Submitted by harish_dangat on 10 April, 2011 - 23:25
मेंढरांची गर्दी | लांडगेच नेते |
रोजे खाती प्रेते | जीती जागी ||
मेंढरांच्या मनी | कुपणाची भीती |
जुन्या चालीरीती | पुढे चाले ||
एक चाले पुढे | बाकी तयापाठी |
नाही तर काठी | पाठीवरी ||
वाळले गवत | मेंढराचा घास |
कोकराचा वास | लांडग्यासी ||
अशी ही मेंढरे | विचार हा त्याज्य |
लांडग्यांचे राज्य | चालू असे ||
-हरीश दांगट
गुलमोहर:
शेअर करा
खरं आहे
खरं आहे
"वाळले गवत | मेंढराचा घास
"वाळले गवत | मेंढराचा घास |
कोकराचा वास | लांडग्यासी ||"
.... छान
मेंढरंरूपी जनता आणि भक्षक
मेंढरंरूपी जनता आणि भक्षक राजकारण्यांची गाथा
छान जमलिये... पण अर्धवट वाटतेय..
खरंय, अगदी खरं आहे....
खरंय, अगदी खरं आहे....
आवडली...
आवडली...
हाण तिच्या मारी..!
हाण तिच्या मारी..!
सत्य स्वरुप.
सत्य स्वरुप.