समुद्र किनारा दिवसा त्याच्या फेसाळणार्या लाटा, क्षितिजापर्यंत नजरेपासून न हटणारे पाणी, खेळणारी हवा ह्यामुळे फेरफटका मारायसाठी अगदी आवडीचे ठिकाण असते. पण ह्याला अजून लावण्यमय रुप चढते ते सुर्यास्ताच्या वेळी. आपल्या देशातून दुसर्या देशात जाताना सुर्य केशर शिंपडीत समुद्र किनारा केशरी करुन जात असताना.
१)
अलिकडे दर शनिवार-रवीवार सकाळी लवकर उठून फिरायला जायची सवय लावून घेतली आहे. (जबरदस्तीने , पर्यायच नाही राव )
असो, तर या सकाळच्या भटकंतीत टिपलेली सुर्योदयाची काही प्रकाशचित्रे. काही बोलण्याची, लिहिण्याची गरज भासणार नाही असे वाटले म्हणून जास्त साहित्य न पाजळता फक्त प्रचि टाकतोय
प्रचि १
प्रचि २
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी हे गाव लाखांदूर - देसाईगंज मार्गावर दोन्ही बाजूने अंदाजे 9 कि. मी. वर आहे. येथे वैनगंगा व चुलबंद नदी यांचा संगम आहे. या वर्षी सुद्धा मकरसंक्रांतीला या संगमावर जाण्याचा बेत शेवटी रद्द झाला आणि आता कुठेतरी जाऊन येवू या म्हणून त्याच मार्गावरील एका छोट्या टेकडी वरील मंदिराला भेट दिली. त्या ठिकानापासून संगमाच ठिकाण अवघ्या 3 ते 4 कि. मी. वर होते. मग पुन्हा एकदा मनाने भरारी घेतली आणि आम्ही संगमाकडे निघालो. तिथवर पोचेपर्यंत सूर्य मावळतीला पोचलेला होता आणि तेव्हा असे वाटले, बर झाल आपण उशीरा आलो ते. कारण ...........
प्र.चि.१
वाई येथे, गणपतीच्या देवळाकडून टिपलेला सुर्यास्तानंतरचा नजारा...