अनुदिनी परिचय-८: शाणपट्टी- एका मराठमोळ्या ओडियाची
अनुदिनीचा दुवा: http://ase-vatate-ki.blogspot.com/
अनुदिनी संपर्कः tirthrup@gmail.com
अनुदिनीकाराचे नावः सचिन जाधव
अनुदिनी अनुसरणार्यांची संख्याः ६६
अनुदिनीची एकूण वाचकसंख्या: २४,३१०
अनुदिनीची सुरूवातः जून २००८ मध्ये झाली.
अनुदिनीतील नोंदीः या अनुदिनीत २००९ सालच्या १३ नोंदी, २०१० सालच्या ९ नोंदी, २०११ सालच्या १३ नोंदी, २०१२ सालच्या ६ नोंदी आणि २०१३ सालच्या २ नोंदी; अशा एकूण ४३ नोंदी आहेत.
|| श्री ||
आशिषचा पांचवा वाढदिवस होता. पाच-साडेपाचलाच केक कापायचा होता. सकाळी सत्यनारायणाची पूजा घालून झाली होती. घरची घरची म्हणत बरीच माणसे जेवायला होती. आदल्या दिवशीपासून गावाहून नातेवाईक माणसे आलेली होती. शेजारच्या फ्लॅटचा हॉलही वापरायला घेतला होता. संध्याकाळी तर तुडूंब माणसे बोलावलेली होती. दरचवर्षी आशीषचा वाढदिवस थाटातच असायचा, मला प्रत्येक वर्षी सगळ्या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण असायचे.
|| श्री ||
आशिषचा पांचवा वाढदिवस होता. पाच-साडेपाचलाच केक कापायचा होता. सकाळी सत्यनारायणाची पूजा घालून झाली होती. घरची घरची म्हणत बरीच माणसे जेवायला होती. आदल्या दिवशीपासून गावाहून नातेवाईक माणसे आलेली होती. शेजारच्या फ्लॅटचा हॉलही वापरायला घेतला होता. संध्याकाळी तर तुडूंब माणसे बोलावलेली होती. दरचवर्षी आशीषचा वाढदिवस थाटातच असायचा, मला प्रत्येक वर्षी सगळ्या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण असायचे.
जयपूर लिटफ़ेस्ट, दिवस पहिला, दुपार.
गोंधळलेला चेहरा घेऊन आपण डिग्गी पॅलेसचा स्नॉबिश पसारा पहात उभे असतो. दरबार हॉल, मुगल टेन्ट, फ़्रन्ट-लॉन, बैठक, चारबाग, संवाद अशी भारदस्त कार्यक्रम स्थळं. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत शोभेलशा कलावस्तूंचे, इंटरनॅशनल क्विझिनचे स्टॉल्स. देशी-विदेशी, बहुतेक प्रसिद्ध पण आपल्याकरता अनोळखी चेहरे, त्यांचे स्टायलिश ट्रेन्च कोट, रेशमी शाली, फ़ॅशनेबल स्टोल्स, वेल-हिल्ड गरम बूट. साहित्यिक इतके ग्लॅमरस दिसतात?
करायला गेलो एक आणि … - एक वैद्यकीय सत्यकथा !

१ जानेवारी २००८ !
स्थळ : सिंगापूर मधील एक मोठे पब्लिक हॉस्पिटल.
नवीन वर्षाची सकाळ. हॉस्पिटल मधील सर्व व्यवहार मात्र नेहेमीप्रमाणेच चालू. बाह्य रुग्ण विभाग मात्र नेहेमीपेक्षा जास्तच गजबजलेला ! सिंगापूर शहर नववर्ष रजनीच्या धुन्दिमधुन हळूहळू जागृत होत होते. बहुतेक वॉर्ड दारू पिवून बेहोष झालेल्या रुग्णांनी आणि त्यांनी घडवलेल्या अपघातामध्ये हकनाक सापडलेल्या निरपराध व्यक्तींने भरला होता.
चुकून दोन धागे निर्माण झालेले आहेत. कृपया ह्याच शीर्षकाचा दुसरा धागा बघावा अशी विनंती!
-'बेफिकीर'!
ही आणि ती!
ही! एका शिंप्याची मुलगी! खरे तर शिंपीही नाही तो! फक्त फाटलेले कपडे कसेबसे शिवून द्यायचा! बायको जमीन सारवायची. संध्याकाळी जे पैसे घरात येतील त्यातून जमेल ती भाजी आणायची. तक्रार म्हणून नाही. काही वेळा उपास! उपास झाला की 'ही'ला समजावण्यात येत असे. आज आपल्या बाबांना काही नाही मिळाले बाळा, उद्या मिळेल हां? उद्या मिळाले की काहीतरी खाऊयात! आत्ता पाणी पिऊन झोप! 'ही'! झोपायची तशीच! तक्रार नाही. आपला बाबा गरीब आहे ह्याची जाणीव!
'ती'!
अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये रिक्षा घेऊन जग्या उभा होता. दिसायला तसा तो थोडासा गुंडासारखाच होता. फक्त रिक्षा ड्रायवरच्या युनिफॉर्ममध्ये त्याचं गुंड दिसणं थोडं सौम्य वाटत होतं. त्याचं नाव जग्या हे त्यानेच सांगितलं बाजूच्या रिक्षावाल्याला. त्याने रिक्षा चालवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि तो या भागात फक्त तिसर्यांदा आला होता. त्याची रिक्षा होती दहिसरची.
खूप काम झाल्यावर आपण दमतो. खूप दमल्यावर जे काही करतो तेही परफेक्ट असेलच अशी हमी आपण नाही देऊ शकत. बर्याचदा आपलं आपल्याला ही कळत नाही कि पण हे काय केलंय. देवानं स्त्रीला खूप मेहनतीनं बनवलं. नंतर तो खूप दमला असावा आणि तश्याच अवस्थेत त्यानं त्या स्त्रीचं मन बनवलं असावं. आणि नंतर त्याचाही खूप गोंधळ उडाला असेल कि आपल्याला काय करायचं होतं आणि आपण काय केलंय... त्यामुळेच स्त्रीचं मन ब्रह्मदेवालापण समजणार नाही असं म्हणत असावेत ..
तर हे सांगायचं कारण असं कि सगळं सरळ आणि सुरळीत चालू असताना आमच्या हिला आली हुक्की.. आणि उगाच म्हणजे अगदी उगाच मला म्हणाली (म्हणजे मला असं वाटलं.. )
एक छोटीशी कथा.
*********************************
तिने घरी गेल्या गेल्या आई बाबांना हाक मारून समोर बसवून घेतलं. तिचा निर्णय झाला होता पण तो निर्णय त्याला सांगण्यापूर्वी तिला आपल्या आई बाबांना सांगायच होतं. कपडे बदलून हात पाय धुण्याइतका वेळही तिला वाया घालवायचा नव्हता.
"आई, बाबा मला तुमच्याशी बोलायचय."
"भांडण झालम का कौस्तुभशी तुझं"बाबांनी थट्टेच्या स्वरूपात म्हटलं.
"मला कौस्तुभ बरोबर लग्न करायचं नाहीये."
"अग महिन्यावर लग्न आलं आणि आज असं का म्हणते आहेस अचानक? काय केलं त्याने?"आईने काळजीने विचारलं.
"मला त्याच्या सवयी नाही आवडत."