एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
अधिक आषाढ शुद्ध पौर्णिमा (२ जुलै)
अधिक आषाढ शुद्ध त्रयोदशी (३० जून)
अधिक आषाढ शुद्ध दुर्गाष्टमी (२५ जून)
अधिक आषाढ शुद्ध विनायक चतुर्थी (२० जून)
मंगलमूर्ती मोरया !
जूले …… !
कोणे एके काळी....
जेंव्हा केंव्हा भूगोल ह्या विषयात नकाशे येणे सुरू झाले, तेंव्हापासून तो माझा जास्तच आवडता विषय झाला. मला वाटत सहावी सातवीमधे असेल. पहिल्यांदा भारताचा नकाशा पाहीला तेंव्हा दोन नावांनी माझ लक्ष वेधून घेतल होत. एक लेह आणि दुसर गिलगिट. तेंव्हा या दोन जागांना कधितरी भेट द्यायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. ती २, ३ वर्ष टिकली. नंतर ते मनातून निघून गेल. त्यानंतर दोन वेळा हिमालयात जाऊन आलो. पण लेहची काही आठवण झाली नाही.
गब्बर एक्प्रेस लेहमध्ये शिरली खरी पण आमचे हॉटेल कुठे आहे ते गब्बर एक्प्रेसच्या चालकाला माहित नव्हते. विचारत विचारत पुढे जाताना दोन तरुण वाट दाखवण्याच्या मिषाने सरळ गाडीतच चढले. त्यांचे स्टेशन आल्यावर 'आता असेच पुढे विचारत जा, हॉटेल सापडेल' हा सल्ला देऊन त्यांनी आम्हाला बाय बाय केले. थोडे पुढे गेल्यावर एका म्हातारबाबांनी " हॉटेल तर लेहच्या दुस-या टोकाला आहे" म्हणुन आम्हाला परत यु टर्न मारुन परत पाठी धाडुन दिले.