नातीगोती

तुझी 'भेट'

Submitted by अंबज्ञ on 21 May, 2018 - 22:38

.

.

हे बघ....शोना !
मला अजिबात आवडणार नाही हां तुझं असं बाकीचे करतात तसं भर रस्त्यात, चार चौघांसमोर उगीच दिखावा करत मला मिठीत घेत भेटणं.
उगीच सर्वांसमोर तुझ्या आड़दांड बाहुपाशात मला घट्ट कवेत घेणं... !

वावटळ अंतिम भाग - ५

Submitted by Vrushali Dehadray on 20 May, 2018 - 01:59

वावटळ अंतिम भाग - ५

‘या नेमक्या कशाबद्दल बोलताहेत? पण आमच्यात तर......’ तिथे तिचा विचार खुंटला.

‘काहीच नाही? नीट विचार करून ठरव. मी खरच निसरड्या वाटेवरून चाललीये का ?’

‘नाही चाललीयेस? मग दुसरी जागा का शोधत नाहीयेस? ज्या जागा मिळताहेत त्या फालतू कारण काढून का नाकारतीयेस? का गुंतते आहेस या नको त्या गुंत्यात?

'मी गुंतत नाहीये. फक्त काही क्षण मिळताहेत आनंदाचे, ते मी का नाकारू? सोहमच्या सहवासात मी माझीच मला सापडले.'

‘आता शोधलं आहेस ना स्वत:ला, मग तो आधार आता सोडून दे आणि स्वत:च्या पायावर उभी रहा.’

वावटळ भाग - ४

Submitted by Vrushali Dehadray on 19 May, 2018 - 02:36

वावटळ भाग - ४

त्या रविवारी रात्री कधी नव्हे तो त्याचा फोन आला. “मी उद्या नेहमीच्याच वेळी घरी येईन. तू कोणत्या गाडीने मुंबईला येणार आहेस?” पुढे तो उगाच इकडचे तिकडचे बोलत राहिला. खरे विचारायचे होते ते तसेच मनात ठेवून. ती नेहमी सकाळच्या पहिल्या शिवनेरीने जायची आणि तो डेक्कन क्विनने. तिची नेहमीची बस त्यालाही माहिती होती आणि तरीही.....

दुसऱ्या दिवशी ती नेहमीच्या स्टॉपवर बसमध्ये चढली. रिकामी जागा बघायला लागली तर तिसऱ्या रांगेत खिडकीजवळची सीट सोडून सोहम बसलेला. गंभीर चेहऱ्याने. ती मुकाट्याने त्याच्या शेजारी जाऊन बसली. तेव्हाही धोक्याची घंटा कशी वाजली नाही आपल्या डोक्यात?

आमच्या आईचा काळा मसाला.

Submitted by vijaykulkarni on 19 May, 2018 - 00:12

परवाच एका घरी काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. मिसळ पाव चा बेत होता. मिसळीची उसळ अप्रतीम असल्याने सहाजिकच कुतुहलाने विचारले की कोणता मसाला वापरला? उत्तर आले की "आमच्या आईचा काळा मसाला". चेहेर्‍यावर आईची आठवण आल्याची व्याकूळता, आईच्या सुगरणपणाबद्दल अभिमान, आता हा वाटीभर मसाला मागतो की काय? ही भिती, हे सर्व होते. यजमानीण बाईंचे भाव पहाता त्यांच्या डेबिट कार्ड चा पिन मिळेल पण मसाला मिळणार नाही हे जाणवले. Happy

वावटळ भाग -२

Submitted by Vrushali Dehadray on 17 May, 2018 - 01:48

वावटळ भाग -२

ती करिअरिस्ट वगैरे कधीच नव्हती. पण हातात घेतलेले काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करायची. एकदा कमिटमेंट केली की काही झाले तरी त्यापासून हटायचे नाही या भावनेने ती नोकरीही करत होती आणि संसारही. नोकरीतल्या कमिटमेंटचे फळ बढतीच्या रूपाने मिळाले तर संसारातल्या कमिटमेंटचे फळ फक्त अंगावर वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या सतत वाढत जाणाऱ्या ओझ्याच्या रुपात. पण बंडखोरी हा शब्द तिच्या शब्दकोशातच नव्हता. तिला इतरांनी गृहीत धरणे हे तिने गृहीत धरले होते. पाण्यावरच्या तेलाच्या तवंगासारखे नवऱ्याचे संसारात असूनही नसणे हे एव्हाना तिच्या अंगवळणी पडले होते.

वावटळ भाग १

Submitted by Vrushali Dehadray on 16 May, 2018 - 03:20

वावटळ भाग १

सुन्न होऊन ती गॅलरीतून बाहेर पहात होती. ग्रीष्माच्या झळांमध्ये मधेच वाऱ्याची एक वावटळ उठली होती. त्या वावटळीत झाडांवरून गळलेली कित्येक पाने सापडली होती. हवेच्या भोवऱ्यात गरगर फिरत होती. तिला एक क्षण वाटून गेले की तिची अवस्था पण त्या पानांसारखीच झाली आहे. स्वतःच्या आयुष्याचे सुकाणू हातातून पूर्ण सुटले आहे, वाऱ्याच्या झोताबारोबर तो नेईल तिकडे ती वहात चालली आहे. प्रवाह्पतीतासारखी. या वाऱ्यातला जोर ओसरला की सारी पाने भुईवर येतील आणि मातीत मिसळून जातील. माझेपण असेच होणार आहे का या भीतीने ती भयशंकित झाली. या साऱ्या प्रकरणाची सुरुवात झाली तो दिवस तिला आठवला.

Pages

Subscribe to RSS - नातीगोती