मथुरा आज खूप खुष होती कारण तिने नातवासाठी सुमेध साठी खेळण्यातील गाडी बघून ठेवली होती. ती आज मोठ्या गावी जाऊन बाजाराच्या दिवशी खरेदी करणार होती. बाजारात प्रत्येक वेळी सुमेधला घेऊन जाताना सुमेध दुकानातील गाडी बघून आपल्या आज्जीला मागायचा. मागील एका वर्षापासून ती थोडे-थोडे पैसे साठवत होती. पैशाची जमवा जमव जवळपास जुळून आली होती. सुमेध हा मथुराचा एकुलता एक लाडका नातू होता. सुमेधचे वय ३ वर्ष होते आणि तो कायम आज्जी सोबत राहायचा. मथुरा त्याचे जमेल तसे लाड पुरवायची. बाजार जवळच्या मोठ्या गावी भरायचा. त्यांचा अत्यंत साध आणि टुमदार गाव होत.
आम्ही गावातच शिकलो, तस शहरात शिकायला जाण्यासाठी फारसे पैसेही नव्हते आणि तस जाणं आम्हाला कधी गरजेचंही नाही वाटलं आणि कदाचित आमच्या घरात त्याला विरोधच झाला असता. घरापाठी भवानीमातेच्या मंदिरात आमची शाळा भरायची, शाळेला आत्ता कुठं इमारत मिळाली मागच्या वर्षी. आम्ही मंदिरात सकाळ झाल्या झाल्याचं जाऊन बसायचो, घरात फारसं काही आवराव नाही लागायचं ते सगळं बिचारी आईच करायची आणि काही काम जरी उरलच तरी ते अर्थात ताईवरतीच पडायचं ! मला अगदी ५वी- ६वी पर्यंत फार काही मोठं काम केल्याचं आठवतच नाही !
"इथं मिसळ खूप छान मिळते"
मी पहिला घास खाल्ल्यावरच म्हणालो. तिने काहीच प्रतिक्रिया नाही दिली.
नुसतीच हसली, पण हे हसणं वेगळंच होत, आता तीच ते 'वेड' हसणं कुठंतरी गायबच झालेलं होत,
छान दिसते ती हसल्यावर...
मी तिच्या हातावर हात ठेवला तसा तिने झटकन हात खाली घेतला आणि पर्स मध्ये काहीतरी शोधायला लागली,
ते पर्स मध्ये शोधणं हे निम्मीत्त होत!
खरतर आजही सुंदर दिसतीये ती..
तिला स्वतःहून कधी मेकअप करण्याची आवडही नव्हती आणि कधी गरजही नव्हती !!
तिला मी आता आयुष्यात नको होतो आणि ते सरळ दिसतही होत, भेटायला उशीरा येणं, माझे कॉल्स टाळणं.
"तू ऐकूनच नाही घेतेस"
"मी येत्तोय ना दोन दिवसात परत,I'm too trying यार.."
"काय ट्राय करतोयस तू ? माझी अपॉइंटमेंट होती तेव्हा तू नव्हतासच आणि आता सेलिब्रशन मध्येपण..."
"मी मुद्दाम नाही करते ना पण हे"
सोड ना,प्रेफरन्स बदललेत तुझे,डिनरचा प्लॅन होता आज,कॉफीवर भागवतोयस"
कॉफीशॉपच्या टेबल नंबर सातवर घडलेलं हे संभाषण.
मी कालच मावशीकडूनआले. माझ्या मावशीच घर खूप मोठं आहे. तो एक मोठ्ठा bungalow आहे. गावाबाहेरच्या त्या बंगल्यात ती एकटीच राहते. तिथे आजूबाजूला खूप सारी झाड लावलेली आहेत. मावशीच्या शेजारी जोशी काकू राहतात आणि त्या सारख्या मावशीकडे साखर मागायला येतात. मावशीच्या अंगणात पारिजातकाच्या फुलांचा सडा पडतो. मागे खूप सारी आंब्याची झाड आहेत. आई मला तिकडं गेल्यावर फारवेळ बाहेर थांबून देत नाही. मला पारिजातकाचा गजरा घालायला खूप आवडतं.
वाड्याचे दरवाजे उघडेच होते....कोनाड्यातले दिवे टिमटिम करत जळत होते..आता संध्याकाळ रात्रींकडे झुकत होती... सहसा असं होत नाही पण आज मला अवेळीच झोप लागली..इतकी गाढ झोप मला लागत नाही आणि एरवी माझ्या पलंगाशिवाय मी झोपत नाही पण आज जाग आली तेव्हा चक्क माईच्या पलंगाशेजारी जमिनीवर पसरलेला होतो...सारवलेल्या जमिनीवर झोप छान लागते. ती फरशी वगैरेची सोय अगदीच नावापुरती वाटते...त्यापेक्षा आपली जमीनच बरी..कमीतकमी १०० वर्षाचा आहे आमचा वाडा..आत्ताही ठणठणीत आहे..त्यावेळची बांधकामच तशी होती म्हणा...
ती फिरतफिरत त्या शेल्फपाशी आली...
वरून तिसऱ्या आणि खालून चौथ्या फळीवरच ते भगवत्गीतेसारखं जाड पुस्तक तिनं उचललं..
इतक्यात शेजारी बादली आपटल्याचा आवाज आला..
साफसाफई करणाऱ्या मावशी कामाला लागलेल्या होत्या...त्यांच्या कामात लुडबुड नको म्हणून ती हातातला कॉफीचा मग घेऊन जिन्याखालच्या कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसली...
लाइब्ररीतलं ते वातावरण ती आज खूप वर्षांनी अनुभवत होती.पुस्तक वाचायला,कॉफी घ्यायला किंवा नुसत्याच गप्पा मारायला ती इकडे यायची.ग्रुपचा अड्डाच झाला होता हा !
आज फारशी गर्दी नव्हती.वेळ सकाळची होती त्यामुळं गर्दी व्हायला अजून वेळ होता.
माझ्या शेजारी कुणीच नको होत आज..एकटंच बसायचं होतं,खिडकीतून बाहेर बघत कानात हेडफोन्स घालून..अंतर थोडंसच होतं म्हणजे जेमतेम २०-२५ किलोमीटरचं असेल पण अंतर कितीही असलं तरी तो एक प्रवास होता आणि मला प्रवास आवडतोच...पहिल्यापासून !