झेन

झेन कथा ५- आज्ञाधारक

Submitted by ठमादेवी on 11 March, 2011 - 03:43

गुरू बंकेईचे विचार ऐकायला फक्त विद्यार्थीच नव्हे तर इतरही वेगवेगळ्या धर्माचे पंथांचे आणि व्यवसायातले लोक येत असत. तो कुठलेही मंत्र ऐकवत नसे किंवा चर्चांमध्येही सहभागी होत नसे... एके दिवशी एका चौकात तो व्याख्यान देत असताना एक माणूस उभा राहिला आणि म्हणाला,

जे लोक तुझा आदर करतात ते तुझ्या आज्ञेचं पालन करतात ना?

बंकेई म्हणाला, हो हे खरं आहे...
त्यावर तो माणूस म्हणाला, पण मी तुझा आदर करत नाही... मी तुझ्या आज्ञा ऐकणार नाही... मला बघायचंय की तू मला आज्ञा कशी पाळायला लावतोस...

बंकेई म्हणाला, तू लांबून का बोलतो आहेस? समोर येऊन बोल... माझ्या जवळ ये...

विषय: 

झेन कथा- ४ मूठभर चांदणं

Submitted by ठमादेवी on 10 March, 2011 - 02:30

रेकॉन हा झेन गुरू अत्यंत साधेपणाने राहायचा... त्याच्या झोपडीत काहीही नव्हतं...

एके रात्री त्याच्या झोपडीत चोर शिरला. त्याला चोरण्यासाठी काहीही मिळालं नाही... पण रेकॉनने ते पाहिलं... म्हणाला,

तू माझ्याकडे खूपच दुरून आलेला दिसतो आहेस... तेव्हा तू रिकाम्या हाताने जाऊ नयेस... तुला मी भेट म्हणून माझे कपडे देतो... असं म्हणून त्याने अंगावरचे कपडे उतरवले आणि त्या चोराला दिले... चोर निघून गेला...

तो गेल्यावर गुरू नग्नावस्थेत विचार करत बसला होता... त्याच्या झोपडीत चांद्णं विखुरलं होतं...

तो म्हणाला, अरेरे, मी त्या चोराला मूठभर चांदणं तर नक्कीच देऊ शकलो असतो...

विषय: 

झेन कथा- ३ स्वर्ग आणि नरक

Submitted by ठमादेवी on 9 March, 2011 - 06:56

नोबुचगे नावाचा एक सैनिक गुरू हाकुइनकडे आला... त्याने विचारलं,
गुरूजी मला स्वर्ग आणि नरकातला फरक सांगू शकाल काय?
हाकुइनने विचारलं, तू कोण आहेस?

मी एक सामुराय आहे, तो म्हणाला...

तू सैनिक आहेस? तुमच्या राजाने कसले सैनिक भरून ठेवलेत? तुझा चेहरा तर एखाद्या भिकार्‍यासारखा दिसतोय...

नोबुचगेला राग आला आणि त्याने तलवार बाहेर काढायला सुरूवात केली... त्यावर गुरू म्हणाला, तुझ्याकडे तलवार आहे होय? पण माझं शीर कापून काढायला ती अगदीच अपुरी आणि बोथट आहे...

ते ऐकून रागावलेल्या नोबुचगेने तलवार पूर्ण बाहेर काढली... त्यावर हाकुइन म्हणाला,

इथे नरक सुरू होतो...

विषय: 

झेन कथा- २... नदी आणि सुंदर तरूणी

Submitted by ठमादेवी on 9 March, 2011 - 03:08

तांझन आणि एकिडो हे दोन झेन धर्मगुरू भर पावसात चिखल भरलेल्या रस्त्यावरून जात होते... समोर एक नदी होती, ती भरून गेली होती आणि किमोनो घालून चाललेल्या एका सुंदर तरूणीला ती ओलांडता येत नव्हती. तांझनने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि नदी पार केली... ती तरूणी त्याचे आभार मानून निघून गेली. एकिडो काहीच म्हणाला नाही. शेवटी रात्री त्याने विषय काढलाच,

आपण धर्मगुरू आहोत आणि आपल्याला स्त्रियांच्या, विशेषतः सुंदर स्त्रियांच्या जवळ जाण्याची परवानगी नाही... तू त्या मुलीला उचलून का घेतलंस?

विषय: 

झेन कथा

Submitted by ठमादेवी on 8 March, 2011 - 06:04

झेन कथा... जपानी संस्कृतीतल्या या कथा भारतात फारशा ठाऊक नाहीत... पण या कथा वाचकांच्या मनात घर करून जातात... तेराव्या शतकात जपानी धर्मगुरू मुजू याने सांगितलेल्या या कथा आजही तितक्याच आवडीने वाचल्या जातात.
रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद या अवघा चारेक ओळींच्या कथांमध्ये आहे... या फक्त १०१ कथा आहेत... पण प्रत्येक वेळी वाचताना त्या एक नवी अनुभूती देतात... विसाव्या शतकाच्या सुरूवातीला त्या इंग्रजीत आल्या आणि नंतर संपूर्ण जगभर पसरल्या... जीवनाचा वास्तववादी दृष्टिकोन देणार्‍या या कथा अत्यंत सुंदर आहेत...

विषय: 

Pages

Subscribe to RSS - झेन