निवडुंग

लढाई आणि स्मारक

Submitted by ऋतुराज. on 29 March, 2021 - 05:56

लढाई आणि स्मारक

ही गोष्ट आहे जगातील एका मोठ्या जैविक आक्रमणाची व त्याच्या यशस्वी निर्मूलनासाठी लढल्या गेलेल्या लढाईची. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड व न्यू साऊथ वेल्स या भागात घडलेली फड्या निवडुंगाच्या उपद्रवी जैविक आक्रमणाची व त्याच्या निर्मूलनाची ही यशोगाथा.

निवडुंग तरारे इथला...

Submitted by अनन्त्_यात्री on 10 December, 2017 - 22:48

In Flanders Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या डॉ. जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. एका अनाम युद्धक्षेत्रावर लढताना वीरगती मिळालेल्या अनाम सैनिकांचं हे भावविभोर मनोगत. युद्ध निषेधार्ह असतं, घातक असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी अजूनही ते आधुनिक जगातलं एक अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही वाचताना मनाला चटका लावून जाते.

ही मूळ कविता व तिचा मी केलेला भावानुवाद.

विषय: 
शब्दखुणा: 

आज पुन्हा एकदा..

Submitted by निवडुंग on 4 September, 2011 - 07:00

आज पुन्हा एकदा,
तुझी खूप आठवण आली.

आशेचा एक छोटासा किरण,
आज पुन्हा एकदा,
क्षितिजावर उजळत राहिला.

क्षणार्धात झरझर सरकत गेलं,
डोळ्यांपुढे आयुष्य,
पांढरपेशा सरधोपट जगण्याला,
तुझी अदृश्य जांभळी किनार,
कायमच सोबत करत होती.

तुझ्या काळ्याभोर डोळ्यांतला चंद्र,
अजूनही घालत होता साकडं,
ग्रहणापासून सुटण्याचं.
अन माझे निस्तेज डोळे,
त्याला तेजवायचं त्राण नसल्याची,
असहाय्य कबुली देत.

खरंच, नाही का?
तुझा चंद्रच वेगळा,
त्याचं तेजही वेगळंच.

पण तरीही,
आज पुन्हा एकदा,
तुझी खूप भरभरून आठवण आली.

आशेचा एक छोटासा किरण,
आज पुन्हा एकदा,
क्षितिजावर उजळायच्या प्रयत्नात,

गुलमोहर: 

जगावेगळे मागणे मागतो मी..

Submitted by निवडुंग on 25 August, 2011 - 06:34

समांतर जिणे सांधण्या पाहतो मी,
जगावेगळे मागणे मागतो मी.

बरसता तुफानी सरी श्रावणाच्या,
फुले दोन, केशी तुझ्या, माळतो मी.

निरोपास आतच अडे पापण्यांच्या,
तुझी आसवे दोन, सांभाळतो मी.

धुसर होत जाता खुणा भाळण्याच्या,
गुरफटून अंधार कवटाळतो मी.

तुझ्या अंगणी पारिजाता पखरण्या,
धुमारे तटी आज जोपासतो मी.

उणे अधिक की अधिक होते उणे, हेच,
गणित रोज सोडायला टाळतो मी.

अताशा पडूनी किती पीळ जीवा,
सुतासारखा का सरळ वागतो मी?

खुणा सोबतीच्या हरवल्या कधीच्या,
पुरावे निरर्थकच धुंडाळतो मी..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांदणे आहे खरे की भास नुसता

Submitted by निवडुंग on 14 August, 2011 - 04:45

पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे. काही चुकलं असेल तर, मार्गदर्शनाची अपेक्षा!
===================================================

चांदणे आहे खरे की भास नुसता?
पैंजणी पाऊल की आभास नुसता?

निसटली नाती, अडकले शब्द ओठी,
भावनांचा काय अट्टाहास नुसता?

चोर बनले साव, मांडत डाव खोटे,
प्राक्तनी मीरा, तुझा, उपहास नुसता..

रात्र आली पोटुशी, ही दु:ख लपवत,
रोज सोशीला कळांचा, त्रास नुसता..

मागता इच्छामरण मी, हसत त्याने,
जीवनाचा काचला गळफास नुसता..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मुक्काम..

Submitted by निवडुंग on 31 July, 2011 - 13:40

अपनी मर्जीसे, कहाँ अपने सफर के हम हैं,
रुख हवाओंका जिधर का है, उधर के हम हैं..

वारं बदललं. आयुष्याचे मार्गही बदलायला लागलेत. आणि मुक्काम?

मुक्काम.. हं..

आज नको उद्या करू म्हणत कितीही लांबणीवर टाकत राहिलं तरी तो दिवस उजाडलाच. शेवटचा दिवस, मुक्काम हलवावाच लागणार म्हणून नाइलाजाने का होईना तो उठला. अनिच्छेनेच सर्व काही पसारा गोळा करायला सुरूवात केली. स्वत:च्या नकळत आवराआवर. मन कुठेतरी दूर भरकटलेलं, आणि हात यांत्रिकपणे चालत राहिलेले..

गुलमोहर: 

शिकरण..

Submitted by निवडुंग on 12 July, 2011 - 14:42

प्रेरणा:
http://www.maayboli.com/node/27195
http://www.maayboli.com/node/27262
http://www.maayboli.com/node/27270
http://www.maayboli.com/node/27277
--------------------------------------------------

मी कच्च्या केळ्यासारखा द्वाड,
अन् तू धारोष्ण दुधासारखी,
फेसाळणारी,
शुभ्र, नितळ, उबदार..

तुझ्या मखमली कायेच्या विरहात,
खुंटीला टांगलेला जीव,
पिकून पडला चित्री पिवळाजर्द..
तू मात्र शेकोटीचे असह्य चटके सोसत,
माझ्यावरचं सर्व प्रेम एकवटून,
दाट सायेत मूक कबुली देत..

तुझं उतू जाणारं प्रेम पाहिलं,
अन् माझी कितीही सालवटं निघत,
काळजाचे तुकडे पडले,
तरी हसत राहिलो मी,

शब्दखुणा: 

हसू..

Submitted by निवडुंग on 9 July, 2011 - 14:27

लहानपणी खूप हसलो की आई म्हणायची,
अरे बास आता,
जास्त नको हसू,
नाहीतर रडशील नंतर..

आताशा रोज खूप हसायचा
सराव करून घेतोय..
काय माहीत एखाद्या असह्य रात्री,
तिचे बोल खरे ठरले तर?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अक्षम्य तू..

Submitted by निवडुंग on 8 July, 2011 - 04:38

बागेश्रीबाईंची क्षमा मागून.. Wink
मूळ कविता इथे आहे - http://www.maayboli.com/node/27186
वर्षा_म - शीर्षक सुचवल्याबद्दल खूप आभार.. Happy

इतक्या झोकांड्या
खाऊनही, उभाच राहतोस..
कित्येकदा ठेचाळतोस,
धरपडतोस,
तरफडतोस,
पण, पुन्हा उभाच!

गुलमोहर: 

काल रात्री..

Submitted by निवडुंग on 4 July, 2011 - 11:57

काल रात्री तुफान पाऊस पडला इथे.

खिडकीच्या आतून,
तावदानावरचे ओघळलेले थेंब पाहताना,
काहीतरी जळत होतं खोलवर.

तुझ्यासारखं चिंब भिजावसं वाटलं अनेकदा.
पण त्याची राख होऊ द्यायला,
धजावलं नाही मन.

नकळत खिडकी उघडली तेव्हा,
दोन चार थेंब,
ओघळलेच हातावर.
कसल्याश्या तंद्रीतून चटकन भानावर आणत.

नाही म्हटलं तरी,
खिडकी बंद करणं,
एवढंच हातात होतं मग.

तो मात्र कोसळत राहिला रात्रभर..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - निवडुंग