गद्यलेखन

स्वप्नांच्या पलीकडले ७

Submitted by shilpa mahajan on 17 June, 2013 - 05:02

. आमचे तंबू ठोकले गेले. या वेळी आम्हाला वाट पहावी लागली नाही. आम्ही तंबूत बसायला जाणार तोच आम्हाला उषाची चाहूल लागली. आम्ही लगेच बाहेर आलो. पहातो तर गोपाल आणि उषा दोघेही एका खडकापाशी आले होते. फूटभर लांब दाढी वाढलेला , ऋषी मुनि सारख्या केसांच्या जटा झालेला आणि निस्तेज दिसणारा गोपाल पहिल्यांदा ओळखूच आला नाही. उषा बरोबर होती म्हणूनच तो गोपाल होता असे म्हणावे लागले, इतका तो बदलला होता. उषाची अवस्था त्याच्यापेक्षा वेगळी नव्हती. फक्त मागच्या वेळी ती जितकी भावुक झाली होती तितकी यावेळी झाली नाही. नव्या जीवनाला
नाइलाजाने का होईना पण सरावली होती. दोघांच्याही चेहेऱ्यावर एक वेगळाच उदासीन.

शब्दखुणा: 

येऊरच्या 'हिरव्या सख्या'

Submitted by उमेश वैद्य on 17 June, 2013 - 04:57

काल ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरून जाताना सहज लक्ष डावीकडे गेलं आणि समाधी लागल्यासारखा मी पहातच राहिलो. ठाण्याची हरित रेखा येऊर हिल रेंज मला खुणावत होती. सुरू झालेल्या पावसाने मस्त हिरव्या रंगाची शाल तिने पांघरली होती. एरवी बराच काळ गरीबीत दिवस कंठणाऱ्या बाईला अचानक श्रीमंती वैभव प्राप्त व्हावं आणि तिचं नाक अभिमानाने वर येउन आपले वैभव दाखवण्यासाठी तीने जसं लोकांच लक्ष वेधून घ्यावं अगदी तसचं येऊरच्या टेकड्या माझ्या मनाला ओढत होत्या.

सावली !

Submitted by कवठीचाफा on 16 June, 2013 - 22:44

या कथेचा शेवटच मुळात तुमच्या कल्पनेवर सोडलाय,त्यामुळे जर आपापल्यापरीनं शेवट जोडलात तर खरंच मजा येईल.
********

अखिलेश उर्फ अखी, मुळातच एक माथेफीरू माणूस. किमान त्याचे मित्र तरी हेच म्हणायचे. वडलांचा यशस्वी व्यवसाय, अभ्यासातली गती असं सगळं असूनही त्यानं जेंव्हा त्यानं डिफेन्स सर्व्हीसमधे जायचा हट्ट धरला तेंव्हा कुणालाच त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. सगळ्या प्रक्रीया पुर्ण करून तो नेव्हल एअर आर्म्सला जॉईन झाला आणि नंतर मित्रांच्यातलाही त्याचा संपर्क कमी होत गेला. दोन-एक वर्षापुर्वी त्याच्या बेपत्ता होण्याची बातमी धडकली तेंव्हा मात्र सगळेच हळहळले. घरी सांत्वन करण्यासाठी रिघ लागली.

पितयापरी त्वां सांभाळिले ।

Submitted by किंकर on 16 June, 2013 - 17:00

आजच्या रविवारी सकाळी नेहमीच कानावर पडणारे आणि बरेचदा म्हटले जाणारे व्यंकटेश स्तोत्र ऐकत होतो. पण एका ओळीवर मन एकदम अंतर्मुख झाले. कारण त्या ओळी होत्या -
जननीपरी त्वा पाळिले । पितयापरी त्वां सांभाळिले ।
सकळ संकटापासुनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ।
अनेक वर्ष नियमित म्हटले जाणारे स्तोत्र आणि त्यातील हे सुमधुर कडवे आज मला एक वेगळाच अर्थ समजावून सांगत होते.अर्थात या अंतर्मुखते मागे दोन घटनांची एकत्र गुंफण झाली होती. आज पितृ दिन जो निम्म्यापेक्षा अधिक जगात वडिलांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तो आजचा रविवार आणि आजची तिथी हि माझ्या आईची प्रथम पुण्यतिथी.

शब्दखुणा: 

आला पाउस मातीच्या वासात गं

Submitted by निरंजन on 16 June, 2013 - 13:43

तापलेला रस्ता, वितळलेल डांबर, घामाच्या धारा, गरम वारा, उन्हाच्या झळा, तहानलेले जीव, व्याकुळ नजरा. वासरांच्या तापल्या पाठी चाटणार्‍या गाई. आकाशाकडे बघणारे पक्षी. गरिब बापडा पिसारा आवरुन बसलेला मोर. आग ओकणारा सुर्य. बापरे. कधी एकदा पाऊस येतोय याची प्रत्येकजण वाट बघत होते. उकाडा वाढतच चालला. निसर्ग पावसाची वाट पाहात होता. जुनी कात टाकुन वसंतात झाडांना नवी पालवी फ़ुटली आणि सुष्टी पावसाच्या स्वागतासाठी तयार झाली. हळु हळु आकाशात मेघांची दाटी होत चालली. मधेच सुर्याच्या आड येणारे ढग पाहिले आणि सर्व सृष्टिला धीर आला. मोर पिसारा झटकुन तायार झाला होता, चातकाला आपली प्रतिक्षा संपणार म्हणुन आनंद झाला.

शब्दखुणा: 

ती जाते तेंव्हा...

Submitted by मुग्धमानसी on 14 June, 2013 - 03:30

ती जाते तेंव्हा मागे काय रहातं?

ती जाते तेंव्हा... निश्चल होऊन थिजून रहातो चार भिंतींत गुदमरलेला तिचा वावर...
घुसमटलेला... तरिही दरवळणारा... चुरगाळल्यावर सुगंध देणार्‍या बकुळीच्या फुलांसारखा.
दरवाजांच्या, कपाटांच्या मुठींना चिकटून बसलेले तिचे काही ओले-सुके स्पर्श किलकिल्या केविलवाण्या नजरेने तिला शोधत रहातात.
भांड्य़ांना, डब्यांना वाट्या-चमच्यांना मिठी मारुन बसलेला तिचा तिखटामिठाचा आंबटगोड दरवळ... स्वतःलाच हूंगत माग काढत रहातो तिच्या हरवलेल्या अस्तित्वाचा.
उंबर्‍यावरल्या रांगोळीची पांढरी रेघन्-रेघ आतूरल्या नजेरेने तिच्या वाटेकडे पहात रहाते... तुळस भरल्या घरी मावळून जाते...

कविता

Submitted by सचिनकिनरे on 13 June, 2013 - 18:40

कविता

एका मित्राने विचारलं,
रन टाईम मध्ये लिहितोस का कविता?
कस सांगू त्याला?

ठुसठुसत असतं मनात तेव्हा,
कविता जन्म घेत असते,
कधी व्यक्त, कधी अव्यक्त,
प्रेमा सारखी बहरू लागते.

वेळ द्यावा लागतो कधी,
पिकणाऱ्या फळासारखा,
कधी तुझ्या सारखी भरभरून,
कोसळणारया पावसाने भेटते कविता.....!

कधी रन टाईम मध्ये,
पण नेहमीच मन टाईम मध्ये असते..
जशी बाळासाठी आई,
तुझ्यावरचा विश्वास असते कविता.....

तुझ्या असण्यात असते,
तुझ्या नसण्यातही असते.
भर गर्दीतील एकांतात,
हल्ली सोबतीला असते कविता.....

माझ्या श्वासासारखी असते,
तुझ्या भासासारखी असते..
लिहिता नको येउ दे भले,

सोबती

Submitted by अनघा कुलकर्णी on 12 June, 2013 - 00:42

सोबती
अंकुरले जीवन भूमातेच्या उदरी,
`सोबत' करूनी फेडू ऋण जन्मजन्मांतरी।
सोबतीशिवाय जीवन अशक्य आहे. प्रत्येकालाच सोबतीची गरज असते. अगदी जन्मल्या दिवसापासून ते जीवनाच्या सुंदर सोबती
अंकुरले जीवन भूमातेच्या उदरी,
`सोबत' करूनी फेडू ऋण जन्मजन्मांतरी।

शब्दखुणा: 

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

Submitted by किंकर on 6 June, 2013 - 00:01

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून….

'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत.

साडे अठरा हजार फूटांवरचं एक फूट....... !! (Unforgettable Ladakh)

Submitted by रसप on 4 June, 2013 - 01:09

'सुमूर' गावातली मॉनेस्ट्री पाहून आमची क्वालीस डिस्किट नदीच्या आजूबाजूच्या रेताड वाळवंटातून काढलेल्या डांबरी रस्त्याने कॅम्पकडे निघाली. आमचा रस्ता पर्वतातून उतरला होता आणि पर्वताकडेच चालला होता. ह्या मधल्या काही किलोमीटरच्या पट्ट्यात डिस्किट नदी आणि तिचं वाळवंट.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन