गद्यलेखन

सई परांजपेंचे साप्ताहिक सदर - लोकरंग, लोकसत्ता २०१४

Submitted by हर्ट on 13 January, 2014 - 01:34

लोकसत्ता वर्तमानपत्राच्या लोकरंग ह्या पुरवणीत ह्यावर्षी सई परांजपे ह्यांनी लिहिलेले साप्ताहिक सदर प्रकाशित होत आहे. मला जमेल त्याप्रमाणे मी इथे त्या सदराच्या लिंक देत राहील. पण माझ्या अनुपस्थितीत हे काम इतर कुणीही केले तर माझी त्याला हरकत नाही. उलट आनंदच होईल.

पहिले सदर:

१) उजाळा.. आकाशवाणी, पुणे केंद्र

http://www.loksatta.com/lokrang-news/akashwani-pune-center/

२) 'बालोद्यान'.. आकाशवाणीचे दिवस
http://www.loksatta.com/lokrang-news/balodyan-remembering-days-in-akashw...

५) राष्ट्रीय नाटय़ विद्यालय

http://www.loksatta.com/lokrang-news/national-school-of-drama-355989/

समस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 7 January, 2014 - 05:27

समस्या आणि उपाय

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात. या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.

भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणूका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.

    अन्या - ९

    Submitted by बेफ़िकीर on 6 January, 2014 - 06:22

    "आता आनि काय व्हईल?"

    अन्याच्या प्रश्नावर अजिबातच विचारात न पडलेली रतन ठाम चेहर्‍याने शांतपणे म्हणाली.

    "आता पाटील कावंल, इग्या आन् पवार सूड घ्याया टपतील, तालुक्याला ह्यं कळायचं न्हाई की कोन खरं आन् कोन वाईट ...... आनि......"

    "आनि??"

    "आनि आपल्ये मुडदे पडतील"

    "आ? त्ये का?"

    "याड न्हाई व्हय लावलंन् सर्व्यांना आपन? फार यळ लोक यडे न्हाई र्‍हात"

    "म्हन्जी तालुका उलटंन् व्हय?"

    "फार तर दोन दिसांत"

    "आन् मंग?"

    "मंग काय?"

    "मंग आपन करायचं काय?"

    "म्हन्जे? दोन दिस काय कमी हायेत व्हय?"

    "म्हन्जे?"

    "दोन दिसात हिकडची दुनिया तिकडं करू की आपन"

    "ती कशी?"

    शब्दखुणा: 

    अन्या - ८

    Submitted by बेफ़िकीर on 2 January, 2014 - 01:29

    खुळ लागल्यासारखा अन्या त्या मंद प्रकाशाला ज्वाळेप्रमाणे आव्हान देणार्‍या देहाकडे बघत राहिला होता. आपण हे काय करून बसलो आहोत हे त्याचे त्यालाच समजेना. चार पावलांवर एका कमजोर लाकडी दरवाजाच्या पलीकडे इग्या आणि पवार अजुन कुजबुजत असल्याचे त्याला ऐकू येत होते. ह्या पोरीचा बाप बाहेर कुठेतरी पथारी पसरून निजलेला आहे हे अन्याला माहीत होते. आपण आपल्या स्थानाचा अचानक वापर करण्याचे सुचल्यामुळे ह्या मुलीला आत जाऊन निजण्याचे सांगितले आणि त्यावर कोणाला काही बोलताच न आल्याने ही आत येऊन आडवी झालीही, पण आता पुढे काय?

    शब्दखुणा: 

    "जामनलोट्या" (व्दीशतशब्द कथा)

    Submitted by शाबुत on 1 January, 2014 - 23:18

    “जामनलोट्या”

    एका गावात एक माणूस होता, तो काहीच काम करत नव्हता, सकाळी झोपेतून उठला की चहा घ्यायचा आणि गावभर गप्पा मारत फिरायचं.... भूक लागली की परत घरी फिरायचं... जेवलं की निघाले परत गप्पा झोडायला, जर गप्पा मारायला कोणी भेटलं नाही तर तो चांगली जागा पाहून ताणून देत असे, असा त्याच्या दिनक्रम आखलेला होता.

    आधुनिक सीता - २५

    Submitted by वेल on 1 January, 2014 - 04:20

    भाग २४ - http://www.maayboli.com/node/46887

    आता रफिकचा विश्वास बसावा म्हणून प्रयत्न करणं मी सोडून द्यायचं ठरवलं. कितीही समजावून सांगितलं तरी त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास नव्हताच बसला. बसला असता तर त्याने मला असं बंदी बनून ठेवलं नसतं.

    "मी आता माझ्या पुरते पाहणार आहे !"

    Submitted by किंकर on 31 December, 2013 - 00:02

    नवीन वर्षाची पूर्वसंध्या . नियोजन ,संकल्प,परामर्श आणि आत्मचिंतन अश्या हिंदोळ्यावर मनातील विचार आणि त्याला पूरक स्वसंवाद सुरु असणारी कातरवेळ . आणि त्याच वेळी … " फार झाले, मी आता माझ्या पुरते पाहणार आहे ! " असे वाक्य त्या दोघांच्या संवादातून कानावर पडले, आणि मन अनेक वर्षे मागे गेले.

    मी एक जनावर...

    Submitted by पल्ली on 30 December, 2013 - 10:18

    मी म्हणे एक जनावर आहे. माझा मालक मला प्रेमानं शिक्र्या म्हणतो, रागवला तर भिक्र्या म्हणतो.. पण त्यानं काही फरक पडत नाही कारण मालक म्हंटला कि त्याला सगळे अधिकार मिळालेले असतात, मारण्याचे...कुरवाळण्याचे...
    तर महत्वाचं म्हणजे मी एक मानाचं जनावर आहे. आमच्या इथं एक फार मोठा देव आहे. त्याला खूप गर्दी होते त्यावरुन तो खूप मोठ्ठा देव असावा. त्या देवाच्या यात्रेला खूप लोक जमतात. मला त्या यात्रेत देवाच्या गाडीला जोडलेलं असतं. माझ्याशिवाय दुसरं कुणी तिथं जोडत नाहीत. तो आमचा मान आहे. माझ्या आधी माझ्या बा ला जोडायचे. माझा बा फार हाल होउन मेला...

    Pages

    Subscribe to RSS - गद्यलेखन