शब्दांचे खेळ

Submitted by अक्षय. on 11 July, 2018 - 23:36

शब्दांनी नाती जोडली जातात
शब्दांनी नाती तुटतात
शब्द म्हणजे दुधारी तलवार
करावा त्याचा नाजूक वापर

समजावूनी मी थकलो
नाही उरला आता त्राण
पांडुरंगा तू बघतोयस मजा
वाटतीय मला आता ही सजा

घालतोय साकडे आता
शब्दाचा खेळ माझ्याने थांबेना
होतील ज्यामुळे सतत वाद
करतोस का असे सगळेच शब्द बाद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मंडळी Happy
कुणाशी झाला ब्बॉ वाद अक्षय?? >> ताई माझा कधी वाद होत नाही मी दुसऱ्या टोकाला राहण्यापेक्षा वाद घालणाऱ्याच्या पाठी उभा राहून मलाच थर्ड पर्सन बनवून वाद घालणाऱ्याला पाठिंबा देतो मग वाद घालणारा आपोआप नारमतो Lol
कसं व्हायचं तुझं कळेना!! >> मला पण कळेना Lol