विपरीत

Submitted by UlhasBhide on 10 April, 2011 - 12:13

विपरीत

Wipareet-ok.JPG

गुलमोहर: 

वाह....

उकाका,तुम्ही या आधी सुद्धा अश्या चित्रमय कविता केल्याचे आठवते आहे.

आवडलेच Happy

क्या बात है!!! अफलातून... आधी वाटलं अमानवीय वगैरे काही आहे की काय... जरा घाबरतच उघडलं तर हे मस्तच निघालं... Happy

वा!
>का बाटली म्हणावे
ऐवजी

बाटली कशास म्हणावे? (हे थोडे वृत्तात वाटते चू.भू.दे.घे.)

बाकी, मस्तच!

(विपरीत वरून एक श्लोक आठवला त्यामुळे जरा आगाऊपणा)

साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव केवलम् |
सरसो विपरीतश्चेत् सरसत्वं न मुञ्चते ||

(साक्षर हा शब्द उलटा केला तर 'राक्षस' होतो,
पण सरस हा शब्द उलटा केला तरी सरस च राहतो.
थोडक्यात, सज्जन/चांगले/मानी/ज्ञानी..... असे लोक आपले उत्तम गुण सोडीत नाहीत.
अशांची दुसरी व्याख्या 'हेकेखोर' अशीही होत असावी Happy )

उकाका सह्हीच!!! Happy खुप्प्प्प्प आवडले.... एकदम अभिनव! तुमचे सचित्र जोक्स आणि हे असे शब्दांचे खेळ नेहमीच मस्त असतात... निखळ करमणूक होते... अजून येऊ द्या! Happy

सर्वांना खूप खूप धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------
चैतन्य, तू म्हणतोस ते खरं आहे. बाटली कशास म्हणावे? असं लिहिल्यास इतर ओळींप्रमाणे, त्या ओळीत देखील १४ मात्रा होऊन, वृत्तात अगदी फिट्ट बसते.
खरं सांगतो .... मी देखील, प्रथम तू सुचविलेली ओळच लिहिली होती. पण सदर रचना जरी वृत्तात असली तरी ती विशिष्ट ठेक्यात गद्यात वाचायलाच योग्य आहे. त्यामुळे तसं वाचून बघताना तिसर्‍या ओळीनंतर किंचित् पॉज घेऊन "का बाटली म्हणावे" हे शब्द ठेक्यात उच्चारल्यावर अधिक परिणामकारक वाटले, म्हणून तसा बदल केला. (चौथ्या ओळीआधी घेतलेल्या पॉजमुळे कदाचित् २ मात्रा भरून निघत असाव्यात.)
असो .... मनापासून, इतक्या बारकाईने लक्ष देऊन कविता वाचल्याबद्दल आणि त्यावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल तसंच नि:संकोचपणे केलेल्या सूचनेबद्दल खूप धन्यवाद.
तू दिलेलं संस्कृत श्लोकाचं उदाहरण मस्तच आहे. Happy

उल्हासजी
टॉपच आहे
Happy
चैतन्य
छान श्लोक
हवं तर वेगळा धागा उघडून आण़़खी येऊ द्यात
याला काही तरी वेगळ नाव आहे ना हो??

काका दोन्हि इतक्या नाहि आवडल्या मला..
माझ्या मते दारू हि फक्त प्यालातुनच पितात असं नाहि ना? का इथे न पिणारा आणि पाजणारा अभिप्रेत आहे?