मैत्री भाग - 2

Submitted by ..सिद्धी.. on 11 April, 2018 - 11:48

रोहन बोलत होता. पहिल्यांदा घाबरलेली समिधा आता शांत बसून ऐकत होती. तितक्यात तिच्या कानाशी काहीतरी कर्कश्श आवाज आला. ती धडपडून जागी झाली . पहाटेचे पाच वाजले होते. तिला कळतच नव्हतं आपण आता पाहिलं ते स्वप्न होतं की सत्य. तीने आजूबाजूला बघीतलं तर ती तिच्य हाॅस्टेलच्या रूममध्ये होती. शेजारच्या बेडवर  संजना मस्त घोरत पडली होती. समिधा आता विचारात पडली. गेल्या पंधरा दिवसात दुसर्यांदा हे स्वप्न पडलं होतं. आणि नेमकं रोहन कारण सांगताना तिची झोपमोड व्हायची. पहिल्यांदा तीने असेच मनाचे खेळ म्हणून तो विषय सोडून दिला होता. पण आता दुसर्यांदा तेच घडल्याने तिला काळजी वाटायला लागली. असाच विचार करता करता अर्धा तास गेला .एव्हाना संजनाही उठली होती. तेव्हा तीला शून्यात बघत बसलेली समिधा दिसली. संजना मागून गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला.समिधा दचकली आणि भानावर आली. संजनाने विचारलं ;कसला विचार करत होतीस तर तीने स्वप्नाबद्दल सगळं तीला सांगितलं. संजनालाही आता याचं आश्चर्य वाटायला लागलं. शेवटी त्या दोघींनी ठरवलं. अजून दोन दिवसांनी परीक्षा संपणार होती. त्यानंतर गावी जाऊन या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा. त्याआधी महंतांना जाऊन भेटायचं. महंत हे प्रकरण समिधासाठी जरा नवीन होतं .पण संजनाचे कुटुंब महंतांना मानायचे. अनेक बाबतीत ते त्यांचा सल्ला घ्यायचे. इतकं सगळं ठरवून दोघींनी उठून आवरलं आणि अभ्यासाला बसल्या . मग काॅलेजमध्ये जाऊन परीक्षा देऊन हाॅस्टेलवर आल्या.संजना आणि समिधाने रोहनची चौकशी करायला समिधाच्या एका मित्राला फोन केला. तेव्हा रोहन एका अपघातात दोन-तीन महिन्यापूर्वी देवाघरी गेल्याचं कळलं.आता तिला कळून चुकलं की आपल्याला पडणार्या स्वप्नामागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. हळूहळू दिवसाची रात्र झाली आणि समिधाला जरा जरा भीती वाटायला सुरूवात झाली. संजनाने हे हेरलं आणि हळूच हनुमानाचा एक छोटासा फोटो तिच्या उशीखाली नेऊन ठेवला. बराच वेळ अभ्यास करून त्या झोपायला गेल्या. समिधालाही त्या रात्री शांत झोप लागली. असेच भराभर दोन दिवस गेले. शेवटचा पेपर देऊन दोघी रूमवर गेल्या. समिधाला बसल्या बसल्या डुलकी लागली. तिला असं शांत झोपलेलं पाहून संजनालाही बरं वाटलं . तिने बाहेर जाऊन महंतांना फोन केला आणि संध्याकाळी भेटायची वेळ ठरवली . तिने तसं घरी तिच्या आईबाबांनाही कळवलं.  तासाभराने समिधा उठली. आणि तयारी करून दोघी महंतांकडे जायला निघाल्या.समिधाला महंत म्हणजे कोणीतरी झाडाखाली रहाणारे;तंत्र मंत्र करून भूत हाकलणारे मांत्रिक वाटत होते. पण जेव्हा ती संजनाबरोबर तिथे गेली तेव्हा तिचा हा समज साफ खोटा ठरला. महंतांचा एक छोटासा बंगला होता. आत गेल्यावर महंतांनी त्यांच स्वागत केलं. समिधाला त्यांनी संपूर्ण स्वप्नाविषयी विचारलं. तीने त्यांना सगळं सांगितलं. पण तिचं सांगणं संपल्यावर महंतांनी पण त्यात काही तपशीलांची भर घातली. आता तीला महंतांविषयी आदर वाटू लागला. तीने त्यांना  विचारलं; स्वप्न तर मला पडली होती मग इतकं तंतोतंत तुम्हाला कसं माहित? महंत जरा हसले आणि त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं 'साधना'. मग त्यांनी तीला रोहनविषयी अजून माहिती विचारली आणि योजना ठरवली. दुसर्या दिवशी सकाळी बरोबर दहा वाजता निघायचं ठरवलं. संजनाने तिकीटं बुक करण्यासाठी मोबाईल सुरू केला तर त्यांनी तिला थांबवलं. ते म्हणाले उद्या आपण समिधाने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन काही विधी करून रोहनला आवाहन करणार आहोत. त्याची नेमकी समस्या लक्षात घेऊन मदत करायचा प्रयत्न करणार आहोत. रोहन हा पुण्यात्मा आहे .त्यामुळे त्याला घाबरायची आवश्यकता नाही. त्याच्यावर समिधाशी संबंधित व्यक्तीकडून काहीतरी अन्याय झालाय. हे मला माझ्या प्राथमिक अभ्यासातून कळलयं. उद्या संपूर्ण गोष्ट कळेलच. तो जिथे आहे तिथे चांगल्या शक्तींबरोबर वाईट शक्तींचाही अंतर्भाव आहे .त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. म्हणून आपण उद्या माझ्या गाडीने जाणार आहोत. त्यांनी संजनाच्या घरून कोणा एका व्यक्तीला बोलवायला सांगितलं. संजनाचा दादा यायला तयार झाला. दुसर्या दिवशी दहा वाजताची वेळ निश्चीत करून दोघींनी महंतांचा निरोप घेतला.
महंतांच्या बोलण्याने समिधाची भीती कमी झाली.रूमवर येऊन दोघींनी आवरा आवर केली आणि उद्या जाण्यासाठी बॅग भरून ठेवली. सकाळी उठून दोघींनी तयारी केली आणि हाॅस्टेलच्या गेटवर येऊन थांबल्या. बरोब्बर दहा वाजता महंत आणि संजनाचा भाऊ समीर गाडी घेऊन आले. महंत आज सोवळं नेसून त्यावर कुर्ता घालून आलेले.त्यांचा चेहेरा अतिशय प्रसन्न दिसत होता. आल्यावर त्यांनी सगळ्यांना चंदनाचा टिळा लावला आणि एकेक आभिमंत्रीत केलेला धागा मनगटात बांधला.समीरने महंतांची परवानगी घेऊन गाडी चालवायला सुरूवात केली. प्रवासाला सुरूवात झाली.

क्रमशः

---- आदिसिद्धी

भाग 1 :-
https://www.maayboli.com/node/65783

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा असा समज आहे की पहील्या भागातील कथा ही पुर्णपणे स्वप्नात घडलेली होती.
समज खरा असेल तर पुढील प्रश्न :
हे फक्त स्वप्न असेल तर रोहन खरच मेला आहे ही शहानिशा समिधा ने केली का? असेल तर तसा उल्लेख कथेत हवा.

हो पहिला पार्ट स्वप्नातच होता. बरं झालं चूक लक्षात आणून दिलीत पाफा काका. दुरूस्त करते. धन्यवाद तुमचे.
बदल केला आहे. आता वाचा.

आदिसिद्धी
कथानक चांगल जमलाय. मी पहीला भाग शोधायचा प्रयत्न केला. तो आहे?
का हीच सुरूवात आहे.

अहं पहिला भाग आहे पण मला लिंक देता येत नाही म्हणून दिली नाहीये. कथा कादंबरी विभागात बघता का प्लीज. परवाच टाकलाय भाग 1.