काहिच्या काही कविता

सिक्रेट धंद्याचे

Submitted by पाषाणभेद on 11 November, 2019 - 23:56

एक बारडान्स गर्ल दुसरीला विचारी
का ग तर्रन्नूम, तु घरी दिसत होती दिवसा दुपारी

गेल्या आठवड्यापासून आता तर ते ही नाही
काही आजारी आहे का? का इतर काही?

"क्या बोलू निलूराणी तुझे, - बोले तर्रन्नूम
आजकल मै हू बडी बिज्जी," - गाली गोड हासून

रात भर सोनेच नै देते लोगां, निस्ती डुटी करती
वहाँ से मै आती और दिन में ओवरटाईम करती

निलू बोले, "मजा है बै तुझी काम मे बिज्जी
माझा तर धंदा नै कै, मी घरातच फसी"

तर्रन्नूमने सांगितले सिक्रेट धंद्याचे
आधी होते तिचे वांधे खायचे

प्रेम...

Submitted by आयटीगर्ल on 19 April, 2015 - 17:03

प्रेम..

प्रेम म्हणजे प्रेम ते काय असं सांगता येत नसतं
तुमचं आमचं आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असतं

कोणाचं प्रेम आंधळं तर कोणाचं डोळस असतं
कोणाचं प्रेम स्वार्थी तर कोणाचं निर्व्याज असतं

प्रेम गलितगात्र झालेल्याला नवीन प्राण जसं देतं
प्रेमाच्या फटक्यात कोणी साफ आडवं पण होतं

प्रेमावर कविता करण्याईतकं ते सहज सोपं नसतं
प्रेमावरचा विश्वास गमावण्याईतकं ते कठोरही नसतं

~~ITG

धागा

Submitted by कोकण्या on 8 May, 2013 - 08:32

गझले वरच्या गझला वाचुन आणि त्यातिल प्रतिसाद पाहुन एक फुटकळ काव्य सुचले ते इथे टाकत आहे. त्यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी हे डीलिट करुन टाकेन.

(आणि इथे ते सुट होत नसेल तर इतरत्र हलविन्यात येयिल)

एक टाइम पास प्रयत्न

कोणाचा हा धागा
कोणाचा हा त्रागा
कोण भरे रागा
कळेनाचि!!

गझलेच्या बागा
करुनिया रोगा
करमे ती भोगा
फळेनाचि!!!

सरांचा तो सोगा
देउनिया दगा
ओढण्याचा त्रागा
संपेनाचि!!

कोण म्हने उगा
फोडतो हा फुगा
कवटाळी खगा
रुचेनाचि!!

कोन इथे सगा
पांघरुनी झगा
देयीलही दगा
मीळेनाचि!!

नसतेस ऑनलाईन तू...

Submitted by हर्षल_चव्हाण on 26 March, 2013 - 02:57

नसतेस ऑनलाईन तू, इंट्रेस्टच निघून जातो,
तुजवीण कुणी आवडेना, पण ऑप्शन पाहून घेतो...

येतो मी फेसबूकवरती, बोलण्या तुझ्याशी काही,
असतेस ऑफलाईन तू, मज काही समजत नाही,
मग दोनदोनदा तुझ्या त्या, प्रोफाईलवरती जातो,
अन् प्रोफाईलच्या पिकला, मी तासन् तास पहातो...

दिसतात तुझ्या अपडेट, कोपर्‍यात उजव्या जेव्हा,
आहेस ऑनलाईन तू, हे कळते मजला तेव्हा,
पण चॅटींगसाठी तुजला का भाव गडे लागतो?
क्षणभर बोलायासाठी, मी रात्रभर जागतो...

तू तरीही बोलत नाही, काहीही सांगत नाही,
वाटे जरी "खूपच झाले", तरी वाट बघत मी राही...
या फेसबूकाचासुद्धा, आता कंटाळा येतो,
काहीही मिळकत नाही, पण त्रास फुकाचा होतो...

पाउलास ओढ लागली मॉलाची

Submitted by श्यामली on 16 January, 2013 - 08:04

सेल लागलासे एक दिवसाचा
पाउलास ओढ लागली मॉलाची

वाटे आगत्याचे आम्हा आमंत्रण
स्वारीच्या खिशास बसू दे चाट

फिरताना दिसती आणखिन सेल
कसा हा टाळावा सांग मोह

मधेच आठवे, पर्स ना मॅचिंग
डिझायनर चप्पल खूणावते

ड्रेसास, पर्स, पर्सेला, चप्पल
मनास चंचल म्हणोनिया झाले

ज्वेलरीही आता जंकच घेऊ
ख-याची दुनिया राहिली नाही!!!

Subscribe to RSS - काहिच्या काही कविता