Submitted by zaad on 10 April, 2011 - 08:26
गणित सुटलं तसं सगळ्यांच्याच लक्ष्यात आलं
की उत्तर फारच सोप्पं होतं!
आपण उगीचंच समीकरणं, असमीकरणं,
सूत्रं, प्रमेयं, सिद्धांतं इ. इ. अनेक गोष्टींचा
काथ्याकूट करीत बसलो यातल्या कशाचीच
उत्तर मिळवण्यासाठी गरज नसताना.
प्रश्न सोडवताना प्रश्नच अधिक अवघड करीत बसलो.
मला मात्र अजूनही असंच वाटतंय,
आपण केलेला काथ्याकूट
टेक्निकली अनावश्यक असला तरी
'त्या'च्याशिवाय हे गणित
कधीच सुटलं नसतं....
गुलमोहर:
शेअर करा
मस्त !! फार वेगळं मांडतोस
मस्त !!
फार वेगळं मांडतोस दादा तू...
आपण केलेला
आपण केलेला काथ्याकूट
टेक्निकली अनावश्यक असला तरी
'त्या'च्याशिवाय हे गणित
कधीच सुटलं नसतं..>>> मस्त!
अज्ञात यांच्याशी सहमत आहे. खूप वेगळेपण!
-'बेफिकीर'!
आवडली.. छानच..
आवडली.. छानच..
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
मस्त. रचनेतील वेगळेपण आवडलं
मस्त. रचनेतील वेगळेपण आवडलं पु.ले.शु.
वा! >> >> त्याच्याशिवाय हे
वा!
>> >> त्याच्याशिवाय हे गणित
इथे मी अवतरण द्यायचंच झालं तर 'हे'ला दिलं असतं.
(अवांतर : कवितेत अवतरणं देण्याबद्दल मागे बोललो होतो (वाद घातला होता) आठवतंय का?
)
स्वातीताई!! परफेक्ट!!!!
स्वातीताई!! परफेक्ट!!!! राईट!!!!!!!!

actually, मलाही यात काहीतरी sollllid कमी वाटत होतं...
(खरं सांगायचं तर मला ही कविता का हाही प्रश्न पडला होता)
ते अवतरणचिन्ह 'हे' ला दिल्यामुळे जरातरी अर्थ लागला मला...
@ स्वाती : चांगलंच आठवतंय!
@ स्वाती : चांगलंच आठवतंय!
अवतरणाचा तू सुचवलेला बदल केवळ अप्रतिम!! मनापासून धन्यवाद!!! 

@ आनंदयात्री : हं......!