डबल चेक
Submitted by इन्द्रधनु on 9 March, 2026 - 04:13
बर्लिनच्या टीगल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचे विमान उतरलं आणि वीस वर्षांपूर्वीच बर्लिन मधील आमचं वास्तव्य माझ्या डोळ्यावर समोरून झरकन सरकलं. साल 1989 ते 1991 या काळात मला बर्लिन युनिव्हर्सिटीमध्ये जर्मन गव्हर्मेंटची रिसर्च फेलोशिप मिळाली होती. त्या निमित्ताने आमचं दोन वर्ष वास्तव्य येथेच होत. आमचं म्हणजे आम्हा तिघांचं; मी, मंजिरी आणि नीरज यांचं. प्रथमच भारताच्या बाहेर वास्तव्य करणार असल्यामुळे आमच्या करता हा काळ सनसनाटी तर होताच, इतकच काय तर 1989 हे साल जर्मन इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाणार होतं. कारण याच वर्षी जर्मनीचे युनिफिकेशन झालं होतं.
विषय:
शब्दखुणा: