सत्यवान-सावित्री

Submitted by डॉ अशोक on 25 June, 2013 - 11:18

सत्यवान-सावित्री

यम (सावित्रीला): तू याला परत माझ्या कडे घेऊन आलीस? कां?
सावित्री: तो यांचा निर्णय आहे. माझा नाही.
यम (सत्यवानाला): तू परत आलास माझ्याकडे ? कां?
सत्यवान (गप्प)
सावित्री: मी सांगते. त्यांना आता जगावसं वाटत नाही...
यम: ते कां?
सावित्री: ते आता आधीचे राहिले नाहीत. आधी ते फूल पाहिलं की हरकून जात. चांदण्यात फिरायला त्यांना खूप आवडे. लहान मुलांची त्यांना खूप आवड होती.
यम: मग?
सावित्री: आता फूलं पाहिली हे म्हणतात हे क्षणभंगूर आहे. उद्या हे कोमेजणार आहे आणि नंतर गळून पडणार. चंद्र पाहिला की म्हणतात तो मावळणार आहे. स्वत:च्या मूलाकडे पाहिलं की म्हणतात हे मरणारच आहे, आज ना उद्या.
यम: (सत्यवानाला): मृत्यू अटळ आहे हे खरं, पण त्यानं तू रोजचं जगणं असं अवघड कां करून घेतोयस?
सत्यवान: देवा, मरण अटळ आहे हे माहित असणं वेगळं आणि त्याचा अनुभव घेऊन परत जगायला लागणं वेगळं. सावित्रीला वर देतांना तू माझी स्मृती काही काढून घेतली नाहीस. माझ्या मरणानंतरच्या आठवणी तू तशाच ठेवल्यास ! जगतांना मला त्या सतत दिसत असतात.... सावित्रीला आता मूल झालंय. तुझा आशिर्वाद सफल झालाय. आता तूला काहीच अड्चण नाही
यम: नाही, मला ते शक्य नाही
सत्यवान: कां?
यम: तुला काय वाटलं. मी कोणाचाही, कधीही जीव घ्यायला मुक्त आहे? स्वतंत्र आहे? कोणाला कधी मृत्यु यावा हे मी ठरवत नाही. ते ठरवतं दैव. मी फक्त अंमलबजावणी करतो.
सत्यवान: मग देवा माझी या त्रासातून मुक्तता केंव्हा? मला मृत्यू केंव्हा?
यम: ते ही मला माहित नाही वत्सा. तुला पुनर्जन्माचा वर दिला तेंव्हाच मृत्यूच्या अनिश्चिततेचा शाप अटळपणे पुन्हा सुरु झाला. सावित्रीनं वर मागितला, पण त्याला चिकटून हा आलेला शाप भोगणं एव्हढंच तुझ्या हाती आहे. जा तुम्ही
(सत्यवान-सावित्री निराश होऊन परत जातात)

-अशोक

(टीप: जी.ए. कुलकर्णी यांच्या ऑर्फीअस या कथेवरून प्रेरीत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचल्यावर एक नकारात्मक भावना मनात दाटून आली... (आणि हे प्रतिसादात टंकावेसेही वाटले) तेवढ्यासाठीच, नाही आवडले.. चुकतही असेल पण क्षमस्व !

P:

छान .
मायबोलीवर सगळे क्रेडीट डॉक्टर लोकच खाऊन जाताएत वकिल विंजेनिअरला कधि क्रडित मिलणार वो. एक जण शेतकर्यांना माबोकर इचरत नायत म्हनून यष्टी झाले होते परवा