मैत्री

मैत्री भाग - 2

Submitted by ..सिद्धी.. on 11 April, 2018 - 11:48

रोहन बोलत होता. पहिल्यांदा घाबरलेली समिधा आता शांत बसून ऐकत होती. तितक्यात तिच्या कानाशी काहीतरी कर्कश्श आवाज आला. ती धडपडून जागी झाली . पहाटेचे पाच वाजले होते. तिला कळतच नव्हतं आपण आता पाहिलं ते स्वप्न होतं की सत्य. तीने आजूबाजूला बघीतलं तर ती तिच्य हाॅस्टेलच्या रूममध्ये होती. शेजारच्या बेडवर  संजना मस्त घोरत पडली होती. समिधा आता विचारात पडली. गेल्या पंधरा दिवसात दुसर्यांदा हे स्वप्न पडलं होतं. आणि नेमकं रोहन कारण सांगताना तिची झोपमोड व्हायची. पहिल्यांदा तीने असेच मनाचे खेळ म्हणून तो विषय सोडून दिला होता. पण आता दुसर्यांदा तेच घडल्याने तिला काळजी वाटायला लागली.

शब्दखुणा: 

मैत्री भाग - 1

Submitted by ..सिद्धी.. on 10 April, 2018 - 09:08

संध्याकाळचे सहा वाजले होते. बसच्या उघड्या खिडकीतून थंडगार वारा वाहत होता. समिधा खिडकीतून बाहेर बघत होती. मागच्या चार वर्षात गावात झालेले बदल ठळकपणे तिला जाणवत होते.बरीच प्रगती झाली होती. पण हिरवीगार शेतं मात्र अजूनही तशीच होती. मोक्याच्या ठिकाणी दुकानांची संख्या वाढली होती.बाकी रस्ते मात्र मोकळेच होते. बर्याच वर्षांनी ती गावच्या शुद्ध हवेत मोकळा श्वास घेत होती. हळूहळू अंधार पडायला सुरूवात झाली. दहा पंधरा मिनीटांनी तिचा स्टाॅप आला आणि ती उतरली. दहा तासांच्या कंटाळवाण्या प्रवासानंतर उतरल्यावर जरा पाय मोकळे झाले.एक आळस देऊन तिने रिक्षा शोधायला सुरूवात केली.

शब्दखुणा: 

तुझी मैत्री सखे..

Submitted by Harshraj on 5 February, 2018 - 02:22

मनु आणि सुलू....दोघी एकमेकींच अंतरंग बनल्या होत्या..दोघींनी ग्रॅज्युएशन फर्स्टक्लास मधे पूर्ण केल..तेव्हा ताईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही..मनुंच विश्व म्हणजे फक्त सुलु होती..शाळॆच्या पहिल्या दिवशी ..ज्यावेळी तिला मुलींनी हिणवलं होतं.... त्या दिवशी ती खूप रडली होती..

पण सुलू त्या मुलीजवळ गेली, "तीला चालता येत नसलं तरी, ती हुशार आहे... तुमच्यासारखी येडपट नाही आणि तिच्यासोबत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी तिच्यात काही उणं नाही..."

त्यानंतर मात्र त्या कुणाशी जास्त बोलल्या नाहीत..मग त्या दोघीच सर्वत्र फिरायच्या ..

विषय: 
प्रांत/गाव: 

वेल्डिंग- बिगिनींग ऑफ ए लव्हस्टोरी

Submitted by आनंद. on 24 January, 2018 - 11:18

"वेल्डिंग-बिगिनींग ऑफ ए लव्हस्टोरी"

नविन मित्रमैत्रिणी बनत असताना एखादा असा काही प्रसंग घडतो की त्या प्रसंगाने समोरचा अथवा समोरची आपल्यासाठी एकदमच खास बनून जातात. मग तो प्रसंग म्हणजे एखादा भांडणाचा क्षण, मुद्दामहून काढलेली खोडी, नकळत घडलेला लहानसा अपघात किंवा लहानश्या प्रसंगात घेतलेली एकदुसर्याची काळजी असलं काहीही असू शकतं. अशा खास प्रसंगानंतर मैत्रीचं रोपटं सर्वांगानं आणखी बहरतं हे आपल्यापैकी अनेकांनी अनेकदा अनुभवलं असेल. अशीच माझी एक लहानशी आठवण.

अतूट मैत्री

Submitted by नीलम बुचडे on 25 September, 2017 - 06:28

अतूट मैत्री
मैत्री असावी फुलासारखी,
निशब्दपणे उमलणारी..
मैत्री असावी दवासारखी,
मोत्यासारखी चमचमणारी..

मैत्री असावी सूर्यासारखी,
प्रकाशमय करणारी..
मैत्री असावी चंद्रासारखी,
शीतलता देणारी..

मैत्री असावी धाग्यासारखी,
वस्त्र साकारणारी..
मैत्री असावी सुईसारखी,
नात्यांना गुंफणारी..

मैत्री असावी मेणासारखी,
मित्रांसांठी वितळणारी..
मैत्री असावी दगडासारखी,
अतूट राहणारी..
-निलम बुचडे

शब्दखुणा: 

मैत्रीकरता रद्दी संकलन १ ऑक्टोबर २०१७

Submitted by हर्पेन on 24 August, 2017 - 22:51

लोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन हे ‘मैत्री’ चे वैशिष्ट्य आहे. "रद्दीतून सद्दी" म्हणजे रद्दी जमा करून ती विकून त्यातून मेळघाटसाठी निधी जमवणे. गेल्या बारा वर्षांमध्ये ‘मैत्री’ ने २० लाखाहून अधिक पैसे यातून उभे केले आहेत.

मैत्रीदिनाच्या निमित्ताने

Submitted by र।हुल on 6 August, 2017 - 13:46

आज दुपारी कितीतरी दिवसांनंतर.. खरंतर महिन्यांनंतर त्याचा फोन आला. मोबाईल कडे बघून क्षणभर वाटूनही गेलं,'उचलावा कि नाही?' पण नंतर मात्र मनानं स्वच्छपणे कौल दिला,'उचल असा.' आणि एक गोष्ट स्पष्ट झालीच; मनात खोलवर कुठंतरी एका कोपर्यामध्ये, आम्ही सोबतीनं घालविलेला काळ सुप्तपणे जागा बनवून होता. त्यामुळेच काही महीन्यांपुर्वी तिच्यावरून आमच्या दोघांत झालेल्या भांडणानंतर तयार झालेला अबोला आजच्या एका कॉलने संपवला. बराच वेळ आम्ही दोघं बोलत होतो आणि का नाही बोलणार? ज्युनिअर कॉलेजमध्ये असताना दोन वर्षं आम्ही दोघं जय-विरू प्रमाणे सोबतीनं वावरलेलो.

शब्दखुणा: 

निचरा

Submitted by सई. on 22 June, 2017 - 03:04

एका सुंदर कार्यक्रमाहून परतत होते. गवयाचा गळा तापतो तशी माझीमाझीच मनाची मैफलही रंगली होती. त्याच तंद्रीत सिग्नलला उभी असताना अचानक एक अगदी टिपेचा चिरका स्वर कानावर पडला. थांबलेले सगळेच चमकून पलिकडच्या फुटपाथकडंं बघायला लागले आणि तिथंच खिळले. मीही रेंगाळलेच क्षणभरासाठी, खोटं का बोला, पण नशिबानं झटकन भानावर येऊन मान वळवली.

शब्दखुणा: 

एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

मातीशी मैत्री

Submitted by सेन्साय on 13 February, 2017 - 01:50

वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास ! निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं.

Pages

Subscribe to RSS - मैत्री