गद्यलेखन

लाल पेरू

Submitted by सुज्ञ माणुस on 4 February, 2013 - 06:34

लाल पेरू

"अरे, मस्त ग्वावा ज्यूस मिळते येथे. चल पिऊन येऊ." असे म्हणत मित्राने मला जवळ जवळ ओढतच दुकानात नेले. मी बाहेरचे काही खात नाही हे माहीत असूनही त्याने मला तिथे नेले. कारणच तसे होते, तो पुढील वर्षभरासाठी ऑनसाईट चालला होता. त्यामुळेच त्याला आनंद तर झालाच होता, पण आता वर्षभर इथले ज्यूस पिता येणार नाही म्हणून दुःख हि झाले होते.त्याच्या या आनंदासाठी मी हि मग माझा हेका सोडला आणि जाऊन बसलो लाल पिवळ्या खुर्चीवर. "दोन ग्वावा ज्यूस" अशी ऑर्डर गेली. तसा त्या वाक्याने मात्र मी १६ वर्षे मागे गेलो.

बबूची गोष्ट

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बबू त्या दिवशी खूप आनंदात होती. तिचे आजोबा तिला छ्बूच्या घरी घेऊन जाणार होते. छबू आणि बबूची एकदम घट्ट मैत्री होती. त्या दोघी एकाच वर्गात होत्या. पण बबू आणि छबू पहिलीतून दुसरीत जाणार होत्या त्या वर्षी छबूची आई छबूला घेऊन तिच्या मामाच्या घरी राहायला गेली. छबू मग नव्या शाळेत जायला लागली. छबू गेली म्हणून बबूला खूप वाईट वाटलं. एकदा जिन्याखाली बसून एकटीने रडताना तिला आजोबांनी बघितलं. त्या दिवशी पासून ते जेव्हा नदीपलीकडल्या छबूच्या मामाच्या गावी जात तेव्हा बबूला सोबत घेऊन जात. तिच्या शाळेला सुट्टी असेल तरच. पण ते नेहमीच बबूला शाळा असेल अशा दिवशी जात आणि तिला त्यांच्या बरोबर जायला मिळत नसे.

प्रकार: 

एक भयाण अनुभव .....(गूढ कथा)

Submitted by मी मी on 1 February, 2013 - 07:11

परवा आलेला एक भयाण असामान्य अनुभव .....
कुठल्याश्या अनोळखी, अजिबात आवाज नसणाऱ्या...बिन छपराच्या, आकर्षक यानात बसून
असंख्य माणूस सदृश मेटालिक कपड्यातली लोक भराभर बाहेर पडलीत ......
आकाशातून उतरणाऱ्या छोट्या गोलाकार वस्तूतून खाली आलेल्या सलाखीने...
उत्खनन सुरु केले.....वाऱ्या पेक्षाही प्रचंड वेगाने जागा खणली जात होती.....
आणि टना पेक्षाही प्रचंड वजनाची माती दूर सारली जात होती.....
मी अजूनही हे सर्व बघते आहे...मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसेना.....
कुठून आलेत हे सर्व?....कोण आहेत?...आपण पूर्वी यांना कधीच कुठे कसे पहिले नाही ?

विनोदी कथा सादरीकरण

Submitted by बेफ़िकीर on 1 February, 2013 - 01:15

मॉडर्न कॉलेज मराठी विभाग आयोजीत व पुणे विद्यापीठ पुरस्कृत:

मराठी विनोदी कथा: स्वरूप आणि सादरीकरण

या राज्यस्तरीय चर्चासत्रात, मंगळवार दिनांक ५ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी २.३० ते ४.०० या दरम्यान निवडक विनोदी कथांचे मुक्त सादरीकरण हा कार्यक्रम आहे.

वक्ते:

स्वाती महाळंक
भूषण कटककर
वैशाली मोहिते व इतर

स्थळ - मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

(हे चर्चासत्र दिनांक चार व पाच असे दोन दिवस असून यात विनोदी कथांचे स्वरूप, विनोदी कथांचे लेखन, रंगमंचीय सादरीकरण हेही उपक्रम समाविष्ट आहेत)

रस असल्यास व शक्य असल्यास जरूर यावे.

ll पार्ट आणि पार्टनर ll

Submitted by कमलाकर देसले on 31 January, 2013 - 05:09

Jan 29, 2013,
आर्टिकल (महाराष्ट्र टाइम्स -सगुण निर्गुण ) कमलाकर देसले
ll पार्ट आणि पार्टनर ll

बाफों की रानी, धागों का राजा

Submitted by एक प्रतिसादक on 30 January, 2013 - 02:50

( डिसक्लेमर : या लेखातील सर्व पात्रं काल्पनिक आहेत. वास्तवाशी त्याचा कुठलाही संबंध नाही. यातल्या नावाची व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असल्यास तो योगायोग समजावा. मात्र कुणी स्वतःवर ओढून घ्यायचंच ठरवल्यास लेखक त्याला जबाबदार नाही)

मैत्रीचं रुपांतरण

Submitted by आकाशस्थ on 29 January, 2013 - 23:39

मैत्री म्हणजे अधिकाराशिवाय केलेलं प्रेम. प्रेम म्हटलं की हक्काची भावना जागृत होवू लागते. ह्याच मालकी हक्काची परमावधी म्हणजे लग्न. समजून घेणे क्रमाक्रमाने लुप्त होत जाते. उलटपक्षी असमंजसपणा हाच नातेसंबंधांचा पाया होतो. त्यावर उभारलेले संसाराचे इमले हलक्याश्या झुळुकीने डळमळू लागते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीने पुरुषाविषयी जोपासलेला "पुरुष स्त्रीला देहभोगासाठीच जवळ करतो" हा परंपरागत दृष्टीकोन. ब-याच अंशी तो खरा असला तरी नेहमीच तो खरा असतो असं नाही. स्त्रीला पुरुषाचं रूप व पुरुषाला स्त्रीचा देह हे प्रथमदर्शनी आकर्षणीय वाटत असले तरीही कालांतराने किंवा पर्याय उपलब्ध झाला की बदलतात.

शब्दखुणा: 

आमचे गोंय (भाग ८) - स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य

Submitted by टीम गोवा on 28 January, 2013 - 07:06

मन मानसी..

Submitted by Manasi R. Mulay on 26 January, 2013 - 01:16

"जरी रोज कितीही बोललो तरी मला नाही वाटत आपलं हितगुज कधी संपेल.. मी चंचल, हळवा, हसरा, लाजरा आणि वाटलं तर तितकाच शांत, सुधीर, गंभीर आणि खंबीरही आणि तू अगदी माझीच प्रतीकृती आकाशीचा चंद्र प्रत्यक्षपणे पाहणाऱ्याला तू दिसावस आणि नदीच्या पाण्यातून पाहणाऱ्याला मी दिसावं इतकाच काय तो फरक..

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन