"झालंय ना ते..?"
"हो...आता हॅंडबिलाचं राहिलंय,चंदू करतो म्हणतंय"
"चंद्या करेल पण फक्त त्याला आठवण कर..परत काळे पर्यंत जायला नको,त्या टकल्याला तेवढंच पाहिजे असतंय"
"कधी येणारेत..?"
"कोण काळे ? येईल कि संध्याकाळपर्यंत.."
"अरे काळे नाही,साहेब कधी येणारेत ?"
"साहेब..सांगितलंय उद्या संध्याकाळी येतील म्हणून,पण बघू काय काय होतंय.."
"आयला तुझ्या घरी येणारेत ना साहेब ? भाऊ लय हवा करतोय आजकाल.."
"तर काय ? राहुल्या तूपण जरा अक्कल चालवली असतीस तर आपला २ दिवसाचा कार्यक्रम मंजूर होत होता"
एका राजात असावे ते सगळे गुण होते त्या अफाट पसरलेल्या राज्याच्या महाराजांमध्ये. शौर्याच्या आणि रणनितीच्या बळावर त्यांनी आपल्या राज्याच्या सिमा बऱ्याच विस्तारल्या होत्या. युध्दामुळे अनेक प्रांत फिरलेल्या राजाने जे जे चांगले दिसले ते ते आपल्या राज्यात आणले होते. वेगवेगळ्या स्थापत्य शैलीचा अभ्यास करुन अनेक भव्य इमारती राजधानीत उभारल्या होत्या. ग्रंथालये, मंदिरे, उद्याने यांनी सगळी राजधानी अगदी देखणी बनवली होती. प्रासादात अनेक देशोदेशीच्या नामवंत चित्रकारांच्या कलाकृती लावल्या होत्या. राजाचा आवडता छंद मात्र तत्वज्ञान. या छंदामुळे राज्यात अनेक विद्वानांना राजाश्रय मिळाला होता.
वाड्याचे दरवाजे उघडेच होते....कोनाड्यातले दिवे टिमटिम करत जळत होते..आता संध्याकाळ रात्रींकडे झुकत होती... सहसा असं होत नाही पण आज मला अवेळीच झोप लागली..इतकी गाढ झोप मला लागत नाही आणि एरवी माझ्या पलंगाशिवाय मी झोपत नाही पण आज जाग आली तेव्हा चक्क माईच्या पलंगाशेजारी जमिनीवर पसरलेला होतो...सारवलेल्या जमिनीवर झोप छान लागते. ती फरशी वगैरेची सोय अगदीच नावापुरती वाटते...त्यापेक्षा आपली जमीनच बरी..कमीतकमी १०० वर्षाचा आहे आमचा वाडा..आत्ताही ठणठणीत आहे..त्यावेळची बांधकामच तशी होती म्हणा...
राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती.
"कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला. पण आजचं हिचं रूप जरा सुखावह आहे."मनात विचार भर्रकन येतात ना, तसंच झालं राधिकाला!
'मी आज काहीतरी लिहिलं' हा आनंद असतोच पण त्याहीपेक्षा लिहिण्याचं 'ते' वातावरण आपल्यासाठी आपण तयार केलेलं असेल किंवा ते नशिबानं म्हणा किंवा कसंही ते तयार झालेलं असेल तर ते feeling ‘लय भारी’ असतं !
मथुरा आज खूप खुष होती कारण तिने नातवासाठी सुमेध साठी खेळण्यातील गाडी बघून ठेवली होती. ती आज मोठ्या गावी जाऊन बाजाराच्या दिवशी खरेदी करणार होती. बाजारात प्रत्येक वेळी सुमेधला घेऊन जाताना सुमेध दुकानातील गाडी बघून आपल्या आज्जीला मागायचा. मागील एका वर्षापासून ती थोडे-थोडे पैसे साठवत होती. पैशाची जमवा जमव जवळपास जुळून आली होती. सुमेध हा मथुराचा एकुलता एक लाडका नातू होता. सुमेधचे वय ३ वर्ष होते आणि तो कायम आज्जी सोबत राहायचा. मथुरा त्याचे जमेल तसे लाड पुरवायची. बाजार जवळच्या मोठ्या गावी भरायचा. त्यांचा अत्यंत साध आणि टुमदार गाव होत.