पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा|
भक्तीचा उमाळा| अपरिमित ||
सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर|
श्रद्धेचा महापूर| अखंडित||
पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी|
नाम संकीर्तन| प्रवाही||
टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार|
विणेची झंकार| संगीतमय||
विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं|
भक्तांची रांग| अविरत||
माझ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग
संकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा
शर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत
निश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा
स्वप्नांची लचके तोडली मी स्वत:
पराभवाने दिली मात पुन्हा एकदा
कष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण
अपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा
प्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च
नियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा
सुखांना जिंकण्याचा भास मला झाला
दु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा
काळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ
संकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा
शब्दांना तिने ओठात अडवल
उसनं हसु चेहऱ्यावर धाडल
सावज तिच होत चिलखती
पण तिने त्याला अनुल्लेखाने मारलं...
सावजानेही केली बरीच तडफड
वार चुकवण्याची निष्फळ धडपड
पण कुठेतरी त्याला वर्मी लागल
अन् तिने त्याला अनुल्लेखाने मारलं...
कशाची बंदुक आणि कसली कट्यार
तिच्याकड नव्हत कोणतही हत्यार
न पाहताही तिने सावजाला नेमक हेरल
अन तिने त्याला अनुल्लेखाने मारलं...
निखिल २३-१०-२०१८
शब्दांनी नाती जोडली जातात
शब्दांनी नाती तुटतात
शब्द म्हणजे दुधारी तलवार
करावा त्याचा नाजूक वापर
समजावूनी मी थकलो
नाही उरला आता त्राण
पांडुरंगा तू बघतोयस मजा
वाटतीय मला आता ही सजा
घालतोय साकडे आता
शब्दाचा खेळ माझ्याने थांबेना
होतील ज्यामुळे सतत वाद
करतोस का असे सगळेच शब्द बाद
मराठीत भाषेत अन्य भाषांमधून होणारी आवक आपल्याला नवी नाही.महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमधे बोलल्या जाणार्या भाषांपासून ते फारसी,इंग्लिश,पोर्तुगीज,अरबी अशा बर्याच भाषांमधून ही आवक झालेली आहे.
काही शब्द तर मूळचे मराठी नाहीत हे सहजपणे लक्षातही येणार नाही इतके ते मराठी भाषेत बेमालूमपणे मिसळले आहेत,स्वीकारले गेले आहेत.
ही आवक अजूनही सुरुच आहे.
पण ही आवक किती होऊ द्यायची यालाही काही मर्यादा असाव्यात,त्यामागे निश्चित असे धोरण असावे असे वाटू लागले आहे.
खालील वाक्ये पहा.
"हार्डडिस्क केबलनं लॅपटॉपला अॅटेच केली की विदीन टेन सेकंद लॅपटॉप आपोआप बंदच होतो."
असे म्हणतात दर १२ कोसाला भाषा बदलते. शब्दाचे काय आहे पावसाचे पाणी जसे जमिनीत मुरते तसे शब्द आप-आपल्या भाषेत मुरतात. कधी एखाद्या शब्दाने माणसाला वजन प्राप्त होते तर कोणाच्या बाणेदार बोलण्याने शब्दाला धार चढते. शब्दाची श्रीमंती तुमच्या भारदस्त उच्चारात नसून शब्दाच्या आपलेपणात आहे. एखादा विशिष्ट शब्द एखाद्या माणसाची ओळख सुद्धा होऊ शकते.
शब्द रुसवा
शब्दब्रह्म आज का रुसले
नाद ब्रह्म अंतरी हेलावले
प्रसवे ना काव्य आता
प्रतिभा ती जातसे लयाला ॥१॥
उगम शब्दांचा अंतरी होईना
प्रसवकळा त्या प्रतिभेस येईना..
मन मारूनी रचना गुंफता
समाधान ते चित्ती मिरवेना ॥२॥
मिटता डोळे सरस्वती आठवे
तिच्या स्मरणे जागृत व्हावे
भाव भक्तीने ह्रदय भरता
सहजी काव्य निर्मित व्हावे ॥३॥
―₹!हुल १९/०७/१७
सावरकरांनी अनेक नवे शब्द मराठीला दिले.
त्या सर्वांची "अधिकृत" यादी आणि ते सर्व शब्द सावरकरांनी कोणत्या लिखाणातुन ( वर्तमानपत्र / पुस्तक ई.) जगासमोर मांडले त्यांचे अधिकृत स्त्रोत / संदर्भ मिळु शकतील काय?
मोघम संदर्भ नको. एखादे छापील पुस्तक / लेख / वर्तमानपत्र ई. प्रकारचे काही असेल तर चांगले.
आगाऊ धन्यवाद.
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..
इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!
थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..
शब्द असावा कोरलेला
ह्रदयातून ऊगवलेला
अानंदून स्फूरलेला
ओठातून गायलेला
ऊदासही असेल शब्द कधी
डोळ्यातून पाझरलेला
शब्द असावा सच्चा
भावनांचे चित्रच ते
शब्द वाटत राहावे
ओंजळी भरभरून
देणा-याचे ओझे
देण्या गणीक वाढावे
धेणा-याला मात्र हलके हलके व्हावे