गद्यलेखन

झाड - गूढ

Submitted by अमेय२८०८०७ on 20 July, 2014 - 23:07

Zaad - Gudh.jpg

कोल्हापूर-जोतिबा रस्त्यावर हे झाड पाहिले. रस्तारुंदीकरणात किंवा असेच एखाद्या वादळात मुळापासून उखडले गेले असावे. जे दिसले त्यावर मेंदूत प्रक्रिया होऊन समोरचे दृष्य उमजायला काही सेकंद जावे लागले, नीट निरखून बघावे लागले.

कैच्याकै आहे सगळंच.

Submitted by मुग्धमानसी on 17 July, 2014 - 01:05

कैच्याकै आहे सगळंच.

फुलं, पानं, फांद्या, रस्ते, घरं.... सगळंच कसं दमट, ओलसर...
सादळलेला एक-एक अणू, अन् प्रत्येक काच थोडी धुसर!
हवा कोंदट, माती भिजकट, वारा हलकट!
मृद्गंध अगदिच बिचारा वगैरे... दबकून लपलेला मातीच्याच श्वासांत...
अन् त्यावर वरचढ झालेला आंबट कचर्यााचा वास कुजकट!

कणाकणात... क्षणाक्षणात... बाहेर आणि आतही...
उगाच भरून राहिलाय तो केंव्हाचा.
अधांतरी तरंगतो आहे. बरसत नाही. झिरपत नाही.
सगळ्याच नियमांना कंटाळल्यासारखा... स्वत:लाच वैतागल्यासारखा...
प्रवाहीपणाचं एकूणच गृहीतक चक्क चक्क फेटाळल्यासारखा...
उदास असल्यासारखा अन् तेही मान्य असल्यासारखा!
तो साचून राहिला आहे.

दादा

Submitted by सन्केत राजा on 15 July, 2014 - 09:08

"ए राजा, अरे काय झालं सांगशील का? की नुसता रडतच बसणार आहेस? हे बघ, काय झालंय ते बिनधास्तपणे सांग. तुझा हा दादा कुणालाही काहीही सांगणार नाही. विश्वास नाही का तुझा माझ्यावर?" "नको रे दादा असं बोलूस. तुला माहितीय ना मी सगळ्यात जास्त तुलाच जवळचा मानतो." अरे मग सांग ना काय झालय ते. तु नुसता रडतच बसलायस. कोणी काही बोललं का? की आईने मारलंय? बोल ना राजा."

शब्दखुणा: 

दादा

Submitted by सन्केत राजा on 15 July, 2014 - 09:04

"ए राजा, अरे काय झालं सांगशील का? की नुसता रडतच बसणार आहेस? हे बघ, काय झालंय ते बिनधास्तपणे सांग. तुझा हा दादा कुणालाही काहीही सांगणार नाही. विश्वास नाही का तुझा माझ्यावर?" "नको रे दादा असं बोलूस. तुला माहितीय ना मी सगळ्यात जास्त तुलाच जवळचा मानतो." अरे मग सांग ना काय झालय ते. तु नुसता रडतच बसलायस. कोणी काही बोललं का? की आईने मारलंय? बोल ना राजा."

शब्दखुणा: 

दादा

Submitted by सन्केत राजा on 15 July, 2014 - 09:03

"ए राजा, अरे काय झालं सांगशील का? की नुसता रडतच बसणार आहेस? हे बघ, काय झालंय ते बिनधास्तपणे सांग. तुझा हा दादा कुणालाही काहीही सांगणार नाही. विश्वास नाही का तुझा माझ्यावर?" "नको रे दादा असं बोलूस. तुला माहितीय ना मी सगळ्यात जास्त तुलाच जवळचा मानतो." अरे मग सांग ना काय झालय ते. तु नुसता रडतच बसलायस. कोणी काही बोललं का? की आईने मारलंय? बोल ना राजा."

शब्दखुणा: 

विषय क्रमांक २ : अदब

Submitted by Priyanka Pathak on 14 July, 2014 - 10:29

व्यावसयिक जगतात पाऊल ठेवल्यापासून आलेल्या अनंत वैविध्यपूर्ण अनुभवांनंतर आजचा अनुभव काहीसा निराळाच होता...

एक गोष्ट सफल संपूर्ण ! ( एक सुटलेले कोडे )

Submitted by अवल on 12 July, 2014 - 00:28

मागे एक मला न सुटलेले कोडे तुम्ही वाचले असेलच. आणि मग एका नवीन गोष्टीला सुरुवात झाली. मार्चचा शेवट आणि हे महाराज झोक्यावर बसून गोड गाऊ लागले. मैत्रिणीला बोलावू लागले.

1 copy.jpg

मध्येच आत येऊन पाहणी करून गेले.

1a copy.jpg

तालीम

Submitted by जीवनगंधा on 8 July, 2014 - 03:22

शनिवारी सकाळी सकाळी नाटकाच्या तालिमीसाठी जमलो. आदल्या रात्री बरंच जागरण झालं होतं… आठवडा संपला ह्या आनंदात शुक्रवारी रात्री कुणाला तरी भेटून चकाट्या पिटल्या होत्या… शिवाय आठवडाभर बरंच कामही केलं होतं. नाटकं बिटकं करायची हौस असली तरी आठवडाभर कामासाठी राबणं चुकत नाहीच… पार दमवून टाकणाऱ्या आठवड्यानंतर, शनिवारी सकाळी लवकर उठून नाटकाच्या तालीमीसाठी अर्धा तास गाडी चालवत जाण्याचा आजिबातच मूड नव्हता. शिवाय तालिमीचं ठिकाणही जरासं अंधारं आणि उदासीन.… सकाळी सकाळी अगदी उत्साहानं जावं, असं नाहीच. बुडवावी का तालीम सरळ? असा एक चुकार विचार मनात आल्यावाचून राहिला नाहीच.

शरीयत वर आधारीत कायदा

Submitted by नितीनचंद्र on 8 July, 2014 - 01:52

शरीयतवर आधारीत काझी आणि त्यांचे फैसले याला कायद्याने मान्यता नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. असे निकाल किंवा फतवे मानण्याचे बंधन नाही असा निकालही सुप्रीम कोर्टाने दिला. परंतु अश्या न्यायप्रक्रियेवर मात्र बंदी घालायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

मराठी पेपरातल्या बातम्या किंवा दुरदर्शनवरच्या बातम्या अर्धवट होत्या म्हणुन जेव्हा इंटरनेटवर पाहिले तेव्हा हे वाचुन धक्काच बसला.

http://khabar.ibnlive.in.com/news/123214/1

विषय क्रमांक २ : "किमयागार अशोकमामा"

Submitted by अमेय२८०८०७ on 7 July, 2014 - 05:55

'रसिक, विचक्षण, सज्जन, संयमी, आश्वासक, मायाळू, असीम, आनंदकंद, प्रतिभावान, सुगम'....म्हंटले तर शब्दकोशातले शब्द...नाही म्हंटले तर काही नाही! हल्ली जगण्याच्या संज्ञा वेगाने बदलत आहेत आणि शब्दार्थही. किंबहुना जिथे प्रत्येक हृदयातच काहीना काही बोच आहे तिथे नित्य पाझरत असणार्‍या कडवट, विषादी भावनांमुळे सरळ साध्या शब्दांनाही एक विषारी छटा मिळाली आहे. समूहात राहूनही माणसाचे 'बेट'च नव्हे तर त्या 'बेटावर राहणारा एकटा माणूस' अशी अवस्था झाली आहे. रक्ताच्या नात्यांमध्ये संवाद दुष्कर होऊ लागलेत. सुखाची व्याख्या करणारी वर्तुळे आकसत आकसत जखडणार्‍या पाशांसारखी संकुचित होत चालली आहेत.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन