कुणाला सांगणे काही नसावे
कुणाशी मागणे काही नसावे
एकटेच जावे नदिकिनारी
कुणीही सोबतीला नसावे
पाऊलखुणांना कुशीत घेउनी
नभाला पाहुनी शोधावे तुला
चाहूल घ्यावी स्पर्षाची तुझ्या
विसरुन बघावे सावलीत" तुला"
खळाळत्या जलास पाहुनीया
गोड चेहरा तुझा आठवावा
मंजुळ स्वराशी मी एकरुप व्हावे
"यमन "सांजवेळी पुन्हा आळवावा
कुणाला सांगणे काही नसावे
कुणाशी बोलणे व्यर्ज व्हावे
एकट्याने एकटेच गात जावे
आठवांचे पुन्हा कर्ज घ्यावे
गडव्यथा
कश्या सांगू
यातना माझ्या
सुखात होतो
कुशीत तुझ्या
का दूर झाला
तू बंधनातून
माझ्या शिवराया
टोचतात खिळे
जेव्हा आठवण
येते काळाची
तू झी या.............
काळ तुझा
उधळला
कडा माझा
कोसळला
राहायचा येथे
सैन्याचा गोळा
आता वाहतो
शुकशुकाट
खळखळा
किल्ला संबोधत
तुम्ही मला
सुख मिळे
माझ्या मनाला
आता म्हणतात
पडका गड
हादरते तार
हृदयाची थरथर
माझ्या प्रत्येक कवितेला
तुझाच शेरा पहिला असतो
शब्दा शब्दा ला चुकांचा मारा असतो
अन म्हणत असतोस
कविता काय असते
कळतय काय तूला
मी मनात चिडते,उगाच् रडते
अन मनाशीच बोलते
अरे तूला कळतात काय
उस्फ़ुर्त भावना................
तूला कळतात काय
प्रसाववेदना................
तूला कळत काय
भावनांचा स्वछ्चंदीपणा
काय तूला जे वाटतं ते मला का पटावे
तुझ्या शब्दांना मी आपले का म्हणावे
कवितेला माझ्या मी अनाथ का करावे
उगाच मोडीत तोडीत यमकात का बसवावे
मला नाही भावे ते कवितेचे तोडणे
शब्दाशब्दात यमकाला घुसवणे
अरे झिरपू देना भावना
पाणावू दे ना डॊळे
खरीखुरी ती माझीच असते
माझी होउन नसात भिणते
चाललो मी एकटा आज या वाटेवरी
एकटीच वाट सखे आज मला चालायची
फुल कुसुमांचे मळे फुलले सभोवताली
गंध सारा हरवला; फुले ही कोमेजली
सूर सारे हरवले; गीत उरात राहीले
चित्र रेखीले ते बनुनी प्रतीमा राहीले
गेले ते क्षण फिरूनी कधी ना यायचे
आठवणीत त्यांच्या आज बुडून जायचे
का असा चाललो मी? का असा भटकतो?
तुझ्याच ह्रुदयी शेवट माझा तरी वाट का शोधतो?
मनपानानं पक्षी व्हावं; डोळे भरून आकाश प्यावं
अनअवधानानं अवधान; कुणि व्याधानं वेधुन घ्यावं
ही जखम गोडशी नववचनात भिजावी
संवाद कळ्यांशी; मूर्छा मधुतम यावी
निववीत झुंज निकराची
वार्यातुन झुळुक झरावी
तन कथा शोडषी अंग भरून वहावी
रजनी गंधाची तमा; तमात विरावी
तदनंतर श्वासा श्वासांची
स्पर्धाच न शेष उरावी
माळरानानं हुरळुन जावं; वन वसंतवैभव व्हावं
सारं उधाण उधळून द्यावं; पाना पानानं झुलत रहावं
.....................अज्ञात
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू
चला लवकर यारे सारे
मराठीची गुढी उंच उभारू
नववर्षाचा सण हा पहिला
आनंदाने साजरा करू ||धृ||
चला एक मोठी काठी आणू
शालू बांधून तिला आपण सजवू
हारकडे अन फुलमाळा
हारकडे अन फुलमाळा बांधून
वर एखादा लोटा घट्ट बसवू
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||१||
पाडव्याच्या शुभमुहुर्ती
मंगल कार्य सुरू हो करती
दारी तोरण अंब्याचे
दारी तोरण अंब्याचे लावून
अंगणी मंगल सडा चला शिंपडू
पाउस पडला धो धो
भरुन वाहती नाले ओढे
अडलेली कातकरी बाई
कुठे जावे पडले कोडे
दिसेना पुढे काहीही
तिला पडली रानभूल
तेवढ्यात दिसला तेथे
एक ओढ्यावरचा पूल
कुठे कोरडी जागा नाही
धार लागली उभ्या शिवारा
पुलाखालच्या मोरीमध्ये
सापडला तिला निवारा
पोटमधल्या दाबल्या कळा
रडू फुटले वाहत्या ओहळा
एक उसासा देउन काढला
पोटातून मांसाचा गोळा
सापडले दोन दगड तेथे
धुवून काढला त्यांचा गाळ
खाली एक वरती दुसरा
दगड आपटून तोडली नाळ
नाल्याचे ते गढूळ पाणी
अन थंडीने भरले हीव
बुडविला तो दोन वेळा
धुवून काढला नवा जीव
टाहो फोडला बाळाने
उराशी धरला तान्हा
उपाशी पोटी मायेला
भरगच्च फुटला पान्हा
माझे वडील शेतकरी कम सर्विस करणारे आहेत. शेती सांभाळण्यासाठी त्यानी कायमची नाईट शिफ्ट स्विकारली होती. लेख, कविता लिहीण्याचा त्यांना पहिल्यापासुन छंद होता. पण सर्विसच्या तारेवरच्या कसरतिवर त्यांना वेळ मिळाला नव्हता. पण काही वर्षापुर्वी प्रिमियरची व्हॉलेंटरी रिटायरमेंट निघाली त्यात वडीलांनी ती स्विकारली. आता त्यांना कविता करण्याचा छंद जोपासता येत आहे. मधुन मधुन काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तसेच मासिकांमध्ये त्यांचे लेखन छापुन येते. काही मित्रांनी त्यांना आता कविता संग्रह छापण्याचा आग्रह केला आहे. त्या कविता टाईप करण्यासाठी त्यानी माझ्याइथे दिल्या आहेत.
काळीज हवे ना वेदनेचे
चिरलेल्या कातडीचे
व्रणातुन निघालेले
रक्त पिउन घेण्याचे
किळस जखमेची करणे
पहिले लक्षण माणसाचे
बाह्यरुपात काय नसते
परिवर्तन करा हृदयाचे
त्यांच्यातही सुर्य लपलेला
पहा उघड्या नजरेने
का तोंड झाकुन चालता
सेवा करा बाबाच्या स्पर्षाने
कल्पी जोशी
03/07/2010
सफेद केसात म्हातारपण हसत
लहान मुलात बालपण खेळत
पण नुकतच उमललेल माझ तारुण्य?
.
.
.
ते जसच्या तस तू अजून जपत आहेस .
येवू का घ्यायला?
आयुष्यात तशी तृप्त तृप्त
आसक्ती नाही ,
ना कुणावर आरक्त
गाणी गाते ,मुलात खेळते
लेन्सेसमुळे आता बरेच दिसते
पण तुझ्या डोळ्यात मिसळलेली
ती पहिली नजर?
.
.
.
तिच्या आर्ततेसकट
येवू का घ्यायला?