नातीगोती

रक्षाविसर्जन

Submitted by दिनेशG on 11 October, 2021 - 10:56

सप्टेंबर २०२०- गावच्या स्मशानभूमीत मी प्लास्टिक च्या टब मध्ये चितेची राख फावड्याने गोळा करत होतो. राख आणि उरलेल्या अस्थी गोळा करून समुद्रात थोड्या आतवर खांद्यावर वाहून नेऊन विसर्जित करायच्या होत्या. जन्मदात्यांना असा निरोप देणे सोपे नसते.
पहिला टब भरून खांद्यावर घेतला आणि पाण्याच्या दिशेने चालायला लागलो.

"सांभाळून चाल" पाठून चालणारा माझा चुलत चुलता म्हणाला.

लेकीच्या पाचव्या वाढदिवसासाठी काय गिफ़्ट घ्यावी?

Submitted by मनिम्याऊ on 24 September, 2021 - 11:12

माझी लेक यंदा विजयादशमीला 5 वर्षांची होईल. तिच्यासाठी गिफ़्ट घ्यायची आहे. काही नाविन्यपूर्ण कल्पना सुचवा. तसेच दसरा theme घेऊन घरच्याघरी काय सजावट करता येईल ते पण सुचवा.

लग्न / नाती याकडे स्त्री जास्त गांभिर्याने पाहते की पुरूष ?

Submitted by शांत माणूस on 18 September, 2021 - 00:18

(माबो गणेशोत्सव चालू असताना या प्रश्नाची वेळ चुकलेली आहे याची कल्पना आहे. पण नंतर लक्षात राहणार नाही आणि लिखाणाचा उत्साह बारगळण्याची शक्यता म्हणून विचारून टाकतो).

समाधान

Submitted by केजो on 15 August, 2021 - 16:37

अण्णांनी कानोसा घेऊन बघितलं, नुकतंच झुंजूमुंजू व्हायला लागलेलं. त्यांनी डोळे मिटूनच दोन्ही हातांची ओंजळ डोळ्यांसमोर धरली आणि "कराग्रे वसते..." म्हणू लागले. आज हवेत जरा गारठा जाणवत होता. अंथरुणात बसूनच त्यांनी "... पदस्पर्शम क्षमस्वहे!" म्हणून पावलं जमिनीवर ठेवली. निगुतीनं अंथरूण- पांघरुणाची घडी जागेवर ठेवली. सकाळची आन्हिकं आटपून ते गिरणेवर स्नानास निघाले. गंगाबाईंनी परीटघडीची धोतरजोडी आणि त्यांचा पांढरा सदरा रात्रीच काढून ठेवलेला. सवयीप्रमाणे त्यांनी नेहमीच्या जागेवरून कपडे घेतले आणि ते नदीवर निघाले. नामजप करता करता सूर्याला अर्ध्य देत अण्णांनी कडाक्याच्या थंडीत स्नान उरकत घेतलं.

आईपण आणि आई पण...

Submitted by 'सिद्धि' on 6 August, 2021 - 05:44

" आई! माझे केस बांध ना ग." तिने अस्ताव्यस्त पसरलेले आपले केस बेजुला करून, आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत विजूकडे पहिले.

"हो."
सदा चा डब्बा भरून विजू त्याचा नाश्त्याची तयारी करू लागली.

"आई, भावे काकांना सांग ना, 'मला गार्डन मध्ये घेऊन जायला.' "
कपाटातली लाल बाहुली, थोडी तुटकी-मुटकी खेळणी आणि आपल्या मेकपचा छोटा किट घेऊन, ती आता भातुकली खेळायला बसली होती.
विजू वरती न पाहताच "हो " म्हणाली .

"सदा ! तू नाश्ता करून घे, आठवणीने डबा देखील बॅग मध्ये भर रे. मी तिला भरवून घेते. "

शब्दखुणा: 

गहिरा डोह

Submitted by अन्नपूर्णा_ on 2 August, 2021 - 01:56

गहिरा डोह

जरी नाही होऊ शकले मी चंद्र तुझ्या जीवनातला....
तरी तुझ्या नावाचा एक तारा कायमच लुकलुकत राहील या आयुष्याच्या नभांगणात!
जरी नाही झाले आपले नाते सागर- सरितेपरी....
तरी मनाच्या विशाल महासागरात एक तरी भोवरा येईलच तुझ्या आठवणींचा!
जरी नाही बरसल्या श्रावणधारा तुझ्या प्रेमाच्या माझ्यावर.... तरी एखादा चुकार वळीव अनुभवायला मिळाला होताच मलाही!
तुझ्याही अंतर्मनात राहूदे आपल्या अनामिक नात्याचा गहिरा काळाशार डोह....
जो डोह असावा अथांग, अन राहू द्यावा तशाच शांत संथ!!

आपापल्या आठवणी

Submitted by ध्येयवेडा on 3 July, 2021 - 02:05

"काय लहान मुलांसारखं खेळत बसता रे ? बघावं तेव्हा आपला तो कॉम्प्युटर, घरात मित्र गोळा करून बसायचे.. आणि दिवसभर गोंधळ" आई वैतागून ओरडली.
"आई, हे बघ तुला बोर वाटत असेल, पण आम्हाला मात्र एज ऑफ एम्पायर्स खेळायला मजा येते. तुमच्या वेळी काहीतरी वेगळे खेळ असतील.. तुम्ही पण ते खेळत असाल तासंतास.. आठव आठव.." मी आईला उलट प्रश्न केला .

शब्दखुणा: 

"खरं प्रेम हे एकदाच होतं का?"

Submitted by चंद्रमा on 27 June, 2021 - 13:38

........ टीप:(कृपया हा लेख वाचताना मायबोलीकरांनी एकांतवास शोधावा कारण पहिल्या प्रेमाची गोष्ट इथे मी अधोरेखित केलेली आहे वाचताना आपले मन भरून आलेच तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल
बस एवढच!.....)

संधीकाळच्या लांब आणि गूढ सावल्या

Submitted by सामो on 27 June, 2021 - 13:20

गुगल सर्व उत्तरं देतं. सर्व? अगदी सर्व? नाही. कित्येक अनुत्तरीत प्रश्नांची तर गुगल कडे उत्तरेच नसतात - त्याच्या मनात आत्ता या क्षणी माझ्याविषयी काय विचार चालले असतील, How much did he suffer because of my reckless, bipolar behavior?? माझी मुलगी माझ्याकडे काहीही शेअर का करत नाही? ती कधीकधी गप्प गप्प असते तेव्हा काय विचार करते? हे झाले वानगीदाखल प्रश्नं. God forbid! Has she ever gone through one hedious life experience that is part of almost every woma's life & that is sexuala assault? कोण देणार ही उत्तरं?

Pages

Subscribe to RSS - नातीगोती