लघुकथा

जंगलराज

Submitted by जयनीत on 19 January, 2012 - 03:50

जेव्हा माकडाला कळले की माणसाचे पूर्वज अगदी त्याच्या सारखेच होते तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही . माझा वंश इथे संपूर्ण पृथ्वीतलावर राज्य करतोय ! अन इथे ? इथे तो सिंह राज्य करतोय ! काहीही झाले तरी आता मात्र चूप बसायचे नाही , रानात तरी आपले राज्य असेलेच पाहिजे , आपल्या वंशजांचं नाव राखायला नको ? माकडाने विचार केला .
पण सिंहाच्या शक्ती पुढे आपलं कसं चालणार ?
त्याला तर सगळेच घाबरतात .
आपल्याला कोण साथ देणार ?
पण माणसा जवळ तरी कुठे फार मोठी शक्ती आहे तरीही तो सा-या जगावर राज्य करतोय ना ? कशाच्या बळावर ? डोक्याच्याच ना ? मग आपण ही डोकं लढवायला शिकलं पाहिजे , अगदी त्यांच्या सारखंच !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

"संवाद"

Submitted by भूत on 24 February, 2011 - 10:33

..... आणि "म्हातारबाबा"च्या डोक्यावर गरागरा फिरणारे ते चाक तेथुन उडुन "उध्दवा"च्या डोक्यावर येवुन बसले अन तसेच गरागरा फिरु लागले !

अगदी काल परावाची गोष्ट .
..ते चार गुरु बंधु निराश होवुन गुरुंसमोर बसलेले ...अवंती नगरीच्या आश्रमात गुढ शांतता भरुन राहिलेली ...गुरुंच्या चेहर्‍यावरही तीच प्रगाढ गुढ मुद्रा...सारे प्रशांत गंभीर वातावरण ...धुपाचा मंद सुवास ... कोणीतरी घनपाठ करतोय ...त्याच्या खर्जातले सुर वातावरणाला अजुनच गुढता आणणारे ...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चॉईस बाय वैम्पायर

Submitted by प्रसिक on 1 November, 2010 - 14:24

biggrin.gif रात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही.

गुलमोहर: 

कबर

Submitted by प्रसिक on 4 October, 2010 - 01:18

समुद्राच्या किनाय्रावर गार वारा केसांशी खेळत तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होता. खडकावर उभी राहून स्वतःला सांभाळताना तिच्या प्रेमीचे अदृश्य हात तिला आकाशाकडे साद घालत होते. मागुन ऐकू येणारा वाद्यांचा कर्कश आवाज कानात घुमत तिच्या पायांमधे थरथर निर्माण करत होता. किनाय्राला लागून असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्या लाटा आदळत होत्या. मग तिची नजर ओळीत ठेवलेल्या दगडी शवपेट्यांवर गेली. प्रत्येक शवपेटी तिच्या मालकाची वाट पहात होती. मागून एकू येणाय्रा वाद्याचें सुर बदलले. अथांग समुद्राकडे पाठ करून ती तिच्या पतिच्या निर्जिव पार्थिव देह उचललेल्या सेवकांमागे चालू लागली.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लघुकथा