गद्यलेखन

चारचौघी - १२

Submitted by बेफ़िकीर on 8 February, 2013 - 03:45

तीन दिवसांच्या मनस्तापानंतर आज दहा वाजता क्रोसीन घेऊन झोपलेल्या सोहनी मॅडमना रात्री पावणे बाराला खाडकन जाग आली ती शेजारीच पडलेल्या काचेच्या तुकड्यांमुळे! अंगातले त्राण गेल्यासारख्या त्या पडून राहून काही क्षण बघतच राहिल्या फुटलेल्या खिडकीच्या काचेकडे! मिस्टर दचकून उठले आणि खिडकीपाशी गेले तर कुंपणाच्या बाहेर एक मुलगी अद्वातद्वा शिव्या देत सोहनी बाईंचा उद्धार करत होती. ती मुलगी प्यायलेली असावी असे वाटत होते. सोहनी बाई आणि त्यांचा खालच्या मजल्यावर झोपलेला मुलगाही दचकून आता आपापल्या खिडकीपाशी आले.

सोहनी बाई मिस्टरांना म्हणाल्या.

"सिमेलिया आहे ती, पोलिसांना फोन करा"

शब्दखुणा: 

चारचौघी - ११

Submitted by बेफ़िकीर on 7 February, 2013 - 06:17

हुडहुडी भरवणारा वारा! एलाईटच्या प्लँटकडून येणारा मळीचा वास! नि:शब्द हालचाली. अवाक मने!

बहुतेक सर्वच साहित्य व्हॅनमधून आधीच शिफ्ट झालेले.

दोन बॉडीगार्ड्स रफी आणि ओम, गोविंद हा खानसामा, सीरीनचा गोसावी, आहुजा नावाचा क्लाएंट, आशिष, देव, गोयल सर आणि सिमेलिया!

शब्दखुणा: 

तू आलीस

Submitted by दाद on 7 February, 2013 - 01:12

तुझं-माझं इतकं सख्य का? कुणास ठाऊक...
तू यायलाच हवस... मी ज्या ज्या वास्तूत रहायला म्हणून गेले त्या त्या वास्तूला तुझा स्पर्श हवा... तू येऊन आपल्या डोळ्यांनी सगळं बघायला हवंस... हा माझा हट्ट आहे. होय. आहेच मुळी.
कळतंय मला... हा चक्क वेडेपणाच. माझं अती-शहाणं मन ह्याला वेडेपणाच म्हणतं. शहाणं मन समजूत घालतं स्वत:ची.
पण वेड्या मनाचं काय करू?

आठवणीतली माणसे १. 'लिलाताई'

Submitted by उमेश वैद्य on 6 February, 2013 - 10:37

काही काही माणसे अशी असतात, की आपल्या स्मृति पटलावर कायमची कोरली जातात. कदाचित आपल्या सांस्कृतिक, वैचारिक जडण घडणीची वाटेकरी ठरतात. अशी काही कोरली गेलेली माणसे शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच 'आठवणीतली माणसे' 'आठवणीतली माणसे चा' हा पहिला भाग. आवडला तर आणखी लिहीन असा विचार आहे.

===============================================================

लिलाताई.

बघा बघा लिलाताई धडपडलात ना! तरी सांगत होतो. मधे मधे करू नका सारखे. हंपायर वाईड बॉल ऍक्शन करतो तसा हात हवेत फिरवत शेखर म्हणाला. पाठोपाठ घुमण्याचे आवाज.

शब्दखुणा: 

अंतराय

Submitted by मोहना on 6 February, 2013 - 06:50

शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि अंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोनचारजणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.
"आईच्या नोकरीने कुठे कुठे फिरवलं आम्हाला." ती तिच्याएवढ्याच फॅशनेबल मैत्रिणीला उत्साहाने सांगत होती.
"केवढं बदललं आहे नाही सर्व?बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदल?"

शब्दखुणा: 

अंतराय

Submitted by मोहना on 6 February, 2013 - 06:50

शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि अंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोनचारजणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.
"आईच्या नोकरीने कुठे कुठे फिरवलं आम्हाला." ती तिच्याएवढ्याच फॅशनेबल मैत्रिणीला उत्साहाने सांगत होती.
"केवढं बदललं आहे नाही सर्व?बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदल?"

शब्दखुणा: 

प्रारब्ध (गोष्ट)

Submitted by पारिजाता on 6 February, 2013 - 04:27

पहिल्यांदा गोष्ट लिहायचा प्रयत्न करत आहे. चांगली वाटत असेल तर पुढे लिहीन. Uhoh

सम्राटनं वाड्यात प्रवेश केला जवळजवळ दीड महिन्यानी.
नेहमीच्या सवयीप्रमाणं दिवाणखाना आणि अधल्यामधल्या सगळ्या खोल्या पार करत
मागचा चौक ओलांडून न्हाणीत शिरला. तांब्याचं घंघाळ नेहमीप्रमाणेच गरम पाण्यानं
भरून तयार होतं. शेजारी तांब्या. त्यानं भसाभस डोक्यावर पाणी ओतून घ्यायला सुरुवात केली.
तोवर नुसत्याच डोळ्यांनी टिपलेले बदल आता रजिस्टर व्हायला लागले.
गोदामावरून जाताना नवीन खतांची पोती आलेली दिसली आहेत.

शब्दखुणा: 

पावा....

Submitted by मुग्धमानसी on 5 February, 2013 - 06:42

निळंशार आभाळ... त्याखाली निळाशार खळाळणारा स्वच्छ समुद्र. समुद्राच्या लाटा केवढ्या उंच! सोनेरी मऊशार वाळूवर पाय पोटाशी घेऊन पाठमोरं बसलेलं कुणीतरी. समुद्राकडे बघत. तीचं शरीर कमनीय. अंगावर रेशमी वस्त्र. मोकळे लांबसडक काळेभोर केस थेट वार्‍याशी गप्पा करणारे. डाव्या खांद्यावरून हवेत बेदरकारपणे उडणारा निळाशार पदर. ती हलत नाही, डुलत नाही. युगानुयुगे पुतळ्यासारखी ती जणू तिथंच थांबून राहिली आहे! थोडं पुढे होऊन तिला हलवुयात का? कोण बाई तु? कुठुन आलीस? इथे अशी का बसलीयस? विचारावे का? तिच्या दिशेने थोडेसे पाऊल पुढे टाकावे तर.... पोचलो तो थेट....

शब्दखुणा: 

मध्यंतर

Submitted by नंदिनी on 5 February, 2013 - 06:02

अंगात आल्यासारखा जय नुसता या रूममधून त्या रूममधे नाचत होता. त्याची घरभर चाललेली धावपळ बघत इशा शांत बसून होती. त्याच्या एकंदर गडबडीमधे तो नक्की काय म्हणत होता तेही तिला समजत नव्हतं. नुसतं "आता अचानक कसं काय" आणि "देवा परमेश्वरा" एवढंच तिला ऐकू येत होतं.

शेवटी पाचेक मिनिटांनी तो तिच्याजवळ आला.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन