असीम शांतीचे विचार मनात आले.
आज रात्री आपली ऑडिओ फाईल ऐकेन.
ब्लॉग आवडला.