Submitted by उमेश वैद्य on 10 April, 2011 - 09:48
चिंचेच्या झाडावर आहे चेटकीचा तळ
तिच्याकडे आली आज पाहूणी हडळ
पाहूणीच्या संगे तिचे नोकर पस्तीस
मावशीला भेटायला आले झोटींग, खविस
तळावर होईल आज मोठी मेजवानी
शाकीण-डाकिणीची नाच आणि गाणी
किंकाळ्या आरोळ्या घेती तळ डोक्यावर
खेळ रंगेल भूतांचा चंद्र येई माथ्यावर
सारी भुतावळ निघे पहा हेराया सावज
ईथे दूर वस्तीवर पहा येतील आवाज
पहाट होताना निघे मुंजोबाची स्वारी
पुढे उभे वेताळ ढाळीती चवरी
थकून भागुन देईल चेटकी जांभई
तिच्या आवाजाने उठे किर्र रानी कोल्हेकुई
परतून येती जेंव्हा होईल पहाट
बाभळीच्या फ़ांदीवर लटकतील उलट
उमेश वैद्य २०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा उमेश.... चेटकी आणि हडळ
व्वा उमेश....
चेटकी आणि हडळ यावर सुद्धा कविता होवू शकते अं? खरंच कवितेला विषयाची मर्यादा नाही हे पटलं...
आवडली... पु ले शु
-अशोक
डॉ. ह्यांच्या मताला संपुर्ण
डॉ. ह्यांच्या मताला संपुर्ण अनुमोदन. खरंच ... मर्यादा नाहीच .. विषय किती विषम वाटतो, पण मांड्णी सुंदरच.
चेटकी
चेटकी
हडळ
झोटींग
खवीस
शाकीणी
डाकिणी
भुत
मुंजोबा
वेताळ
यातला फरक कृपया कोणी स्पष्ट करेल का ??
*******************************************************
रामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामराम
धन्यवाद मित्रांनो......
धन्यवाद मित्रांनो......
प्रगो, फरक नाही सांगता येणार
प्रगो, फरक नाही सांगता येणार पण हे माबोवरील डु आय नाहीत एवढे मात्र पक्के !
उमेशजी, आवडेश
कशावरबी काय बी लिवायचं? आरं
कशावरबी काय बी लिवायचं? आरं जरा कवितेइषयी गंबीर व्हा रं...मायला हीच मराठी कवितेची शोकांतिका हाये!!
उमेश, कविता आवडली. चंद्र
उमेश, कविता आवडली. चंद्र गायबला असता (अमावास्या) तर वातावरण निर्मिती अजून सोपी झाली असती (?)
मला वाटतं ही काकाक मध्ये हलवावी. कविता चांगलीच अहे, विषय वेगळासा आहे म्हणून.
कशावरबी काय बी लिवायचं? आरं
कशावरबी काय बी लिवायचं? आरं जरा कवितेइषयी गंबीर व्हा रं...मायला हीच मराठी कवितेची शोकांतिका हाये!!>>>>
ह्या कवितेत वापरलेली ही मिथकं आजकाल लोप पावत चाललेली आहेत. एकेकाळी ह्याच मिथकांनी
माझ्या बालमनाला भुरळ पाडली होती ते आठवते. बालमनाच्या निरोगी वाढीसाठी मिथके
जीवनसत्वांचे काम करतात या वर माझा विश्वास आहे. आणि जीवनसत्व प्रौढांनी घ्यायलाही हरकत नसावी.
मराठी कविता अजून संपलेली नाही. तेंव्हा तिची 'शोकांतिका' अथवा 'सुखांतिका' होण्यावर माझा विश्वास नाही.
बागुलबुवा, धन्यवाद. पण काकाक म्हणजे काय आहे?
का का क म्हणजे, काहिच्या काही
का का क म्हणजे, काहिच्या काही कविता. कवितेकरता वेगवेगळे विभाग नसल्याने बालकविता, विडंबन, वात्रटिका ह्या सदरात टाकल्या जातात.
http://www.maayboli.com/gulmohar_new/234
अरेच्या!! माहितच नव्हते. असो.
अरेच्या!! माहितच नव्हते. असो.
उमेश, आपल्याला सगळ्याच गोष्टी
उमेश, आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती असतात असे नाही, माहिती असलेल्या गोष्टीही खर्या असतात असे नाही.
मला वाटते मला काय म्हणायचय ते तुमच्या लक्षात आले असेलच.
विशाल हेहेहेहेहे... उमेश;
विशाल हेहेहेहेहे...
उमेश; मित्रा वेगळेच मांडलेस.