गद्यलेखन

उपक्रम २ - वसा - प्राचीन

Submitted by प्राचीन on 21 September, 2023 - 08:07

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
तिचा आनंदी, उत्साही चेहरा.. कारण आज बर्‍याच काळाने रजनीताई भेटणार होत्या...
त्याला आठवली, तिची पहिली भेट. गालांवरील सुकलेल्या अश्रूंनी
चितारलेला रुसवा चेहऱ्यावर मिरवणारा गोडवा.. फिरत्या
शाळेत यायचंच नव्हतं तिला.. रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये दिवसभर हुंदडणं किती मजेचं. तेही वेगवेगळ्या ठिकाणी.. पण त्यानं "दादा" गिरीनं स्वतःबरोबर तिलाही डोअरस्टेप स्कूलमध्ये यायला लावलं.

उपक्रम २ - 'रेल' चेल मेजवानी - प्राचीन

Submitted by प्राचीन on 19 September, 2023 - 14:51

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."

फलज्योतिष कशासाठी

Submitted by पशुपत on 11 September, 2023 - 06:58

फल ज्योतिष याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात कुतूहल निश्चितच असते. त्याच्यावर विश्वास असणाऱ्या लोकांमध्ये तर याबद्दल खूप आकर्षण असते .
यासंदर्भात दोन-तीन विचार मला वाचकांसमोर ठेवायचे आहेत आणि त्यावर साधक अशी चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

शब्दखुणा: 

तो

Submitted by सामो on 25 August, 2023 - 17:07

----------- अन्यत्र पूर्वप्रकाशित-------------------
(i do not know what it is about you that closes
and opens;only something in me understands
the voice of your eyes is deeper than all roses)
nobody,not even the rain,has such small hands- E. E. Cummings

खरं आहे, त्याच्या व्यक्तीमत्वातील असे काय आहे , जे कधी उमलतं, तर कधी मिटून जातं? - तिला कधीच समजलं नाही. अन ते तसं पकडीत न येणं, न समजणं, त्याचं कविता असणं हे फक्त maddening होतं, वेड लावणारं होतं. अनेक संदर्भ, उत्तरं टाळणं, अर्थ, Fill in the blanks समोरच्यावर सोडून देणं .... अगदी कवितेसारखं.

१४ मे बार बार! भाग-२

Submitted by केशवकूल on 19 August, 2023 - 02:02

(ह्या कथेचा पहिला भाग https://www.maayboli.com/node/83719)
पुनश्च १४ मे
सकाळी साडेसहा वाजता गजर वाजला आणि तो नेहमीप्रमाणे आज झोपला आणि काल सकाळी उठला. १४ मेला रात्री झोपला आणि १४ मेला सकाळी उठला!
हा गजर बरा पडतो. बायको उठून गदा गदा हलवून जागं करणार त्यापेक्षा हा नाजूक किणकिण करणारा गजर परवडला. उठायचा अगदी कंटाळा आला होता. रोज रोज उठायचा कंटाळा करून कसं चालेल?

ती, तो आणि चुनु.

Submitted by केशवकूल on 17 August, 2023 - 23:38

ती, तो आणि चुनु.
रविवारची संध्याकाळ. आज तिच्या माहेरच्या कुणाच्यातरी लग्नाचे रिसेप्शन होते. ती आत तयार होत होती. हा बाहेर दिवाणखाण्यात बसला होता. तेव्हढ्यात तो लहान मुलगा आला. बेल न वाजवताच आत आला.
“काका. आईला पेपर पाहिजे आहे.”
“देतो, पण आधी नाव सांग.”
“चुनु. आता पेपर द्या.”
“चुनु काय? सगळं नाव सांग. मग पेपर देईन.”
“चिंतामणी वसंत राव. पेपर.”
“आडनाव?”
“सांगितलेकी. राव.”
“राहतोस कुठे?”
“तुमच्या शेजारीच.”
“लाडू खाणार?” त्याला त्याच्याशी गप्पा मारायला छान वाटत होते.
“नको.”

जगण्याचे सोने व्हावे…

Submitted by झुलेलाल on 13 August, 2023 - 08:11

जगणे आणि जिवंत असणे यातला फरक जेव्हा कळतो तेव्हा जगणे अधिक आनंदी होते. हा फरक सूक्ष्म असतो, पण अनेकदा तो समोर आला तरी जाणवत नाही. बऱ्याचदा तो सहजपणे समोर येऊनही, पकडून ठेवायचं सुचत नाही. मग आपलं जगणं म्हणजे केवळ जिवंत असण्यापुरतंच उरतं. जगण्याचा साक्षात्कार व्हावा, केवळ जिवंतपणाच्या सपक जाणिवेतून बाहेर पडून जगण्याचा जिवंत अनुभव घ्यायचा असेल, तर त्याचा जाणीवपूर्वक शोधही घ्यावा लागतो. अनेकदा, अचानक हा अनुभव समोर येतो, आणि ज्याच्या शोधात आपण चाचपडत होतो असे वाटते, तो शोध संपतो.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन