शब्द...

शब्द, शब्द....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 June, 2012 - 04:43

शब्द, शब्द...

इकडून तिकडे नेती वाहून
नाही कधीही हमाल रे
नित्यनूतन सदैव ताजे
शब्द मोकळे खुशाल रे

शब्द नेमके अर्था दाविती
कधी ना लावी गुर्‍हाळ रे
कुणीही करु दे अर्थ अनर्थी
लाऊ न घेती किटाळ रे

कितीही मोठा अर्थ बांधिती
शब्द केवढे विशाल रे
उलगडून तो दावित असता
होती आपण रुमाल रे

शब्दाशब्दी वाढत जावो
कधीही ना बेताल रे
आपण अपुल्या जागी र्‍हाती
हे मुलखाचे खट्याळ रे

रंगत आणिती जीवनात या
शब्द नुसती धमाल रे
रंग न अंगा लावून घेती
कितीदा नावाजाल रे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शब्द...