अंगडाई तुझी

Submitted by निनाव on 10 April, 2011 - 12:50

डायरी चाळतांना ही कविता दिसली.. आज इथे प्रकाशित करत आहे:
******

अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून
बघताच मी वीज भिरभिरते अंगभर जणु
लपतेच चंद्र तुझ्या हातात तसे चेहरे तुझे
लाजाळुच जशी बसतेस तु अंग दुमडून

चढत्या श्वासांना मग दाबतेस तु कसून
बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन
हात शोधतात पदर हातातला मग
अधिकच मोहक येतेस तु दिसून

चढत्या श्वासांना तु दाबतेस कसून
बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन
हात शोधतात पदर हातातला मग
अधिकच मोहक येतेस तु दिसून

उडावे केस मोकळे तुझे मग विसरुन
उठाव्या नजरा तुझ्या हळुच ठरवून
असह्य होते माझेच मला तुझे दिसणे मग
पडावे मजवर तुझे मधु यौवन कोसळुन

जणु यावी कशी चाल गाण्याची चालुन
आरस्यातली छवी यावी बाहेर निघुन
गझल उतरावी माझी नश्यात भिजुन
आलीस पौर्णिमे ची रात्र मज दिसून

अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून
मी बघताच वीज भिरभिरते अंगभर
जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात
लाजाळुच बसते जशी अंग दुमडून

गुलमोहर: 

अहो नाही तुमची कविता वाचत असताना सहज मनात विचार करत होतो.
मलाही माहित नाहीये, कोणी जाणकार सांगू शकतील.
कविता छानच आहे.