मुझे वाट्या नही था, कि तुम ऐसा वागोगे, प्लम्बर भैया. तुमको परवा आने को सांग्या था और तुम आज उगवे हो. मेरी बायको म्हणती है कि पक्या को काम दो, पक्या मराठी माणूस है. लेकिन पक्या अव्वा के सव्वा पैसे घेता है. म्हणून हमने तुमको काम दिया. परंतु तुम तो आळशी निकले. वो बेसिन का नळ बिघड गया है. उद्या मेरा सासरा आनेवाला है. वो म्हातारा पान खाके बेसिन मे थुंकता है. अगर पाणी नही होंगा तो उसकी थुंकी वाळ जायेगी. अब तुम लवकर नळ दुरुस्त करो, सूर्य मावळणे के अगोदर. कारण लाईट गई है. अंधार पड गया तो तुमको दिसेगा नही.
ती साकारत असलेलं पात्रच तसं होतं. 'रांधा वाढा उष्टी काढा...' या काळातली स्त्री तिने साकारली होती.
पोटात भुकेची आग. पण कामावरची अपार निष्ठा तिला जेवू देत नव्हती. कारण तिचीच प्रमुख भूमिका असलेला हा प्रयोग तिच्यासाठी फार महत्वाचा होता. तो यशस्वी होण्यासाठी तिने जीवापाड मेहनत घेतली होती. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रेक्षागृहातून भरभरून प्रतिसादही मिळत होता.
दहा वर्षांनी कॉलेजमेट्सच्या रियुनियनचा योग आला. पावसाळ्यात करायचे ठरले.
वर्षाविहार रियुनियन!
सारे आले होते. "ते दोघे" वगळून! पाऊसही तसाच धुंद होता. दहा वर्षांपूर्वी असायचा तसाच. आणि आम्ही सारेच रेनडान्स करत होतो. दहा वर्षांपूर्वी करायचो तसेच. पण माझ्या मनात प्रश्न येत होते. ते दोघे का आले नसावेत? कॉलेजमध्ये त्यांचे प्रेमप्रकरण किती गाजलेले. आता कुठे असतील? काय झाले असेल?
आणि अचानक माझे लक्ष गेले. ते दोघे सुद्धा आम्हाला जॉईन झाले होते. "अरे तुम्ही दोघे कधी आलात?", असे विचारत मी त्यांच्याकडे निरखून पाहीले. एकमेकांसोबत डान्स करत होते खरे.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
तिचे निस्तेज डोळे अजूनही उघडेच होते. आजवर ज्यांच्यासाठी ती राबली, त्यांनी आज टिपं गाळण्यापलिकडे काहीही केलं नव्हतं. पण त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती. त्याला हे बघवेना. जाऊ दे, म्हणून त्याने पाठ फिरवली.
महाशिवरात्री
देवळापुढे ५० माणसं रांगेत होती. प्रत्येकाच्या हातात दूध, फुलं. मी असं काही नेत नाही. फक्त पाणी होतं. मोठी रांग होती. उभी राहिले.
रांग सरकत होती. थोड्या अंतरावर एक कचरा वेचणारी, सगळा देह कचरा पेटीत घूसवून कचरा ढवळत 'सामान' शोधत होती. तिथे जवळच एका फटकुरावर तिचं ४/६ महिन्याचं मूल रडत होतं. इतकं की, त्याचे ओठ थरथरत होते.
कसंसच झालं. वाटलं, तिलाही झालंच असेल. पण काय करेल.
मी तिला आवाज दिला. ती बाहेर आली. विचारलं..
"ये सामानसे तुम्हे कितने पैसे मिलेंगे?"
म्हणाली.. "४०-५०"
आत्ता या क्षणाला मला काय वाटतंय सांगू?
तुला घट्ट मिठीत धरावं, अजिबात सोडू नये..
तुझ्या त्या रेशमी केसांमधून हात फिरवावा,
तुझे ते मऊ गाल, ते पाणीदार डोळे जे सतत साऱ्या जगाला अंधारात ठेवत आले, ते मखमली ओठ ज्यांनी कधी सत्य बाहेर नाही येऊ दिलं,
त्यांवर करावा चुंबनांचा वर्षाव अन् झोकून द्यावं स्वतःला त्या काळोख्या अंधारात तुझ्यासवे..
असं कवटळावं की फक्त तो मृत्यूच तुला माझ्यापासून वेगळा करू शकेल...
पण पाय उचलत नाहीयेत, हात धजत नाहीये..
एक गोष्ट आहे जी घट्ट रुजवली गेलीये मनामध्ये लहानपणापासून...
मर्यादा...
वेळेवर येणे याला जमणारच नाही ! संतापाने पुटपुटत सोन्या , शंकुच्या नावाने शिमगा करत येरझारा घालत होता. त्याला कसलिशी चाहूल लागली आणी त्याने वळुन डावीकडे पाहीले. डोळे भक्कन मोठे झाले, तोंडाचा आ झाला, हातपाय थरथरु लागले . समोरुन ती तिच्याच धुंदीत चालत येत होती. उजळ वर्ण, वार्यावर उडणारे मऊशार केस, डौलदार चाल चेहेर्यावर आत्मविश्वास झळकत होता. सोन्या स्तब्ध होऊन तिला नजरेने पित होता.
काय रे? मला उशीर झाला ना ! असे म्हणत शंकु मागुन आला आणी तो पण नजर विस्फारुन त्या सौंदर्यवतीकडे बघु लागला.
तो भुकेने व्याकुळ झाला होता. कितीतरी वेळापासून त्याच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. भुकेल्या अवस्थेत रस्त्यावरून जात असताना खमंग वास नाकात शिरला. तेथे एक देवमाणूस गोरगरिबांना खायला देत होता. पण नशीब कसे परीक्षा घेते पहा ना, त्या अन्नदात्याजवळ त्याच्यासारख्याच क्षुधार्थ्यान्ची गर्दी होती. गर्दीतून त्याला फक्त भांड्यांचा, चमच्यांचा खणखणाट ऐकू येत होता. खाणे वाढून घेण्यासाठी वाटली जाणारी कटोरी घेण्यासाठी सुद्धा रांग होती. वाऱ्याच्या झुळकेसरशी येणाऱ्या खमंग वासाने त्याची भूक अजूनच चाळवली जात होती. तोंडाला पाणी सुटले होते. एवढा वेळ वाट पाहण्याची तपश्चर्या फळाला आली. त्याला कटोरी मिळाली.
शतशब्दकथा
बऱ्याच दिवसापासून शतशब्दकथा लिहावसं व्हावंसं वाटत होतं.
शतशब्दकथा म्हणजे नेमकं काय तर १०० शब्दांत मांडलेली आशयघन/मार्मिक/गंमतीशीर कथा.
कथा मांडणं तसं ठीक आहे पण हे १०० शब्द मोजायचे कसे वा कोणी; ह्या प्रश्नाने मला विचारात पाडलेले. पण मनात आलं, जितक्या कथा वाचल्या त्यातील एकाही कथेने खरंच १०० शब्द पुर्ण केले असतील का? कथा टाकण्यापुर्वी येथील अॅडमिन/संपादकाने योग्य खातरजमा केली असेल का?
जर नसेल तर काही बदल सुचवले असतील का?
पण जाऊ देत काही का असेना, आपण आपले कर्म करत राहावे.
सबब, मनात काहीही किंतु न ठेवता शेवटी शतशब्दकथा लिहायला घ्यायचं ठरवलं
अवकाशातून पृथ्वी निळ्याऐवजी शुभ्रधवल भासत होती.