वेग वेगळ्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश असावा म्हणून, सोपे , सहज जमणारे प्रकार म्हणून, व्यायामशाळेत जाताना हातात स्मूदीचा प्याला दिसला तर जास्त भाव मिळतो म्हणून, अशा अनेकविध कारणांनी अनेक जण स्मूदीचे फॅन आहेत. आंतरजालावर वजन वाढवणे, वजन कमी करणे, इथपासून प्रत्येक प्रकारच्या व्याधी साठी स्मूदी च्या कृती सापडतात. तरिही, मायबोलीकरांच्या ट्राईड अॅण्ड टेस्टेड स्मूदी पाककृतींकरता हा धागा.
वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास ! निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं.
मंजूडीच्या कॉर्न चाट पाककृतीवर पूनमने केलेली फर्माईश या बाफस्वरूपात पूर्ण करण्यात येत आहे :). चला तर मग, लिहा आपापल्या आवडत्या कॉर्नच्या पाककृती.
मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.