चेटकीचा तळ
Submitted by उमेश वैद्य on 10 April, 2011 - 09:48
चिंचेच्या झाडावर आहे चेटकीचा तळ
तिच्याकडे आली आज पाहूणी हडळ
पाहूणीच्या संगे तिचे नोकर पस्तीस
मावशीला भेटायला आले झोटींग, खविस
तळावर होईल आज मोठी मेजवानी
शाकीण-डाकिणीची नाच आणि गाणी
किंकाळ्या आरोळ्या घेती तळ डोक्यावर
खेळ रंगेल भूतांचा चंद्र येई माथ्यावर
सारी भुतावळ निघे पहा हेराया सावज
ईथे दूर वस्तीवर पहा येतील आवाज
पहाट होताना निघे मुंजोबाची स्वारी
पुढे उभे वेताळ ढाळीती चवरी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा